सकाळी चेहरा धुतल्यानंतर बेकिंग
सोडा पाण्यात मिसळून ब्लॅकहेडस्च्या भागात
लावावा. १५ मिनिटानंतर चेहरा धुवावा.
यामुळे काही दिवस ब्लॅकहेडस् उत्पन्न होणार
नाहीत. आठवड्यातून २-३ वेळा फेशियल
स्क्रबचाही वापर करावा.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
दैनिक पंचांग रविवार, दि. ५ मे २०२४
प्रदोष, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
चैत्र कृष्णपक्ष, उ.भा.१९|५७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.
राशिभविष्य-
मेष : आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे.
वृषभ : प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंद आणि उल्हास आणू शकते.
मिथुन : आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील पळापळ देखील अधिक राहील.
कर्क : आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक आणि अर्थपूर्ण होण्याची शयता आहे. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. पैसा खर्च होईल. अनावश्यक चिंता टाळा.
सिंह : आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल.
कन्या : आजच्या दिवशी किंचित विश्रांती घ्या आणि मनन-चिंतन करा. काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा.
तूळ : सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे
यासाठी त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभावशाली करा.
वृश्चिक : आजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाणय्घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा.
धनु : आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही.
मकर : आज आपण एखाद्या अधिकार्यामुळे असंतुष्ट राहाल. सहकार्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. काही लोकांच चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. शत्रूंपासून सावध राहा.
कुंभ : आज आपणास नवीन संधी मिळण्याची शयता आहे. आपण त्यांचा योग्य वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू
शकते. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.
मीन : आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अधिक श्रम
करावे लागतील. एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
साप खाल्ला तर माणूस मरतो का?
साप खाल्ला तर माणूस मरतो का?
काय घाबरलात ना? पण घाबरू नका! काही वर्षांनी का होईना, भारतातही हॉटेलात शिरल्यावर मेनूकार्डात चिकन, मटणाच्या बरोबर सापाचे मांस, कबाब इत्यादी पदार्थ नक्कीच लिहिलेले आढळतील. आजही चिनी उपाहारगृहात सापाचे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील. हळूहळू धान्याचा तुटवडा निर्माण होणारच आहे. त्यामुळे मनुष्य साप, उंदीर, बेडूक अशा अनेक प्राण्यांना फस्त करत सुटेल. अर्थात सध्याही जगाच्या काही भागात हे प्राणी खाल्ले जातात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, साप हा भयंकर विषारी असतो; मग तो खाल्ल्यास मृत्यू येणार नाही का? साप खाल्ल्यावर माणूस मरत नाही, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सापाचे विष फक्त त्याच्या दातांजवळील ग्रंथीतच असते. ते सर्व शरीरभर पसरलेले नसते. त्यामुळे साप खाल्ला तरी कोणी मरणार नाही. दुसरी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक प्रकारचे प्रथिनच असते. जठरातील आम्ल व इतर विकारांमुळे या प्रथिनांचे पचन होऊन जाईल. कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. साप चावल्यानंतर एकतर हे विष रक्तातून शरीरभर पसरते किंवा स्नायूतून चेतातंतूमध्ये व तेथून मेंदूपर्यंत पोहोचते. यामुळे सर्पविषबाधेची लक्षणे ही प्रामुख्याने रक्ताभिसरण संस्था किंवा मज्जासंस्था यांच्याशी निगडित असतात. या दोन्ही कारणामुळे आपल्या लक्षात येईल की, साप खाल्ला तरी माणूस मरत नाही.
फ्लॉवर-सुकामेवा कटलेट
फ्लॉवर-सुकामेवा कटलेट
साहित्य : एक कप फ्लॉवरचा कीस,
१०० ग्रॅम खवा, तेल, एक कप पनीरचा
कीस, एक कप भरड वाटलेला सुकामेवा
(काजू, बदाम, चारोळी, पिस्ता, अक्रोड इ.),
लिंबू, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,
हळद, मिरची पूड, गरम मसाला, दोन बटाटे
(उकडून), एक चमचा मैदा, ब्रेडचा चुरा,
मीठ, मोहरी, जिरे.
कृती : कढईत तेल तापवून मोहरी जिरे
तडतडवा. त्यात हळद, कांदा, हिरवी मिरची,
कोथिंबीर टाकून परता. बटाटे कुस्करून
घ्या. नंतर फ्लॉवर, पनीर, बटाटे व सुकामेवा
टाकून परता, खवा भाजून मिसळा. मिश्रणात
दही मिसळून व्यवस्थित परतून घ्या. मिश्रण
थाळीत पसरून गोल तुकड्यांत कापून घ्या.
मैद्याचे साधारण दाट पीठ बनवून त्यात कटलेट
बुडवून ब्रेडच्या चुर्यात घोळवून तेलात मध्यम
जाळावर तळून घ्या. सर्व्ह करताना थोडेसे
काळे मीठ टाकून टोमॅटो सॉससोबत स्वादिष्ट
फ्लॉवर सुकामेवा कटलेटचा आस्वाद घ्या
केसांमधील कोंडा
केस धुण्यासाठी साबण वा शाम्पूचा
वापर कमी करावा. केस धुण्याच्या आदल्या
रात्री खोबरेल तेलाने भरपूर मालीश करावी.
दुसर्या दिवशी अर्धी वाटी बेसनामध्ये दही
घालून पातळ द्राव बनवावा. तो केसांच्या
मुळाशी लावून मालिश करावी व केस कापडाने
बांधावेत. तासाभराने कोमट पाण्याने धुवावेत.
एक मग पाण्यात एक लिंबू पिळावे व केसांच्या
मुळांवर ओतावे. काही वेळानंतर केस टॉवेलने
पुसून सुकवावेत. यामुळे कोंडा नष्ट होऊन
केस लांब व दाट होतात.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर






