वास्तू

फर्निचरचे कोपरे व कडा गोलाकार
असाव्यात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

न्यूज रिपोर्टर : तुम्ही सर्व साधु लोक कुठे चालले आहात.
बाबा : समाधी घ्यायला
रिपोर्टर : का?
बाबा : जेव्हापासून व्हॉटस्अ‍ॅप आलं आहे मोठ-मोठे ज्ञानी
पैदा होतायेत. आता संसाराला आमची गरज
राहिली नाही.

दैनिक पंचांग बुधवार, दि. २२ मे २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख शुलपक्ष, स्वाती ०७|४७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. देवाण घेवाणीत त्रास. एखादे कार्य घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते.

वृषभ : मित्रांचा पाठिंबा राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पर्याप्त लाभ मिळणे कठीण. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा.

मिथुन : पत्नी व अपत्य यांच्याकडून अनुकूल स्थिती मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिकतेवर लक्ष्य द्याल. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्य नरम गरम राहील.

कर्क : अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. जास्त सहयोग मिळेल. प्रलोभनांना भुलू नका.

सिंह : व्यापारातील प्रतिस्पर्धेत वातावरण अनुकूल राहील. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. नोकरीपेशा व्यक्ती वायफळ खर्च टाळतील. एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल.

कन्या : प्रेम प्रकरणात आजचा दिवस चांगला आहे. व्यवहारिक दक्षता वाढवा. वाहने व उपकरणे जपून चालवावीत. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका.

तूळ : व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग प्राप्त होईल.

वृश्चिक : अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. आज व्यापार-व्यवसायात स्थिती मध्यम राहील.

धनु : विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. अचानक खर्च वाढेल. संततीसौख्य लाभेल. कोणतेही कार्य पूर्ण करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

मकर : आज करियरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. वास्तुयोग आहे. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धनलाभ मिळू शकते. धनलाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल.

कुंभ : आजारात खर्चाची शयता. मानसिकतेवर लक्ष्य द्या. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. राजकीय वातावरण आनंददायक राहील.

मीन : पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत सावधगिरी बाळगा. कामावर प्रभाव पडेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. नोकरदार सावधगिरीने काम करतील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

बोटांचे ठसे कसे मिळवतात?

बोटांचे ठसे कसे मिळवतात?

आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गाने या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची बनवलेली असते. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्त्राव करणार्‍या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळे तळहाताल एकप्रकारचे वंगण मिळत राहते. तसेच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथीमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटे टेकतात. तेव्हा ते घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचे मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूंवर चिकटते. तिथे त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात. बोटांच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे, अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही, बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शय होते. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगाराची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे.

ज्या वस्तूला बोटाचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यांतील घाम व स्निग्ध पदार्थांचे मिश्रण चिकटते; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो. बहुतेक भुकटीमध्ये रोझिन, काळ्या रंगाचे फ ेरिक ऑसाईड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटीमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबे, टायट्रॅनियम, बिस्मथ यासारखी रसायनेही असतात. ही भुकटी त्या वस्तूवर शिंपडली, की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशने हलया हाताने उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिकटवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तो संगणकातही स्टोरेज करता येतो.

सुविचार

पापाचा घडा भरला की, तो फुटल्याशिवाय राहात नाही.

मधुमेहींसाठी बदाम उपयुत

मधुमेहींसाठी बदाम उपयुत

बदाममध्ये कर्बोदके कमी असून प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्सचे प्रमाण जास्त
असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी बदाम खाणे योग्य ठरते. याशिवाय बदाममध्ये
मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. शरीरातील वेगवेगळ्या ३०० क्रियांसाठी मॅग्नेशियमची गरज
असते. मॅग्नेशियममुळे ब्लडशुगर नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी आहारात
बदामाचा समावेश करणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे डायबेटीस नसलेल्या लोकांनी आहारात
बदामाचा समावेश केल्यास डायबेटीस होण्यापासून दूर राहण्यास मदत होते.

ब्रेड-बटाटा रोल्स

ब्रेड-बटाटा रोल्स

साहित्य : ४ मोठे बटाटे उकडलेले,
१ टी स्पून तूप, जिरे, हिंग, हळद, १ वाटी
मैदा, अर्धी वाटी रवा, मीठ चवीप्रमाणे, मटार
दाणे १ वाटी, पुदिन्याची पाने बारीक चिरून,
डाळिंब्याचे दाणे पाऊण टी स्पून, किसलेले
आले १ टी स्पून, मोठ्या आकाराच्या बे्रड
स्लाईस.
कृती : उकडलेले बटाटे हाताने सोलून
कुस्करून घ्यावेत. मटारदाणे गरम पाण्यात
मीठ घालून थोडे वाफवून घ्यावेत. कढईत
१ चमचा तूप टाकून त्यात जिरे, हिंग, हळद
घालून फोडणी करावी. त्यातच थोडी बारीक
चिरलेली मिरची व किसलेले आले घालावे.
थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक
चिरलेली पुदिन्याची पाने घालावीत. बे्रडच्या
कडा काढून घ्याव्यात. मैद्यात पाणी घालून
पातळसर पेस्ट तयार करावी. एका ताटलीत
रवा घ्यावा.
बे्रडच्या स्लाईसवर लांबट आकारात
सारण घालावे व पाण्याचा हात लावून त्याचा
रोल करून घ्यावा. तयार रोल मैद्याच्या
पेस्टमध्ये बुडवून कोरड्या रव्यात घोळवून
घ्यावे. याच पद्धतीने सर्व रोल तयार करून
गरम तेलात खरपूस तळावेत.

कपड्यांची निगा

कपड्यांची निगा
* जर कपड्यांवर दुधाचे डाग पडले
असतील, तर अमोनिया मिसळलेल्या पाण्याने
कपडे धुवा.
* जर कपड्यावर शाई सांडली असेल
तर जास्त वेळ न वाया जावू देता पडलेल्या
डागावर पाणी शिंपडावे. डाग पडत नाही.

काळवंडलेली जागा

संत्र्याच्या सालीचा आतील भाग
काळवंडल्या जागी चोळल्यास डाग फिके
पडतील.

वास्तू

कॅश बॉसमध्ये फुक सिम्बॉल तीन
चिनी नाणी, पिरॅमिड ठेवावे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.