हवाबंद डब्यातील अन्न खाल्ल्याने विषबाधा होते का?
घरगुती पद्धतीने साठवलेल्या भाज्या, खारवलेले मासे, घरी बनवलेले चीज अशा आम्लाचे प्रमाण कमी असलेल्या पदार्थांमुळे बोटूलिझम नावाची अन्नविषबाधा होते. अन्नविषबाधेचा हा एक भयंकर पण सुदैवाने क्वचित आढळणारा प्रकार आहे. लॉस्ट्रीडीयम बोटूलिनम नावाच्या जिवाणूपासून निर्माण होणार्या विषद्रव्यामुळे ही विषबाधा होते. हे विष अतिशय विषारी असते. इतके विषारी की १०० ग्रॅम विषामुळे जगातील सर्व लोक मृत्युमुखी पडतील. लॉस्ट्रीडीयम बोटूलिनम हा जिवाणू माती, धूळ आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये सापडतो. या जीवाणूच्या कोषावस्था अन्नावाटे माणसाच्या शरीरात जातात. असे अन्न खाल्ल्यानंतर १२ ते ३६ तासांत विषबाधेची लक्षणे दिसून येतात. ऑसिजन नसलेल्या अवस्थेत विषाची निर्मिती होते. हे तयार असलेले विष आपण सेवन करतो व त्यामुळे विषबाधा होते. हे विष मज्जासंस्थेवर विपरित परिणाम करते.
या विषबाधेत-गिळायला त्रास होणे, एका ऐवजी दोन वस्तू दिसणे, पापण्या उघडता न येणे, सांधे दुखणे, दृष्टीवर परिणाम होणे, हातपाय गळून जाणे व लुळे पडणे; अशी लक्षणे दिसतात. श्वसन थांबल्याने व हृदयाचे कार्य थांबल्याने मृत्यू येतो. या विषबाधेच्या उपचारामध्ये बोटूलिनम साठीच्या प्रतिविषाचा प्रामुख्याने उपयोग करतात. मेंदूतील पेशींवर विषाचा परिणाम झालेला नसेल तरच हे प्रतिविष उपयुक्त ठरते. बोटूलिनम टॉसाईडने लसीकरण केल्यास या रोगाचा प्रतिबंध करता येतो. चांगली चिकित्सा सेवा व शुश्रूषा मिळाल्यास रोगी वाचू शकतो. या विषाचा विषारीपणा उष्णतेमुळे नाहीसा होतो. त्यामुळे अन्न १००० सेंटीग्रेड तापमानाला काही मिनिटे तापवले, तर विषबाधेचा धोका राहणार नाही. सर्वात चांगले म्हणजे रोज ताजे अन्न खावे.