पोटातील कृमी नष्ट होण्यास रोज
चिमुटभर आवळापूड खावी.
दैनिक पंचांग बुधवार, दि. २० मार्च २०२४
आमलकी एकादशी, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, पुष्य
२२|३८
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.
मेष : अवाजवी खर्च टाळा. नेमके बोला. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तणाव वाढवू शकतो. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते.
वृषभ : सोयी सवलतींसाठी खर्च वाढेल. हाताखालील व्यक्तींना मदत करावी लागेल. घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल.
मिथुन : बेकायदा कामे नको. मूलभूत गरजांवर काम करा. भांडण नको. हृदयरोग असणार्यांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे.
कर्क : कामात एकरूपता हवी. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो
सिंह : परगावी शाखा काढा. नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. मुले व पत्नीच्या सहवासामुळे आनंद मिळेल.
कन्या : तांत्रिक कामे त्वरित करावीत. खर्च वाढेल. राखीव फंड हाताशी ठेवा. आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा.
तूळ : परस्पर वाद टाळा. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. मागील उधारी वसुल होईल. शारिरीक
व्याधीपासून मुक्तता होण्याची शयता आहे.
वृश्चिक : करार वा हमीस चांगला. अंदाज चुकेल. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. आर्थिक विषयांमध्ये सावगिरी बाळगा.
धनु : टोकाची भूमिका नको. भावनिक चुका टाळा. तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद घ्या. शांत राहाण्याचा प्रयत्न कराल. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल.
मकर : वेळ पाळावीच लागेल. चर्चा टाळा. तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.
कुंभ : भावनिक द्वंद्वे टाळावीत. काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल.
मीन : घोळ निस्तरतील. भावनिक आनंद मिळेल. प्रवास टाळा. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. कामे संयमाने करावीत.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
रातांधळेपणा म्हणजे काय?
रातांधळेपणा म्हणजे काय?
रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरशः आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना ‘कोन व रॉड’ असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये र्होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व ‘अ’ पासून होत असते. उजेडात र्होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व ‘अ’ मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व ‘अ’चे रूपांतर र्होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी र्होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू र्होडोप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल. जीवनसत्त्व ‘अ’च्या अभावामुळे र्होडोप्सीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व ‘अ’चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच ‘रातांधळेपणा’ असे म्हणतात.
रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व ‘अ’च्या अभावामुळे होणार्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधापैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व ‘अ’च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व ‘अ’ असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व ‘अ’चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.
कांद्याचे लोणचे
कांद्याचे लोणचे
साहित्य – ६ मोठ्या आकाराचे ताजे
कांदे, दीड चमचा हळद, ३ चमचे आमचूर,
दीड चमचा मेथ्या, ३ चमचे बडीशेप, अर्धा
चमचा मोहरीची पावडर, दीड चमचा कलौंजी,
अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ,
मिरची पूड, तळण्यासाठी शेंगदाणा तेल.
कृति – सर्वप्रथम कांदे सोलून
प्रत्येकाचे ८ तुकडे करा. कढईत तेल तापवून
ते तुकडे साधारण भुरकट होईपर्यंत तळून
घ्या. तळलेले कांदे एका भांड्यात काढून घ्या.
बडीशेप, मेथ्या भाजून भरड वाटून घ्या. आता
मीठासह सर्व मसाले तळा व कांद्यात टाकून
व्यवस्थित मिसळा. कलौंजी व गरम मसालाही
टाका. व्यवस्थित मिसळून थंड झाल्यानंतर
बरणीत भरा. स्वच्छ कापडाने बांधून उन्हात
ठेवा. दुसर्या दिवशी दीड वाटी तेल गरम
करून थंड करा व त्यावर ओता. हे लोणचे
५-६ दिवस खराब होत नाही.
केसांच्या वाढीसाठी
केसांच्या वाढीसाठी
* लिंबूरस व आवळा पावडर एकत्र
करून त्याचे मिश्रण केसांच्या मुळापर्यंत चोळावे.
यामुळे केसगळती थांबते. केसांची चांगली
वाढ होऊन केस काळे होतात. कडुलिंबाची
पाने खाल्ल्यानेही केसांवर चांगला परिणाम
होतो.
* अगस्त्यच्या बियांची पूड तीन
ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गाईच्या धारोष्ण २५०
ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही
दिवसांपर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
अशोकचे साल, ब्राह्मी पूड समप्रमाणात एकत्र
करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ
एक कप दुधाबरोबर नियमितपणे काही महिने
घेतल्याने बुद्धीत वाढ होते. शंखपुष्पीची ३-६
ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून
दूध प्यावे.






