दैनिक पंचांग बुधवार, दि. २२ मे २०२४

0
61

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख शुलपक्ष, स्वाती ०७|४७
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. देवाण घेवाणीत त्रास. एखादे कार्य घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते.

वृषभ : मित्रांचा पाठिंबा राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पर्याप्त लाभ मिळणे कठीण. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा.

मिथुन : पत्नी व अपत्य यांच्याकडून अनुकूल स्थिती मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. मानसिकतेवर लक्ष्य द्याल. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्य नरम गरम राहील.

कर्क : अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. जास्त सहयोग मिळेल. प्रलोभनांना भुलू नका.

सिंह : व्यापारातील प्रतिस्पर्धेत वातावरण अनुकूल राहील. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. नोकरीपेशा व्यक्ती वायफळ खर्च टाळतील. एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल.

कन्या : प्रेम प्रकरणात आजचा दिवस चांगला आहे. व्यवहारिक दक्षता वाढवा. वाहने व उपकरणे जपून चालवावीत. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका.

तूळ : व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. वडिलधार्‍यांचे सहकार्य मिळेल. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग प्राप्त होईल.

वृश्चिक : अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. आज व्यापार-व्यवसायात स्थिती मध्यम राहील.

धनु : विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. अचानक खर्च वाढेल. संततीसौख्य लाभेल. कोणतेही कार्य पूर्ण करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा.

मकर : आज करियरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. वास्तुयोग आहे. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धनलाभ मिळू शकते. धनलाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल.

कुंभ : आजारात खर्चाची शयता. मानसिकतेवर लक्ष्य द्या. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. राजकीय वातावरण आनंददायक राहील.

मीन : पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत सावधगिरी बाळगा. कामावर प्रभाव पडेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. नोकरदार सावधगिरीने काम करतील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर