दैनिक पंचांग बुधवार, दि. ३ एप्रिल २०२४

—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, पू.षा.२१|४८
सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.

वृषभ : ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल.

मिथुन : तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होण्याचा जबरदस्त योग आहे.

कर्क : आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील.

सिंह : शत्रू पराभूत होतील. आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. कोणत्याही कार्यात बेपर्वाईने वागू नका.

कन्या : ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. आर्थिक व्यवहार करताना अनोळखी व्यतीवर विश्वास ठेवू नका.

वृश्चिक : आपण पूर्वीपासून आपल्या मनात असलेल्या योजनेबद्दल अतिउत्साही आहात. आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील.

धनु : आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वांत उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन होतील. कार्यक्षेत्रात नवीन प्रोजेटची सुरूवात करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

मकर : दिवस संमिश्र जाईल. आर्थिक नुकसानीची शयता आहे. आरोग्याची काळजी घ्या. व्यस्त राहाल. मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. संततीसौख्य लाभेल. कोर्ट-कचेरी आदी गोष्टींपासून

कुंभ : जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. कौटुंबिक समस्या निर्माण होईल.

मीन : व्यापार्‍यांसाठी परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. कौटुंबिक विषयांमध्ये पैसा खर्च होईल. हातावर हात ठेवल्याने कोणतेही कार्य होत नाही.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

पोलिओने पाय लुळा का होतो?

पोलिओने पाय लुळा का होतो?

पोलिओ हा विषाणूंमुळे होणारा एक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. या रोगाचे जंतू रुग्णाच्या विष्ठेतून पिण्याच्या पाण्यात मिसळले जातात व निरोगी लोकांना हा रोग होतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची सुरक्षित व्यवस्था व मलमूत्र विसर्जनाची, विल्हेवाटीची व्यवस्था नसलेल्या देशांमध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भारतात या सुविधांचा अभाव असल्याने पोलिओ आढळून येतो. पाच वर्षांखालील मुलांना हा रोग प्रामुख्याने होतो. दरवर्षी दर लाख लोकसंख्येमागे १५ जण पोलिओमुळे लुळे होतात. पोलिओचे विषाणू दूषित पाण्यातून तोंडावाटे शरीरात प्रवेश करतात. पचनसंस्थेत प्रवेश केल्यानंतर सौम्य प्रकारचा आजार होतो (यात ताप, उलट्या व जुलाब ही लक्षणे असतात) व बर्‍याचदा तो आपोआप बरा होतो. अशा रुग्णांपैकी क्वचित एखाद्याच्याच आतड्यातून हे विषाणू रक्तात जातात. रक्तातून स्नायूत व मग मज्जासंस्थेत शिरतात. मज्जासंस्थेच्या ज्या भागावर वा नसेवर विषाणू हल्ला करून तिला निकामी करतात, त्यानुसार त्या नसेशी संबंधित असे स्नायू लुळे पडतात. सामान्यपणे पाय लुळा पडतो, कधी कधी हात, तर कधी हात व पाय वा शरीर लुळे पडू शकते. रक्तात वा स्नायूत विषाणू असल्यास रुग्णाला जर इंजेशन दिले गेले, तर हातपाय लुळे पडण्याची शयता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात व विशेषतः पोलिओची साथ चालू असल्यास ताप, हगवण झाल्यास चुकूनही इंजेशन देऊ नये. पोलिओ टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व लहान मुलांना पोलिओची लस पाजणे. जन्माच्या दिवशी पहिली लस दिली जाते. त्यानंतर दीड, अडीच, साडेतीन महिने वय असताना व नंतर दीड वर्ष वय असताना परत ही लस पाजली जाते. ही लस दिल्यास पोलिओ होत नाही. दूरगामी प्रतिबंध करण्यासाठी राहणीमानाचा दर्जा उंचावणे, सुरक्षित पाण्याचा पुरवठा करणे व मलमूत्र विसर्जन विल्हेवाटीसाठी सुयोग्य व्यवस्था करणे, हे आवश्यक ठरते. पोलिओने पाय लुळा पडल्यास भौतिकोपचार तसेच कॅलीपर (पायाचा आधार) वगैरे वापरून शक्ती परत आणण्याचा प्रयत्न करता येतो. काही वेळा शस्त्रक्रियेचाही उपयोग होतो. अर्थात, हे सर्व करण्यापेक्षा लसीकरण करून रोग टाळणे, हेच योग्य ठरेल.

सुविचार

जेव्हा मनुष्याजवळचा पैसा संपतो; तेव्हा त्याच्याजवळची थोडीशी पुंजी संपते; जेव्हा त्याची प्रतिष्ठा नाहीशी होते; तेव्हा
त्यापेक्षा अधिक पुंजी संपते; पण जेव्हा मनुष्य स्वतःची हिंमत घालवून बसतो; तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होते. : जॉन रस्किन

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी

हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी
रात्री भिजवलेले मेथ्यांचे दाणे सकाळी खाल्ल्याने, रक्तातील चरबीचे प्रमाण कमी होऊ
लागते. मेथ्यामध्ये असलेल्या विशेष अमायनो अ‍ॅसिड्समुळे हे साध्य होते. परिणामत: उच्च
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन ती नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा
धोका कमी होतो.

रवा-बेसनाचे लाडू

रवा-बेसनाचे लाडू

साहित्य : १०० ग्रॅम रवा, १ वाटी बेसन
पीठ, १ वाटी साखर व सुकामेवा, बदाम-
जायफळ, काजू, खिसिमिस, एक वाटी
साजूक तूप.
कृती : आधी बेसन पीठ भाजून घ्यावे.
नंतर खवा लालसर भाजून घ्यावा.
त्यानंतर गार झाल्यावर त्यामध्ये
पिठीसाखर मिसळावी. चवीसाठी जायफळ,
वेलची पावडर, बदाम, काजू यांची पूड करून
लाडवामध्ये मिसळावी. याचे लाडू बांधताना
वरून साजूक तूप टाकून हव्या त्या आकाराचे
लाडू वळावेत.

आरोग्यदायी केसांसासाठी

आरोग्यदायी केसांसासाठी
मध, लिंबू, ग्लिसरीन मिसळून चेहर्‍यावर
लावा. चेहरा मुलायम व नितळ होतो.
शिकेकाई, या औषधी वनस्पतीमुळे केस
दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच
मदत होते. केसामध्ये कोंडा न होण्यासाठी
याचा उपयोग होतो. शिकेकाई वापरायची
असल्यास दळून आणलेली शिकेकाई आदल्या
दिवशी रात्रीच लोखंडाच्या भांड्यात मिळवून
ठेवतात. सकाळी नहाण्यापूर्वी ती उकळून थंड
करावी. केसावर याचा खूप चांगला परिणाम
होतो.

वास्तू

* नवविवाहित जोडप्याने एकाच गादीवर
झोपल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण होत नाही.
तसेच त्यांच्यातील प्रेमही आटत नाही.
* दिवाणखान्यात पांढरे किंवा सोनेरी
गोल घड्याळ असल्यास चांगले. ते शुभप्रतीक
आहे.

यात साखर घालून प्यायल्याने

* चिंच पाण्यात कुस्करून ते पाणी
गाळून त्यात साखर घालून प्यायल्याने उष्म
ाघातात आराम वाटतो.
* ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या
संशोधकांनी एक हजार लोकांवर प्रयोग करून
असे स्पष्ट केले आहे की, स्मरणशक्ती कमी
करणारा मेजर फॅटर म्हणजे ‘ट्रान्स फॅट्स’
हा प्रकार बिस्किटात आढळून येतो. यामुळे
राग येणं, लठ्ठपणा तसेच हृदयाचे विकार
होऊ शकतात. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त
बिस्कीट खाण्याची सवय आरोग्यासाठी
धोकादायक आहे. ‘डेली मेल’ या वेबसाईटवर
प्रकाशित झालेल्या शोधानुसार बिस्किटांच्या
अतिसेवनामुळे स्मरणशक्ती कमी होत जाते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

गण्या : बंड्या जर आपल्या भारतात एकतर्फी प्रेम
करणारे मुल-मुली जरी बाजुला काढले तरी वेगळा
देश तयार होईल
बंड्या : पण मग त्यांचे राष्ट्रगीत
गण्या : तु प्यार है किसी ओर का…
तुझे चाहता कोई और है
हे असेल

दैनिक पंचांग मंगळवार, दि. २ एप्रिल २०२४

कालाष्टमी, शके १९४५ शोभननाम संवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, पू.षा.२२|४९
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : तुमची ऊर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या कारण अशक्तपणामुळे तुमचे मन कमकुवत होते. सामाजिक क्षेत्रात अपयश येणार नाही याकडे लक्ष द्या. नवीन कामाची सुरूवात करण्याला अनुकूल दिवस.

वृषभ : तुमची खरी क्षमता ओळखा. अन्यथा तुम्ही शक्ती नाही तर इच्छा गमावून बसाल. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. मित्रांबरोबर दिवस आनंदात घालवाल. मागील देणी वसुल होतील.

मिथुन : आज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे. आध्यात्मिकतेतून शांती मिळेल.

कर्क : तुमच्या हातातून पैसे हरवू देऊ नका. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे
ही तुमची प्राथमिकता असेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकाल.

सिंह : आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपली स्वप्ने प्रत्यक्षात येतील. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात रस वाटणार नाही. प्रवास,

कन्या : आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. देण्या-घेण्याचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

तूळ : एका कठीण काळानंतर आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये रमाल. मित्र आणि कुटुंबीय यांच्याबरोबर आनंदात दिवस घालवाल. शारीरिकस्वास्थ्य बिघडू शकते. विनाकारण खर्च होईल.

वृश्चिक : सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात हे तुमच्या चिंतेचे मुख्य कारण ठरेल. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल.

धनु : आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घ्याल. आध्यात्मिकतेच्या मदतीने विचारातील नकारात्मकता दूर करा. आध्यात्मिक आनंदही आज आपल्या जीवनात भरून राहील.

मकर : आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुम्हाला अपनेक्षीत फायदा होईल. मिळणार्‍या फायद्यात नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्या. अपघात व गैरसमज यापासून दूरच राहा. वाहने सावकाश चालवावीत.

कुंभ : आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे. स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबातील लोकांशी मतभेद संभवतात.

मीन : स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. सहली यातूनही आज आनंद मिळवू शकता.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर