वास्तू

हॉलमध्ये उत्तरेच्या भिंतीवर धबधब्याचे
चित्र लावावे.

कपड्यांवर चहा, कॉफीचे डाग

* कपड्यांवर चहा, कॉफीचे डाग
असतील तर ते बोरॅसच्या वीस टक्के मि
श्रणात बुडवून ठेवा व नंतर गरम पाण्याने व
साबणाने धुवा.
* काही कारणाने घरातील फ्रिज
बंद असेल आणि चुकून पूर्ण नारळ खोवला
तर जादा झालेला किस वाया जातो किंवा
ठेवलेल्या वाटीस खवट वासही येतो. अशा
वेळेस लागेल तेवढाच नारळ खवून घ्यावा.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

बंगळूर मध्ये एका शिक्षकाने वर्गातील एका मुलाला कानाखाली मारले
त्यामुळे त्याला ५०,००० रूपये दंड आकारण्यात आला व तो दंड त्या
विद्यार्थ्याला देण्यात आला!
आमच्या वेळेला जर असे असते तर आज.. २-४ बंगले, ३-४ कार,
१०-२० एकर जमिनीचा मालक असतो….
लय बेदम मारायचे राव मास्तर

दैनिक पंचांग गुरुवार, दि. २३ मे २०२४

बुद्धपौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ति, शके
१९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख शुलपक्ष,
विशाखा ०९|१५
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रितीने कार्य करण्यास आपली मदत करेल.

वृषभ : कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा. शेयर व इतर कुठेही गुंतवणूक टाळा. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. शांत राहाण्याचा प्रयत्न करा.

मिथुन : खाणे-पीणे काळजीपूर्वक करा. शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.

कर्क : कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या.

सिंह : महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. घरातील वातावरण आनंददायी राहील. काम व इच्छित योजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.

कन्या : नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल.

तूळ : लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य उत्तम राहील. आपल्याला कार्यालयामध्ये अथवा घरामध्ये आज थोडा मनस्ताप
होण्याचा योग आहे. वाहने जपून चालवावीत.

वृश्चिक : आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. मागील उधारी उसनवारी वसुल
होईल.

धनु : आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. बाहेरचे पदार्थ, हॉटेलिंग वगैरे जपून करा. मागील उधारी वसुल होईल.

मकर : प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामााठी श्रम करावे लागतील.

कुंभ : व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बळात वाढ होईल. कुटुंबियांचा सहवास लाभेल.

मीन : कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल. आजारात खर्चाची शयता. योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

अंतराळवीर मलमूत्र विसर्जन कसं करतात?

अंतराळवीर मलमूत्र विसर्जन कसं करतात?

अंतराळवीर अन्नपचन कसे करतात? या प्रश्नाऐवजी खरे तर, ते मलमूत्र विसर्जन कसे करतात, हा अधिक कुतूहलाचा विषय आहे. कारण अंतराळातल्या क्षीण गुरूत्वाकर्षणबलाची अडचण या शारिरीक क्रियेमध्येच जास्त येते. जमिनीवर असताना आपण मलमूत्र विसर्जनाचे काम ज्या प्रकारे करतो त्यात गुरूत्वाकर्षणाच्या बलाचा जास्त वापर केला जातो; पण अंतराळात ते काम त्या प्रकारे होणे शय नसल्याने दुसरीच काहीतरी व्यवस्था करावी लागते. तशी करताना घन पदार्थ आणि द्रवपदार्थ यांच्यामध्ये फरक केला गेला आहे. द्रवपदार्थांची म्हणजेच मूत्राची विल्हेवाट लावण्यासाठी एका नळीचा वापर करण्यात येतो. त्या नळीमधून हवा ओढली जाते, त्यामुळे जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीतून मग मूत्र पुढं जात राहते. आणि नळीच्या शेवटी असलेल्या बंद पात्रात ते जमा होतं. पुरूषांसाठी या नळीच्या तोंडाशी एक नरसाळे बसवलेले असते, तर स्त्रियांसाठी एक कप असतो. ज्यांना श्वासोच्छ्वास करणे कठीण जाते अशांना सिलिंडरमधला ऑसिजन पुरवण्यासाठी नाकावर जसा कप बसवतात. त्याच प्रकारचा हा कप असतो. ते नरसाळे काय किंवा कप काय, शरीराला चिकटून बसवला की आपोआप एक सीलबंद प्रणाली तयार होते व त्यातून मूत्र खालच्या बंद पात्रात गोळा होते. मलविसर्जनासाठी वेगळी व्यवस्था करावी लागते. एक तर कमोडवर अंतराळवीर बसूही शकत नाहीत, कारण ते तरंगतच राहतात. त्या अवस्थेत मल तिथल्या तिथंच पसरून तरंगत इकडेतिकडे जाऊ शकते. एकंदरीत स्वच्छतेच्या व आरोग्याच्या दृष्टीकोनातून तसे होणे घातकच आहे. त्यासाठी अंतराळवीरांना मोटारीत असतो तसा सीटबेल्ट दिला जातो. तो बांधला की मग ते कमोडशी जखडून राहतात. त्या कमोडमधूनही हवेचा वेगवान झोत खालच्या दिशेने सोडला जातो. जसे मूत्र त्या नळीमधून हवेच्या प्रवाहाबरोबर खेचले जाते. तसाच तो मलपदार्थ हवेच्या झोताबरोबर खालच्या दिशेने खेचला जातो. तो सर्व परत एका पात्रात गोळा होतो. तिथे त्याचा अंतराळातल्या निर्वात अवस्थेशी संपर्क येतो. त्यामुळे त्यातले बाष्प, त्यातली ओल विरून जाते. फ्रीजड्राय केल्यासारखे ते अतिशीत अवस्थेत ते कोरडे बनते. त्या अवस्थेतल्या मलाने ते पात्र भरले की ते मग घर्षणाने उत्पन्न होणार्‍या उष्णतेत पेट घेते. आणि जळून जाते. वातावरणात शिरलेल्या उल्काही अशाच जळून जाते. त्या पाहून आपण तारा तुटला असे म्हणतो; पण पुढच्या वेळी तुम्ही असा तुटलेला तारा बघाल तेव्हा कदाचित उल्केऐवजी ते अंतराळवीरांना टिकून दिलेले एक मलपात्रही असू शकेल.

सुविचार

एक पाप लपवण्यासाठी माणसाला दुसरे पाप करावे लागते.  : इमर्सन

अतिरीक्त फॅटस् कमी करण्यासाठी

अतिरीक्त फॅटस् कमी करण्यासाठी

शरीरातील चरबी अथवा मास उष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून
एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी,
कोल्डड्रिंस किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून
उष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक
सर्व औषधे पाचकस्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी,
कोल्डड्रिंस, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम
एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यासाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचकस्राव
विस्तवासारखे उष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल याचा
आपणच विचार करा.

बटाट्याचे काप

बटाट्याचे काप

साहित्य – २ मोठे गोल आकाराचे
बटाटे, मीठ, तिखट, तेल, कोथिंबीर.
कृती – बटाट्याची साले काढून
धुऊन घ्यावेत. त्याच्या गोल पातळ चकत्या
कराव्यात. त्यांना तिखट, मीठ लावून घ्यावे.
तव्यावर एक मोठा चमचा तेल टाकून त्यावर
या बटाट्याच्या चकत्या घालून झाकण ठेवावे.
मंद आचेवर चांगली वाफ आणून दोन्ही बाजूंनी
खमंंग भाजाव्यात. शेवटी बारीक चिरलेली
कोथिंबीर घालावी.

पाणी कधी प्यावे?

पाण्याच्या साहाय्याने शरीरातील पाचन
व शोषणाची क्रिया होते. आतील कोठ्याची
स्वच्छता होते. मळ बाहेर निघतो. रक्त
पातळ राहते. रसोत्पादक ग्रंथी पाण्याच्याच
मदतीने आपले कार्य करतात. अशा प्रकारे
पिण्याच्या पाण्याचा आरोग्याशी फार महत्त्वाचा
संबंध आहे. साधारणपणे दिवसा रात्रीतून
तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे. जेव्हा खूप
भूक लागली असेल तेव्हा पाणी पिऊ नये,
भोजन करताना मध्ये थोडेच पाणी प्यावे.
भोजनानंतर, एकदोन तासांनी जेव्हा तहान
लागते तेव्हा यथेच्छ पाणी प्यावे. नेहमी पाणी
घोट घोट असे हळूहळू शांत चित्ताने प्यावे.
त्यामुळे पाण्याबरोबर तोंडातील लाळ मिसळून
ते पाचक स्वादिष्ट होते व त्याने तहान पूर्णपणे
भागते.

चेहर्‍यावरील गाठींसाठी

चेहर्‍यावरील गाठींसाठी
टोमॅटो व नारळपाण्यात आले किंवा
लिंबाचा रस अर्धा चमचा टाकून घेतल्याने
शरीरात झालेल्या चेहर्‍यावर झालेल्या गाठी
नाहीशा होतात. चेरी-पालक-टोमॅटो यांचा
रस अधिक लाभदायी आहे. कोमट पाण्यात
लिंबाचा रस, तुळशीचे पाने, गहू व ज्वारीचा
रस गाठींवर औषधासारखे काम करतो.