ब्रेड-बटाटा रोल्स

0
103

ब्रेड-बटाटा रोल्स

साहित्य : ४ मोठे बटाटे उकडलेले,
१ टी स्पून तूप, जिरे, हिंग, हळद, १ वाटी
मैदा, अर्धी वाटी रवा, मीठ चवीप्रमाणे, मटार
दाणे १ वाटी, पुदिन्याची पाने बारीक चिरून,
डाळिंब्याचे दाणे पाऊण टी स्पून, किसलेले
आले १ टी स्पून, मोठ्या आकाराच्या बे्रड
स्लाईस.
कृती : उकडलेले बटाटे हाताने सोलून
कुस्करून घ्यावेत. मटारदाणे गरम पाण्यात
मीठ घालून थोडे वाफवून घ्यावेत. कढईत
१ चमचा तूप टाकून त्यात जिरे, हिंग, हळद
घालून फोडणी करावी. त्यातच थोडी बारीक
चिरलेली मिरची व किसलेले आले घालावे.
थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर व बारीक
चिरलेली पुदिन्याची पाने घालावीत. बे्रडच्या
कडा काढून घ्याव्यात. मैद्यात पाणी घालून
पातळसर पेस्ट तयार करावी. एका ताटलीत
रवा घ्यावा.
बे्रडच्या स्लाईसवर लांबट आकारात
सारण घालावे व पाण्याचा हात लावून त्याचा
रोल करून घ्यावा. तयार रोल मैद्याच्या
पेस्टमध्ये बुडवून कोरड्या रव्यात घोळवून
घ्यावे. याच पद्धतीने सर्व रोल तयार करून
गरम तेलात खरपूस तळावेत.