बेडरूममध्ये जोडप्यातील कुणा एकाचा
स्वतंत्र फोटो लावणे कटाक्षाने टाळा. त्यामुळे
अशा जोडप्यादरम्यान मतभेद, कलह, कटुता
निर्माण होते, अशी धारणा आहे.
दैनिक पंचांग मंगळवार, दि. ७ मे २०२४
दर्श अमावास्या, सत्तु अमावास्या, शके
१९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र कृष्णपक्ष,
अश्विनी १५|३२
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : आपल्या स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. बर्याच दिवसांपासून राहिलेली खरेदी होईल.
वृषभ : आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. मागील उधारी व उसनवारी वसूल होईल.
मिथुन : आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. मित्र
व नातेवाईकांचा सहवास लाभेल.
कर्क : वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. घराच्या बांधकामाचा प्लॅन आज तयार करा.
सिंह : आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळवून देतील. आपणास वरिष्ठ अधिकार्यांकडून समर्थन मिळेल.
‘अतिपरिचयात अवज्ञा’ चा अनुभव येईल.
कन्या : कला क्षेत्रात यश मिळण्याची शयता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची शयता आहे. मानसन्मानात वाढ होईल. काहींना स्पर्धात्मक यश मिळेल.
तूळ : आज आपणास कठोर श्रम करावे लागेल. काही निष्कारण चिंतांमुळे आपली व्यग्रता वाढेल. वाहने व उपकरणे जपून वापरावीत. कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक जोखमीचे कार्ये टाळा.
वृश्चिक : आपला जोडीदार आपणास भावनात्मक पाठबळ देईल. एखाद्या महत्त्वाच्या
व्यक्तीशी भेट आपल्यासाठी आनंदाची ठरेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्यांपासून दूर राहा.
धनु : धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. आजचा दिवस कालच्या दिवसापेक्षा चांगला नसेल. पाठबळ मिळेल.
मनाला प्रसन्नता वाटेल. आरोग्य नरम-गरम राहील.
मकर : मित्रांमध्ये होणारे वाद आपल्या संबंधासाठी वाईट ठरतील. मानसिक स्थिती
आल्हाददायक राहील. संततीसौख्य लाभेल. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. व्यापारय्व्यवसायिकांना दिवस संमिश्र.
कुंभ : वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्न वातावरण राहील. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. नवीन वाहन खरेदीचे योग आहेत. व्यापारात वेळ मध्यम राहील.
मीन : व्यस्त राहाल. कौटुंबिक विषयां मध्ये पैसा खर्च होईल. इतर लोकांना आपल्या इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
अश्रू व घाम खारट का लागतात?
अश्रू व घाम खारट का लागतात?
घाम वा अश्रू खारट लागतात. याचा अनुभव तुम्हाला आलाच असेल. खूप रडल्यानंतर डोळ्यातून काही अश्रू अश्रूपिंडातून नाकाच्या पोकळीत व तेथून घशात येतात. खारट चव लागते. घामातील मिठाची कल्पना तुम्हाला उन्हाळ्यात येईल. उन्हाळ्यात खूप घाम येतो. घामाने कपडे ओलेचिंब होतात. वाळल्यानंतर कपड्यावर घामाचे क्षारयुक्त डाग पडतात. कधी कपड्यांवर हात फिरवल्यास क्षाराचा थर लागतो. शरीरातील पाणी व क्षार यांचा समतोल राखण्यासाठी घामाचा उपयोग होतो. डोळ्यातील आवरण, नेत्रपटल हे भाग कोरडे होऊ नयेत; धूळ वगैरे गेल्यास ती वाहून डोळे स्वच्छ व्हावे; यासाठी अश्रू खूप उपयोगी ठरतात. अश्रू व घाम या दोहोंमध्ये सोडियम लोराईड हा क्षार असल्याने (मीठ म्हणजे सोडियम लोराईड) ते खारट लागतात. हगवणीवर घरगुती उपाय म्हणून मीठ, साखर व पाणी यांचे द्रावण तयार करून ते पाजायला सांगतात. या द्रावणाची चव अश्रूंच्या इतकी खारट लागावी, असे सांगण्यात येते.
व्यायाम शरीरासाठी उपयुत
व्यायाम शरीरासाठी उपयुत
व्यायामाने शरीरातील स्नायूंना पुष्टी मिळते त्यांची ताकद वाढते. त्यामुळे सांध्यांच्या
हालचली नीट होतात. त्याचबरोबर जादा वाढणारी चरबी कमी होणे महत्त्वाचे असते.
वजन जास्त असेल तर वयाबरोबर जीर्ण होणार्या सांध्यांना हे वजन पेलवत नाही व
सांधेदुखी, गुढघेदुखी, कंबरदुखी हे विकार सुरू होतात. अर्थात घेतला जाणारा व्यायाम
नियमीत असावा. चक्रासनाने विशेषकरून कंबरदुखी नाहीशी होते. त्याचप्रमाणे दिवसभरात
७-८ ग्लास पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे आहे.
डाळ-मुळ्याचे पराठे
डाळ-मुळ्याचे पराठे
साहित्य : हरभरा डाळ २ टेबल स्पून
(भिजवून वाटून), मुळा १ कप (किसून),
हिरवी मिरची १ (बारीक चिरून), मिरची
पूड अर्धा टी स्पून, गव्हाचे पीठ १ कप,
तूप १ टेबल स्पून (मोहनासाठी) तेल पराठे
भाजण्यासाठी, मीठ चवीनुसार.
कृती : किसलेल्या मुळ्यात एक टी
स्पून मीठ मिसळून ५ मिनिटे ठेवा. नॉनस्टिक
पॅन गॅसवर ठेवून त्यात एक टीस्पून तेल गरम
करून चिमूटभर हिंग टाकून वाटलेली हरभरा
डाळ टाकून थोडे परता. मुळ्याचा किस पिळून
घ्या व कढईतील डाळीत टाकून व्यवस्थित
भाजून घ्या. पिठामध्ये मोहन, ओवा व मीठ
टाका. मुळ्याचे पाणी व साधे पाणी मिसळून
कणीक मळून घ्या व पंधरा मिनिटे राहू द्या.
नंतर कणकेच्या छोट्या गोळ्या बनवा. गोळी
लाटून त्यात मुळ्याचे मिश्रण भरून लाटी
बंद करून पुन्हा लाटून कुरकुरीत पराठा
भाजून घ्या. मुलांना लंच बॉसमध्ये हे पराठे
लोणच्यासोबत द्या.
वास्तू
ईशान्य दिशेसंबंधी
घराच्या भिंतींवर तडा, फरशीवर तडा
जाणे तसेच भिंतीवरचे प्लॅस्टर उतरणे यामुळे
सांध्याचे दुखणे, पाठीचे दुखणे, साइटिका
यासारखे आजार होतात. एझॉस्ट फॅन
गॅसपासून योग्य अंतरावर लावावा. गॅसवर हा
पंखा असणे चुकीचे असते.
ईशान्येकडून जर पाण्याची पाईप लाईन
आली असेल तर ईशान्येला पिण्याच्या
पाण्याची भांडी ठेवावीत. या दिशेला
मध्यभागापर्यंत पाणी ठेवण्याची व्यवस्था केली
तरी चालू शकते.






