मँगो चॉकलेट

मँगो चॉकलेट

साहित्य : आंबा रस ताजा चार कप,
दूध पावडर दोन कप, साखर तीन कप,
ग्लुकोज पूड एक कप, पाव कप शुध्द तूप.
कृती : आंब्याच्या रसात साखर घालून
ती पूर्ण विरघळून घ्या. नंतर दूध पावडर व
ग्लुकोज पूड एकत्र करुन चांगली मिसळून
आंबा मिश्रणात टाकून भांडे मंदाग्नीवर ठेवा.
ढवळत राहा. मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत
थांबा. थाळीला तुपाचा हलकासा हात लावून
हे घट्ट झालेले आंबा मिश्रण त्यात ओता.
पसरुन थापा. थंड झाल्यावर त्याच्या वड्या
पाडा. आंबा चॉकलेट तयार.

वास्तू

वास्तूदोष दूर करण्यासाठी
ईशान्य कोपर्‍यामध्ये एक अंडरग्राऊंड
वॉटर टँक निर्माण करून तसेच त्यात
पाण्याचा साठा करून त्या क्षेत्रातील वास्तुदोष
दूर करता येतात.

हातापायाला भेगा पडल्यास

* हातापायाला भेगा पडल्यास जुने तूप
लावा.
* वापरलेली चहा पावडर पाण्यात
टाकून ढवळा व त्या पाण्याने लाकडी फर्निचर
व काचा स्वच्छ करा. सर्व डाग जातील.
* डोळ्यांची आग थांबण्यासाठी
काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवाव्यात.
* दही विरजताना भांड्याला जर
थोडीशी तुरटी चोळली तर दही उत्तम विरजते
व चवही चांगली येते.

सुगंधीत व मऊ केसांसाठी

* जर चेहर्‍यावर डाग असतील तर
मुलतानी मातीत चंदन पावडर, चिमूटभर हळद
व २-३ थेंब कापराचे तेल टाकून चेहर्‍यावर
लेप लावल्यास हळूहळू डाग नाहीसे होतात.
* रिठा-आवळा-शिकेकाई यांची
पूड काष्ठौषधीच्या दुकानात मिळते. ते तिन्ही
समप्रमाणात २-२ चमचे घेऊन शुध्द खोबरेल
तेलात एकत्र करावी. हे उटणे केसांना व
केसमुळांना लावून १५ मिनिटे आराम करावा.
मग स्नान करावे. आठवड्यातून २ दिवस हा
प्रयोग केल्याने केस सुगंधीत व मऊ रेशमी
होतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

शिक्षक : असं कोणतं पिक आहे,
ज्याचा रस खूप गोड असतो?
बंड्या : माहीत नाही.
शिक्षक : आठव जरा, तुमच्या घरात
येणारी साखर कुठून मिळते?
बंड्या : शेजारच्यांकडून..

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २२ मार्च २०२४

प्रदोष, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, मघा २८|२८
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. ३० मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे. हसत खेळत वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. जोखिम असलेले कार्ये टाळा. आरोग्य मध्यम राहील.

वृषभ : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. आर्थिक
विषयांमध्ये सावगिरी बाळगा. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल.

मिथुन : आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी
प्रवृत्त करेल. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल. पैशासंबंधी येणार्‍या सर्व अडचणी दूर होतील.

कर्क : आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. मागील उधारी उसनवारी वसुल होईल. आरोग्य उत्तम राहील. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही.

सिंह : आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा. बाहेर गावी प्रवासाचे योग आहेत. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल.

कन्या : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो.
कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. वेळ अनुकूल आहे.

तूळ : बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आजचा दिवस व्यापार क्षेत्रातील
चांगली बातमी आणणारा आहे.

वृश्चिक : व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. वाहने सावकाश चालवावीत. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.

धनु : आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित करा. नवीन जोखिम असलेली कार्ये टाळा. इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

मकर : आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस आनंदाने परिपूर्ण असेल.

कुंभ : पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

मीन : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. बेपर्वाईने कार्य करू नका.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

माणूस कोणकोणते अवयव दुसर्‍याला दान करू शकतो?

माणूस कोणकोणते अवयव दुसर्‍याला दान करू शकतो?

दानाचे माहात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. दानशूर कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच; परंतु या सर्व दानांपेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना? पण हे अगदी खरे आहे. हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसर्‍याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शय झाले आहे. डोळ्यात फूल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल बसवतात. यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे वा रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्वसामान्यपणे व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी एका मूत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रूग्णाचे प्राण वाचतात.

अपघातामध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णाचे हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णाचे प्राण वाचवता येतात. मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमार्टेम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचना अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसर्‍या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते. अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. “मरावे परी किर्तीरूपी उरावे.” या उक्तीची प्रचिती या दानामुळे येऊ शकते.

दालचिनीने दूर करा लठ्ठपणा

दालचिनीने दूर करा लठ्ठपणा
जर आपण आपल्या वाढत्या वजनाने चिंतित आहात आणि आपल्याला वजन कमी
करण्यासाठी योग करणे किंवा जिममध्ये जाणे शय नसेल तर एका सोप्या उपायाने आपण
वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे सेवन करावे. दिवसातून
चार ते पाच वेळा दालचिनीचा लहान तुकडा चघळा. याने आपला लठ्ठपणा कमी होण्यास
मदत होईल. दालचिनी चघळण्याने सतत गोड खाण्याची इच्छा होत नाही. याव्यतिरिक्त
अवेळी लागणारी भूक आटोयात येते. ज्याने आपण फास्ट फूड किंवा इतर मसालेदार
फूडपासून आपोआप दूर राहता आणि त्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो.

सुविचार

आपल्या प्राणांचा मोह सोडण्यातच पराक्रमाचे रहस्य आहे. : जयशंकर प्रसाद

क्रिमी मँगो

क्रिमी मँगो
साहित्य – गोडसर ताजा आंबा रस
अर्धी वाटी, दूध अर्धी वाटी, फेसलेले क्रीम
अर्धी वाटी, थोड्या आंबा फोडी व आईसिंग
शुगर, दोन मोठे चमचे.
कृती – आंबा रस दूध एकत्रित मिसळून
फेस येईपर्यंत चांगले घुसळून घ्या. फेसलेल्या
क्रीममध्ये साखर टाकून फेसून एकजीव करा
व आंबा रसात घाला. ढवळा. सर्व्ह करताना
ग्लासामध्ये ओतून त्यात थोड्या आंबा फोडी
टाका.