थकवा घालवण्यासाठी

थकवा घालवण्यासाठी
सकाळी उठल्यावर थकवा जाणवत
असेल तर पाण्यात थोडे मीठ टाकून आंघोळ
केल्याने रक्तपुरवठा सुधारतो व शरीराला
आराम मिळतो. दीर्घ श्वास घ्या. काही
सेकंदापर्यंत श्वास रोखून ठेवा. नंतर सोडून
द्या. काही मिनिटे असेच करा.

लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी

लसूण आरोग्यासाठी खूप उपयोगी
व गुणकारी आहे. हृदयरोग तज्ज्ञ सांगतात
रोज आहारात एक तरी लसणाची पाकळी
हवी. अंकुरीत लसूण, फळे, धान्य यामध्ये
अ‍ॅण्टीऑसाईडची क्रिया जलद गतीने वाढत
जाते.

वास्तू

थोडयात महत्त्वाचे
अभ्यासात मन लागत नाही किंवा
केलेला अभ्यास लक्षात रहात नाही, अशी
समस्या असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यावर उपाय
म्हणून स्वतःच्या स्टडी टेबलवर किंवा
अभ्यासास बसण्याच्या ठिकाणी स्वतःसमोर
‘एज्युकेशन टॉवर’ची स्थापना करावी, असा
सल्ला फेंगशुईने दिला आहे. त्यामुळे शैक्षणिक
प्रगतीसाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती,
स्मरणशक्ती आत्मविश्वास आणि चिकाटी
वाढते, अशी फेंगशुईची धरणा आहे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

आई : डॉटर साहेब, हा पप्पू कपडे घालण्यासाठी फार त्रास
देतो. कपड्यांमुळे म्हणे खाज सुटते.
डॉटर औषध देतात आणि पंधरा दिवसांनी विचारतात आता कसा आहे मुलगा?
आई : आता बरा आहे पण औषधांनी नव्हे, तर त्याच्या नावामुळे.
डॉटर : कसे काय? आई आम्ही त्याचं नाव सलमान ठेवून
दिलं.

दैनिक पंचांग गुरुवार, दि. २१ मार्च २०२४

—-, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, आश्लेषा २५|२७
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : परस्पर विश्वास हवा, गुंते सुटतील, चर्चा व ओळखीने कामे होतील. अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील.

वृषभ : शैक्षणिक संधी मिळेल, विकासात्मक कामांना वेग येईल, संतुलन हवे. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅस करतील. शब्दाने शब्द वाढवू नका. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील.

मिथुन : धावपळ टाळा, लोक वेळ वा शब्द पाळतील, परिचितात लाभ होईल. शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला
खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा. आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवाल

कर्क : वस्तू सांभाळा, कामे रेंगाळतील, दिवस आळसात जाईल. आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. वाहने सावकाश चालवावीत. गुंतवणूक विचारपूर्वक करा. मित्रांबरोबर वेळ जाईल. जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा.

सिंह : परिचितांवर खर्च शय, प्रवास टाळा, हट्ट व आग्रह नको. तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. दैनंदिन कामकाजात अडचणी निर्माण होतील.

कन्या : वेळ घालवू नका, नव्या क्षेत्रात शिरकाव होईल, वेगळेपणा भाव खाऊन जाईल. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. विशेष वित्तीय अडचणींवर चिंतन.घरात मंगल कार्याचा योग.

तूळ : कलेत रुची राहील. स्त्री वर्गाला लाभ, माता-पित्यांना ताण. धार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक : दुपारनंतर उत्तम विकास, कामात विलंब होणार, चर्चेचे गुर्‍हाळ राहील. आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. नियोजनबद्धरित्या कामे केल्याने वेळ सत्कार्णी लागेल. इतर लोकांना आपला विचार विकण्याची आपली योग्यता अप्रतिम आहे.

धनु : हेवे-दावे टाळा, स्वतः धावपळ करावी लागेल, नशिबावर अवलंबून नको. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे
इतरांचे लक्ष वेधून घ्याल. दृढ निश्चयामुळे कामात विजय मिळेल. मित्रांचा सहयोग मिळेल. तुमच्या सार्मथ्यात वाढ.

मकर : आग्रही मत आणि अभ्यासू वृत्ती यश देणार आहे. वाद हे ठामपणे जिंकाल. अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ लबला नियमित जा. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शय आहे.

कुंभ : नवी वाट निवडाल. कर्जे देणे-घेणे टाळा. खरेदीत मन रमेल. गरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल.

मीन : दिवस ताणाचा, मते बनवू नका. देणगीचे वा अनुदान याबाबतचे काम होईल. फसगती माणसे टाळा. मागील उधारी व उसनवारी वसुल होईल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. चाकरमान्यांना लाभ मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

खुपर्‍या म्हणजे काय?

खुपर्‍या म्हणजे काय?

खुपर्‍या हा डोळ्यांचा एक रोग आहे. नेत्र आवरण व नेत्र पटल या दोहोंना लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस नावाच्या जंतूंचा संसर्ग झाल्यास हा रोग होतो. या जंतूखेरीज इतर काही जंतूही संसर्ग करू शकतात. जगात सुमारे १५ कोटी लोकांना हा रोग आहे. हा रोग झाल्यानंतर सुरुवातीला डोळ्यात वाळूचे कण गेल्याप्रमाणे वाटत राहते. त्यामुळे रुग्ण डोळे चोळतो. प्रत्यक्षात मात्र डोळ्यात काहीच गेलेले नसते. पापण्या उलटून पाहिल्यास पांढरट ठिपके दिसतात. कालांतराने पापण्यांच्या कडा डोळ्यांच्या दिशेने वळतात व पापण्यांचे केसही डोळ्यात शिरू लागतात. वेळीच उपचार न केल्यास पापण्या आखडतात, बुबुळावर फूल पडते व दृष्टी जाते. भारतातील एकूण अंधत्वापैकी ०.२% अंधत्व खुपर्‍यांमुळे आलेले असते. खुपर्‍या हा रोग रुग्णांच्या डोळ्यातील स्रावांशी निरोगी लोकांच्या डोळ्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क आल्याने पसरतो. यात बोटांद्वारे, हातरुमालाद्वारे, टॉवेलद्वारे वा काजळामार्फत रोग एकापासून दुसर्‍याला होतो. प्रखर सूर्यप्रकाश, धूळ, धूर व काजळ किंवा सुरमा यांसारख्या डोळ्यात जळजळ निर्माण करणार्‍या पदार्थांमुळे ट्रॅकोमा वा खुपर्‍या हा रोग होण्यास सहाय्य होते. हा रोग बरा होतो. टेट्रासायलीन वा एरिथ्रोमायसीन यांचे डोळ्यासाठीचे मलम दररोज एकदा असे लागोपाठ साठ दिवस डोळ्यात टाकल्यास रोग बरा होतो. या ऐवजी दररोज एकदा असे प्रत्येक महिन्याच्या दहा दिवस औषध देता येते. हे मात्र सहा महिने सातत्याने घ्यावे लागते. वैयक्तिक स्वच्छता राखल्यास व डोळे कायम स्वच्छ ठेवल्यास खुपर्‍या या रोगाचा प्रतिबंध करता येतो. त्याचप्रमाणे संत्रे, मोसंबी, लिंबू अशी ‘सी’ व्हिटॅमीन असलेली फळे खाणेही उपयुत ठरते.

प्रेगनंन्सीमध्ये जिर्‍याचे पाणी लाभदायक

प्रेगनंन्सीमध्ये जिर्‍याचे पाणी लाभदायक
फोडणीकरिता किंवा गरम मसाल्याकरिता प्रत्येकाच्या घरी जिरे हे वापरले जाते. पण या
जिर्‍याचा फक्त फोडणीपुरताच वापर नसून, गर्भवती महिलांनाही होतो. गर्भवती महिलांनी जिर्‍याचे
पाणी पिणे हे त्यांच्या आरोग्याकरिता लाभदायक असते. जिर्‍याचे पाणी पिण्यासाठी आधी एक
लिटर गरम पाण्यात एक चमचा जिरे टाकून ते उकळून घ्यावे. जेव्हा पाणी थंड होईल तेव्हा गाळून
पिणे. जिर्‍यासकट पाणी पिऊ नये. जिरे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ देत नाही.

सुविचार

निर्बलांना संरक्षण देणे हीच बलाची खरी सफलता होय. : साने गुरुजी

डोसा, पण उपवासाचा

डोसा, पण उपवासाचा

साहित्य – बटाट्याची उपवासाची
सुकी भाजी, अडीच वाट्या (तीन कप) वरईचे
निवडलेले तांदूळ, जिरे अर्धा टि-स्पून, मीठ,
तूप, मिरची.
कृती – वरई तांदूळ चार तास पाण्यात
भिजत घाला. उपसून मिसरमधून बारीक
करून घ्या. तसेच झाकून ठेवा. चार/पाच
तासांनी त्यात जिरे, थोडी वाटून घेतलेली
मिरची, मीठ घालून चांगले कालवून घ्या.
आचेवर तवा ठेवा. त्यावर तूप पसरून घाला.
नेहमी प्रमाणे जसे डोसे करतात त्याप्रमाणे
करा.
भाजत आल्यावर त्यावर आधीच तयार
करून ठेवलेली बटाट्याची सुकी भाजी घाला.
डोसा गुंडाळून मोठ्या डिशवर काढा. गरम
असतानाच खा.

ओठ चांगले ठेवण्यासाठी

ओठ चांगले ठेवण्यासाठी
प्रत्येक ऋतूमध्ये ओठ चांगले ठेवायचे
असतील तर देशी गुलाबाच्या पाकळ्या
पाण्यात भिजवून ओठांवर चोळाव्यात. रात्री
झोपताना पेट्रोलिअम जेली किंवा अँटीसेप्टिक
क्रीम ओठांना लावल्याने ओठ फाटणार
नाहीत.