गालफुगी कशामुळे होते?

गालफुगी कशामुळे होते?

तुमच्या एखाद्या मित्राचा वा तुमचा गाल अचानक सुजला असेल. शाळेत यायची तुम्हाला लाजही वाटली असेल, कारण हनुमानासारखे गाल फुगलेले असतील. याला गालफुगी असे म्हणतात; पण ती का होते ते आपण पाहू. गालफुगी अर्थात मम्प्स हा एक रोग असून तो मिझो या विषाणूमुळे होतो. हा विषाणू लाळ तयार करणार्‍या गालातील ग्रंथीवर आक्रमण करतो. मज्जासंस्थेवरही आक्रमण करू शकतो. यात गालावर सूज, तोंड उघडायला त्रास, वेदना, कानात दुखणे, ताप अशी लक्षणे बघावयास मिळतात. हा रोग ५ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये होतो. तसा हा रोग आपोआप ८-१० दिवसांत बरा होतो. त्यामुळे तापासारख्या लक्षणासाठी औषध देता येते. या विषाणूंना मारण्यासाठी विशिष्ट औषध नाही. या आजारात फारशा गंभीर गुंतागुंती होत नाहीत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते. हा रोग होऊ नये, यासाठी एक ते दीड वर्षांच्या मुलांना प्रतिबंधक लस देता येते. गालफुगी हा एक सौम्य प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. तो आपोआप बरा होतो. गालफुगी झालेल्या मुलामुळे दुसर्‍यांना संसर्ग होऊ नये व गुंतागुंती होऊ नयेत म्हणून मुलाला शाळेत न पाठवणेच योग्य. श्वासांद्वारे हा रोग पसरतो. गाल सुजण्याआधी ४ ते ६ दिवस व नंतर आठ दिवस रुग्णापासून हा रोग दुसर्‍याला होऊ शकतो.

सुविचार

वाटेल त्या कारणासाठी स्वतःचा पराक्रम खर्च करण्यात खरी हिंमत नसून,
योग्य कारणासाठी प्राणांची बाजी लावण्यात खरा पराक्रम आहे. : महात्मा गांधी

तल्लख स्मरणशतीसाठी

तल्लख स्मरणशतीसाठी
३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती
वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम मुलांना दिल्याने मुलं खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात.
सकाळी शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येतो. शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम
किंवा २-४ ग्रॅम पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत
राहिल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धीत वाढ होते. दूध, तूप किंवा पाण्यासोबत मिलीग्रॅमच्या
प्रमाणात दिवसातून दोन-तीन वेळा एक वर्षापर्यंत किंवा किमान एक महिन्यापर्यंत घेतल्याने
स्मरणशक्तीत वाढ होते. २५० ग्रॅम खडीसाखरेसोबत पाक करून रोज १० ग्रॅम सकाळ-संध्याकाळ
खाण्याने विसरण्याची सवय दूर होते.

पौष्टिक हलवा

पौष्टिक हलवा

साहित्य : कपभर खजुराचा गर, एक
कप दूध, अर्धा कप तूप, काजू, १० पिस्ते,
साखर, थोडी वेलची.
कृती : खजुराचे लहान तुकडे करून
दूध, खजूर, साखर शिजवा. उकळी आल्यावर
तूप सोडा. थोडे काजू त्यात सोडा. मिश्रण
आटल्यावर उतरवा. आता काजू, पिस्ते व
वेलची घाला. पौष्टिक हलवा तयार होईल.

वास्तू

घरात अशी चित्रे लावावीत
* पाण्यातील माशाचे चित्र दीर्घायुष्याचा
संकेत देते.
* मेंढीचे चित्र नशिबाचे प्रतीक आहे.
* सूर्योदय, पर्वत किंवा पाणी दाखवणारी
निसर्गचित्रे आशादायी मनोवृत्ती दर्शवितात.
* भौमितिक आकारातील चित्रे
विध्वंसक विचार वाढवितात.
* कुटुंबाची झपाट्याने भरभराट व्हावी
म्हणून स्वयंपाकघर कधीही घराच्या मधोमन
असू नये.

लोणचे बरणीत भरण्यापूर्वी

लोणचे बरणीत भरण्यापूर्वी तव्यावर चार
निखारे ठेवून त्यावर हिंगाचा छोटा खडा ठेवावा
व त्यावर बरणी पालथी ठेवावी व बरणीत धुरी
द्यावी. धूर निघून गेल्यानंतर लोणचे बरणीत
दाबून भरावे.

मुलायम चेहऱ्यासाठी

मसूर डाळ बारीक वाटून दुधात घुसळून
घ्यावी आणि चेहर्‍यावर लावावी. १० मि
निटांनी चेहरा धुवून घ्यावा. आठवडाभर हा
उपाय सकाळ-संध्याकाळ करावा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

मास्तर : सांगा, पाण्यापेक्षा हलके काय
आहे.??
गण्या : सर..भजी.
मास्तर : कसे काय?
गण्या : सर, तेल पाण्यावर तरंगते
आणि भजी तेलावर…

दैनिक पंचांग शनिवार, दि. ३० मार्च २०२४

रंगपंचमी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, अनुराधा
२२|०४ सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष :  महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका.

वृषभ : तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल.

मिथुन : तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस.

कर्क : आजचा दिवस विशेष साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत कॅण्डललाईट डीनरचा आस्वाद घ्या. नव्या
कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे.

सिंह : संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आजचा दिवस खूपच सुंदर असेल.

कन्या : आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आज तुमची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत होईल.

तूळ : आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. या परमानंदाचा अनुभव घ्या. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ.

वृश्चिक : तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. तुमच्या खासगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील.

धनु : आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल.

मकर : अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. वैवाहिक
आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

कुंभ : जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच.

मीन : महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तुम्ही साजरे करण्याच्या मूडमध्ये असाल आणि कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांच्यासाठी खर्च करून मजा लुटाल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

सुविचार

दुसर्‍यांना मारण्यात पराक्रम नाही; पण स्वतः मरण्यात आहे.
कोणाची प्रतिष्ठा नष्ट करण्यात पराक्रम नसून, ती बचावण्यात आहे. : महात्मा गांधी