पाककला

0
25

फ्लॉवर-सुकामेवा कटलेट

साहित्य : एक कप फ्लॉवरचा कीस,
१०० ग्रॅम खवा, तेल, एक कप पनीरचा
कीस, एक कप भरड वाटलेला सुकामेवा
(काजू, बदाम, चारोळी, पिस्ता, अक्रोड इ.),
लिंबू, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,
हळद, मिरची पूड, गरम मसाला, दोन बटाटे
(उकडून), एक चमचा मैदा, ब्रेडचा चुरा,
मीठ, मोहरी, जिरे.
कृती : कढईत तेल तापवून मोहरी जिरे
तडतडवा. त्यात हळद, कांदा, हिरवी मिरची,
कोथिंबीर टाकून परता. बटाटे कुस्करून
घ्या. नंतर फ्लॉवर, पनीर, बटाटे व सुकामेवा
टाकून परता, खवा भाजून मिसळा. मिश्रणात
दही मिसळून व्यवस्थित परतून घ्या. मिश्रण
थाळीत पसरून गोल तुकड्यांत कापून घ्या.
मैद्याचे साधारण दाट पीठ बनवून त्यात कटलेट
बुडवून ब्रेडच्या चुर्‍यात घोळवून तेलात मध्यम
जाळावर तळून घ्या. सर्व्ह करताना थोडेसे
काळे मीठ टाकून टोमॅटो सॉससोबत स्वादिष्ट
फ्लॉवर सुकामेवा कटलेटचा आस्वाद घ्या