हसा आणि शतायुषी व्हा!

शहरातल्या मुलीच खेड्यात लग्न झालं.
सकाळी सकाळी सासू म्हणाली, “म्हशीला खायला घाल.”
सून गोठ्यात गेली म्हशीच्या तोंडाला फेस बघून परत आली.
सासू सुनेला म्हणाली, “टाकला का चारा”
सून म्हणाली, “ती अजून ब्रश करते आहे.”

दैनिक पंचांग मंगळवार, दि. २१ मे २०२४

श्रीनृसिंह जयंती, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, वैशाख शुलपक्ष, स्वाती अहोरात्र
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य 

मेष : व्यापारिक करार व व्यवहारातसावधगिरी बाळगा. आपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. वातावरण उत्साहवर्धक राहील. आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ : पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल.

मिथुन : आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम वेळ आहे. वाहनसुख मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा.

कर्क : आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण जे काही शिकला असाल ते सांगू शकाल. कोणतेही कार्य पूर्ण करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. यश मिळणार नाही.

सिंह : धन लाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. आज व्यापार-व्यवसायात स्थिती मध्यम राहील. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.

कन्या : नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो. विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल.

तूळ : राजकीय वातावरण आनंददायक राहील. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग प्राप्त होईल. शांत रहा. व्यापारात नवीन करार होतील. आर्थिक आणि सामाजिक कामांमुळे अडथळे. कामांची गती मंदावेल.

वृश्चिक : भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. आरोग्य नरम गरम राहील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा. वेळ सत्कारणी लागेल. राहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते.

धनु : एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. अनपेक्षित फायदा करून देणार्‍या काही घटना घडतील. आपल्या संपर्कात येणार्‍या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे.

मकर : प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. खाणे-पीणे काळजीपूर्वक करा. जबाबदारीचे कार्य मिळतील. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल.

कुंभ : आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा. शेयर व इतर कुठेही गुंतवणूक टाळा. काही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.

मीन : निराशा वाढेल. कोणतेच काम सुरळीत होणार नाही. प्रलोभनांना भुलू नका. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

अंतराळवीर अन्न कसं पचवतात?

अंतराळवीर अन्न कसं पचवतात?

आपल्याला आपण खाल्लेलं अन्न पचवताना जड जात नाही. आपल्या शरीराची ती एक अनैच्छिक क्रिया आहे. म्हणजे अन्नपचन आपोआप होत असतं. त्यासाठी सामान्यतः आपल्याला काही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत. मग अंतराळवीराच्या बाबतीतच हा प्रश्न का उठावा? सर्वसामान्यपणे अंतराळात गुरूत्वाकर्षण नसतं असा समज आहे. अंतराळवीरांना आपल्या यानात तरंगत असताना टीव्हीवर आपण पाहिलेलं असतं. तिथे जर काडी पेटवून ज्योत निर्माण केली तर ती वर उफाळत नाही. तिथल्या तिथंच घोटाळत राहते. त्यामुळं अन्न, पाणी सगळंच तरंगत असणारं असं आपण समजतो. ते तसं खरंही आहे. म्हणूनच मग, अंतराळवीर पाणी कसं पितात? प्यालेलं पाणी किंवा खाल्लेला अन्नाचा गोळा खाली पोटात कसा उतरतो? असा प्रश्न पडतो. आणि अन्न पचण्यासाठी ते आधी जठरात उतरायला हवं. तसं झालं तरच तिथं मग अन्नपचनाच्या रासायनिक प्रक्रियेला सुरूवात होईल. म्हणूनच हा प्रश्न आपल्याला पडतो. खरंतर जमिनीवरही केवळ गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावापोटी आपण घेतलेला घास जठरात उतरत नाही. आपल्या अन्ननलिकेला जोडलेले स्नायू आकुंचन-प्रसरण पावत तो पुढंपुढं सरकवत राहतात. तेव्हा अंतराळातही स्नायूंची तीच प्रक्रिया पार पडत असते.

अन्न घन असतं. ते आपण तोंडात सरकवत असतो. नुसतंच हवेतून ते तोंडात पडत नाही. तिथंही ते चावलं जाऊन लाळेत मिसळतं. आणि मगच लगदा पुढे सरकतो. अंतराळातही तीच प्रक्रिया पार पडते. त्यात कोणतीही अडचण येत नाही. पाणी किंवा कोणताही द्रवपदार्थ पिताना काही वेळा गुरूत्वाकर्षणाचा प्रभावच कारणीभूत ठरतो. तर त्यासाठी तो द्रवपदार्थ स्ट्रॉसारख्या नळीतून तोंडात ओढून घेता येतो आणि पुढंही मग केवळ गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली त्याची पुढची वाटचाल न होता अन्ननलिकेच्या स्नायूंच्या करामतीपोटी तो जठरात उतरतो. अंतराळात गुरूत्वाकर्षणाच्या बलाची मात्रा क्षीण असते, त्यामुळे अंतराळवीरासकट सगळ्याच गोष्टी तरंगतात. त्यामुळं जेवणाचं ताट किंवा त्यातले पदार्थ तरंगत दूर जाऊ नयेत म्हणून ते घट्ट करून ठेवावे लागतात. जशी तूपसाखर पोळी खाताना ती गुंडाळी आपण धरून ठेवतो तशी. तेवढी बाब सांभाळली की अंतराळातलं क्षीण गुरूत्वाकर्षण अन्नपचनाच्या आड अजिबात येत नाही.

सुविचार

पुण्य ते जाणा रे, भाईनो परउपकाराचे. : संत तुकाराम

गुलाबाचे आरोग्यदायी लाभ

गुलाबाचे आरोग्यदायी लाभ
गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या चावल्याने किंवा उकळून तयार केलेल्या काढ्याने गुळण्या
केल्याने आराम मिळतो. रात्रभर वाळलेल्या गुलाबाचं फुल पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी
चुरगळून पाणी गाळून घ्यावें. यात दोन चमचे साखर मिसळून प्यावे. याने पोटातील उष्णता
कमी होते आणि आराम मिळतो.

मलई पेढा

मलई पेढा

साहित्य : गाईचे दूध एक लिटर,
अर्धी वाटी दही, अर्धी वाटी साखर, दोन मोठे
चमचे कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा वेलदोडापूड,
दोन चमचे बदाम-पिस्ते काप, सहा-सात
केशराच्या काड्या चुरून.
कृति : अर्धी वाटी दूध बाजूला काढून
उरलेलं दूध तापायला ठेवावं आणि आटवून
निम्मे करावे. दही चमच्याने फेटावे. फेटताना
त्यात बाजूला ठेवलेल्या दुधातले दोन चमचे
दूध घालावे. आटवलेल्या दुधात साखर घालून
गॅस जरा मोठा करावा. उकळी आली की
फेटलेल्या दह्याची धार त्यात धरावी व मंद
आचेवर ढवळत राहावे.
दूध फाटले की कॉर्नफ्लोअर व उरलेले
गार दूध एकत्र करून त्यात ओतावे. सतत
ढवळावे. पुन्हा गॅस मोठा करावा. मिश्रण
घट्ट होऊन खव्यासारखे दिसायला लागले
की उतरवावे. त्यात वेलदोडापूड मिसळावी.
गार झाल्यावर हव्या तेवढ्या आकाराचे पेढे
वळावेत व त्यावर चुरलेले केशर, बदाम-पिस्ते
काप लावून सजवावे. बिस्कीटकटरे हवा तो
आकारही देता येतो.

सौंदर्य राखण्यासाठी

सौंदर्य राखण्यासाठी
प्राचीन आयुर्वेद सांगते की, योग्य आहार
घ्या. दिनचर्या रेखीव ठेवा. जागरण टाळा.
सहा तासांची सलग झोप घ्या. मन प्रसन्न
ठेवा म्हणजे वृद्धत्व दूर राहील. नुसत्या सौंदर्य
प्रसाधनाच्या पेलणाने सौंदर्य टिकणार नाही.
सुरकुत्या येत राहतील. कोवळीक नष्ट होईल.
रोज किमान १०-१२ ग्लास पाणी पोटात
कसे जाईल ते पहा. शरीरातल्या पेशींना
पाण्याची गरज असते. त्यात जर तहानलेल्या
राहिल्या तर तुमचे सौंदर्य ओसरू लागेल.

चेहर्‍यावरील काळवंडलेपणा

* लिंबोळ्याच्या बिया ताकात वाटून
चेहर्‍यावर चोळल्यास काळवंडलेपणा हटतो.
* तांदूळ धुतलेल्या पाण्यात जायफळ
उगाळून लावावे, मुरमे सुकतात.

वास्तू

* स्नानगृह व शौचालयाच्या भिंतींना
नेहमी पांढरा, फिकट निळा आणि आकाशी
असे फिकट रंग द्यावेत.
* एखाद्या टीपॉयवर किंवा कपाटावर
मुख्य दरवाजाकडे तोंड करून लॉफिंग बुद्धाची
मूर्ती ठेवावी. जमिनीवर ठेवू नये.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

डॉटर : बाळा आ कर आ
आई : त्याला फत इंग्लिश कळतं
डॉटर : बरं, बाळा, ‘ओपन योर माऊथ’
आई : थांबा, मी सांगते. ‘बाळा, डू आ, डू आ…
‘सेमी इंग्लिश’ आहे तो…