आरोग्यास हितकारक आवळा

आरोग्यास हितकारक आवळा
आवळ्याला आयुर्वेदानुसार अमृतफळ
असे म्हटले जाते. आवळा हा आरोग्यास
अत्यंत हितकारक आहे. त्याचे काही फायदे – हृदयरोग होत नाही. वजन कमी करण्यास
मदत होते. पचनप्रक्रिया सुरळीत होते.
चेहरा चमकदार आणि डागमुक्त होतो. मधुमेह
नियंत्रणात राहतो. डोळ्यांची दिसण्याची क्षमता
वाढते.

मुखविलास लाडू

मुखविलास लाडू

साहित्य : ३ वाट्या हरभरा डाळ,
३ कप दूध, दीड ते २ वाट्या साजूक तूप,
दीड वाटी खवा, अर्धी वाटी काजू-बेदाणे, १
लहान चमचा जाडसर कुटलेली वेलदोडा पूड,
४ वाट्या साखर, पाव चमचा केशर.
कृति : हरभरा डाळ स्वच्छ धुवून
दुधात भिजत घालावी. ४ तासानंतर मिसरवर
वाटून घ्यावी. कढईत तूप तापवून मंद आचेवर
वाटलेली डाळ मोकळी होईपर्यंत परतावी.
गुलाबीसर झाली आणि तूप सुटू लागलं की
काढून घेऊन खवा परतावा. डाळ, खवा, काजू
आणि बेदाणे एकत्र करावे. नंतर साखरेत १
वाटी पाणी घालून ३ तारी पाक करावा. खाली
उतरवून त्यात केशर-वेलदोडा आणि एकत्र
केलेलं साहित्य घालून मिश्रण आळलं की लाडू
वळावे. हे लाडू जरा ओलसर असतात. त्यामुळं
जेवणात पक्वान्न म्हणून चांगले लागतात. मात्र,
२-३ दिवसापेक्षा जास्त टिकत नाहीत.

वास्तू

दरवाजा संबंधी
* शुभप्रसंगीचे निमंत्रण वा बोलावणे
दरवाजाच्या उंबरठ्यावर स्वीकारू नये वा
कुणाला दरवाजात उभे राहू देऊ नये.
* शयनगृहात पाणी असणारी वस्तू
म्हणजे माशांचा टँक किंवा झर्‍याचे वा
समुद्र किनार्‍याचे चित्र असता कामा नये.
यामुळे पती-पत्नीच्या आपसातील संबंधांवर
खूपच वाईट परिणाम होतात. जर आपल्या
शयनगृहात पाण्याचे भांडे वा चित्र असेल तर
तेथून उचलून दूर ठेवावे.

ग्रेव्ही बनवताना

ग्रेव्ही बनवताना त्यामध्ये एक चमचा
बेसन टाकले तर ग्रेव्ही स्वादिष्ट व दाट
बनते.

ऑईली त्वचेसाठी

ऑईली त्वचेसाठी

अशा त्वचेतील
तेलग्रंथीतून बाहेर पडणार्‍या तेलामुळे मुरमे
व टॅनिंगचा धोका असतो. तो टाळण्यासाठी
चंदन पावडरमध्ये थोडीशी तुळशीची पाने
व गुलाबपाणी मिसळून चेहर्‍यावर लावावे
व वाळल्यानंतर धुवावे. या मास्कने त्वचा
तुकतुकीत होते व रोमछिद्रे बंद होतात.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

हसा आणि शतायुषी व्हा!

नवरा : कुठे गेली होतीस?
बायको : रतदान करायला
नवरा : हे बरोबर नाही…माझं प्यायचं
आणि बाहेर जाऊन दान करायचं.

दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ७ जून २०२४

दशहरारंभ, करिदिन, शके १९४६
क्रोधीनामसंवत्सर, ज्येष्ठ शुलपक्ष, मृग
१९|४३
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३२ मि.

राशिभविष्य

मेष : आजचा दिवस आपल्या कार्य योजनेंसाठी आणि सहकार्यां बरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. व्यापार व्यवसायात देवाण-घेवाण टाळा.

वृषभ : अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. शत्रूंपासून सावध राहा.

मिथुन : बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य राहील. आपणास गरज असेल तेव्हा सहकार्य मिळेल.

कर्क : आपणास एखाद्या योजनेसाठी इतरांचे सहकार्य हवे असेल तर तसे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा

सिंह : आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या.
हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो.

कन्या : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवाल.

तूळ : घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील.

वृश्चिक : सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

धनु : व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्यांकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला संताप येईल, असे बोलाल. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य उत्तम राहील.

मकर : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगताल.

कुंभ : आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो. आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.

मीन : कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्र राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवावे की भांड्यात?

अन्न प्रेशर कुकरमध्ये शिजवावे की भांड्यात?

आता घरोघरी प्रेशर कुकर आले आहेत. पण मला आठवते; २५ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरात प्रेशर कुकर आला तेव्हा माझ्या आजोबांनी, “छे! प्रेशर कुकरमधल्या डाळ-भाताला काही चवच नसते!” असे म्हणून स्वतःसाठी वेगळा भात आणि वरण करायला लावले होते. आजही काही लोकांना तसे वाटते. आहारशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवल्याने त्यातील पोषक पदार्थांचा नाश होत नाही. प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजत असल्याने अन्नावर उष्णतेचा परिणाम जास्त होत नाही व त्यातील जीवनसत्त्वे वगैरे टिकून राहतात. दाबाखाली पाणी उकळवल्यास पाण्याचा उत्कलनबिंदू कमी होतो व त्यामुळे पाणी लवकर उकळायला लागते व अन्न लवकर शिजते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न लवकर शिजत असल्याने इंधनही कमी लागते.

आपल्या देशात कित्येक घरांमध्ये चुलीवर स्वयंपाक करतात. प्रेशर कुकरच्या वापराने सरपण, कोळसा, रॉकेल वा गॅस या इंधनांचा वापर कमी होईल. यामुळे इंधनाची बचत तर होईलच, पण हवेचे प्रदूषणही कमी होईल. एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, ती म्हणजे काहीजण प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवून झाल्यानंतर कधीकधी उतू जाऊन खाली पडणारा भात, डाळ वगैरे फेकून देतात. भातावरचे वा डाळीवरचे पाणी काढून टाकतात. हे अत्यंत चुकीचे आहे. कारण या पाण्यात अमिनो आम्ले व जीवनसत्त्वे असतात. हो एक सांगायचे राहिलेच! सुरुवातीला प्रेशर कुकरच्या भात-वरणाला नाक मुरडणार्‍या आमच्या आजोबांना आज मात्र प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले भात-वरणच लागते!

सुविचार

आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मन:स्थिती चांगली असावी लागते.

गुडघेदुखीसाठी उपयुत गुळ

गुडघेदुखीसाठी उपयुत गुळ
* गुडघ्यांचा त्रास कमी होतो – गूळ
खाल्ल्याने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो.
दररोज अदरकचा एक लहान तुकड्या बरोबर
गूळ मिसळून खाल्ल्याने गुडघे मजबूत होतात
आणि दुखणे दूर होते.
* रक्ताचे शुद्धीकरण – गूळ रक्ताला
शुद्ध करतो. त्याला दररोज आपल्या आहारात
सामील करा.
* पोट ठीक ठेवणे – पचन संबंधित
सर्व समस्यांना गूळ खाऊन दूर करू शकता.