एक वेडा म्हशीवर बसून जात होता…
दुसरा वेडा : अरे ए पोलीस पकडतील तुला
पहिला वेडा : का??
दुसरा वेडा : अरे हेल्मेट कुठे घातलेस तु??
पहिला वेडा : नीट बघ फोर व्हिलर आहे !!
दैनिक पंचांग शनिवार, दि. ४ मे २०२४
वरुथिनी एकादशी, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, चैत्र कृष्णपक्ष, पू.भा.२२|०७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : जर आपणास आपले निवासस्थान बदलण्याची इच्छा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो.
वृषभ : संपत्तीच्या खरेदी-विक्रीसाठीही उत्तम दिवस. आपण आपल्या घरासाठी मोठी खरेदी करू शकता. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : कार्य योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी कठोर श्रम करावे लागेल. व्यापार्यांसाठी परिस्थिती साधारण. आपणास
गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.
कर्क : यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शयता आहे. शत्रू वर्गापासून दूर राहा. आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल.
सिंह : आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा. जोडीदाराशी वादविवाद टाळा. कार्यातील अडचणी दूर होतील. आरोग्य उत्तम राहील. काहीकाळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल.
कन्या : अधिकार्यांकडून कामे करवू शकाल. अपत्यांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. वाहने व उपकरणे जपून वापरा. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील.
तूळ : व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल. सामाजिक कार्यांमध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल.
वृश्चिक : आजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.
धनु : अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. मान-सन्मानात वाढ होईल.
मकर : बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल.
कुंभ : आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. मित्रांचे सहकार्य मिळेल. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल.
मीन : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. धार्मिक भावना वाढेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
जगात भुते असतात का?
जगात भुते असतात का?
लहानपणापासून तुम्हाला भुताखेतांची भिती दाखवली गेली असेल. अंधार, बागुलबुवा तसेच भुते यांच्याबद्दल कोणत्याही लहान मुलाला भीती वाटतेच ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात, तसे भीती कमी होत जाते. खरेच का जगात भुते असतात? या प्रश्नाच्या दोन्ही बाजूंनी अत्यंत निर्धारपूर्वक बोलणारे अनेक जण भेटतील देव आहे किंवा नाही पुनर्जन्म आहे किंवा नाही; तसाच हाही एक वादाचा तर कधी वितंडवादाचा मुद्दा होऊ शकतो. माहिती नसलेल्या गोष्टींबद्दल गूढतेचे वलय निर्माण होतेच. त्यामुळेच सर्वांनाच भुतांच्या गोष्टीत कमालीचे स्वारस्य असते. भुते माणसाच्या मनात असतात. असे म्हणतात व ते खरे आहे. माणसाच्या मानसिक दौर्बल्याचा एक आविष्कार म्हणजे भूते होत. भुताचे अस्तित्व शास्त्राने अमान्य केले आहे. भूत हे कोणालाही सिद्ध करता आलेले नाही. भूताने झपाटणे, भूतबाधा आदि गोष्टी हे मनोविकार असल्याचे सिद्ध झाले आहे. बर्याचदा एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झालेली आहे, असे ठरवून मांत्रिकाकडे तिला नेण्यात येते. तेथे भूत उतरवण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीचा शारीरिक छळ केला जातो. कधी कधी ती व्यक्ती मृत्युमुखीही पडते. असे होणे हे सुसंस्कृत समाजासाठी एक लांछनच होय. भुतांचे अस्तित्वच नाही ती केवळ एक कल्पना आहे.
द्राक्षे आहे नॅचरल टॉनिक
द्राक्षे आहे नॅचरल टॉनिक
द्राक्षे हे मलावरोधावर उत्तम औषध आहे. तसेच त्यापासून तयार केलेल्या मनुकाही एक
चांगले टॉनिक आहे. पचनाच्या सर्व विकारांवर द्राक्षे उपयोगी आहेत. काळ्या मनुकांच्या सेवनाने
रत वाढते व हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. लहान मुले व विशेषता महिलांनी याचे सेवन केल्यास
हिमोग्लोबीनमध्ये लक्षणीय वाढ होते.
गार्लिक पोटॅटो
गार्लिक पोटॅटो
साहित्य : ४ बटाटे, २ मध्यम आकाराचे
कांदे, ७-८ लसूण पाकळ्या, लिंबाचा रस,
कोथिंबीर बारीक चिरून, साखर व मीठ
आवडीप्रमाणे, ४-५ सुया लाल मिरच्या.
कृती : बटाटे व कांद्याची साले काढून
पातळ लांबट फोडी कराव्यात. लाल मिरच्या,
मीठ व लसूण एकत्र वाटून घ्यावे. कढईत
पाव वाटी तेल गरम करून फोडणी करावी.
फोडणीत वाटण व कांदा परतून घ्यावा. त्यात
पाव चमचा हळद घालावी व बटाट्याच्या फोडी
घालाव्यात. झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी
शिजू द्यावी. लाल मिरचीमुळे भाजीला सुंदर
लाल रंग व स्वादही येतो. भाजी शिजल्यानंतर
२ टीस्पून लिंबाचा रस व कोथिंबीर घालावी.
वास्तू
शहनगृह
शयनगृहाचे अंतर्गत द्वार उत्तर, पूर्व,
ईशान्य अथवा इतर शुभ दिशेत असावे.
* बिछान्याची पलंगाची जागा नैर्ऋत्य
भागात असावी.
* शयनगृहास शयतो खिडया
कमीतकमी असाव्यात. मावळत्या सूर्याची
किरणे आत येणार नाहीत अशा प्रकारे त्यांची
रचना करावी.
* रोज सकाळी ९ ते ११ वाजेच्या
दरम्यान अग्नेय दिशेला तुपाचा दिवा लावावा.





