दैनिक पंचांग रविवार, दि. ५ मे २०२४

0
57

प्रदोष, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
चैत्र कृष्णपक्ष, उ.भा.१९|५७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य-

मेष : आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे.

वृषभ : प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंद आणि उल्हास आणू शकते.

मिथुन : आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील पळापळ देखील अधिक राहील.

कर्क : आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक आणि अर्थपूर्ण होण्याची शयता आहे. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात. आरोग्याची काळजी घ्या. पैसा खर्च होईल. अनावश्यक चिंता टाळा.

सिंह : आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल.

कन्या : आजच्या दिवशी किंचित विश्रांती घ्या आणि मनन-चिंतन करा. काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा.

तूळ : सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे
यासाठी त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभावशाली करा.

वृश्चिक : आजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाणय्घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा.

धनु : आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही.

मकर : आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकार्‍यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. काही लोकांच  चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. शत्रूंपासून सावध राहा.

कुंभ : आज आपणास नवीन संधी मिळण्याची शयता आहे. आपण त्यांचा योग्य वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू
शकते. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.

मीन : आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अधिक श्रम
करावे लागतील. एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर