सुई गंजण्यापासून वाचवण्यासाठी

जर सुई गंजण्यापासून वाचवायची
असेल तर ती एखाद्या पावडरच्या जुन्या
डब्यामध्ये ठेवा. ती गंजणार नाही.

वास्तू

अभ्यासिकेत पश्चिमेला किंवा दक्षिणेला
तोंड करून अभ्यासाला बसू नये. एकाग्रता
भंगते. ऐन परीक्षेच्या काळात आजारपणाला
तोंड द्यावे लागते. अभ्यासिकेत ईशान्येस
पाण्याचा माठ किंवा पिण्याच्या पाण्याचे
पिंप ठेवावे. अभ्यासिकेत पूर्व अथवा ईशान्य
बाजूला श्रीगजानन महाराज (चौसष्ट कलांचा
स्वामी आणि प्रथम वंदनीय, शुभकार्य साधक
म्हणून) आणि देवी सरस्वतीची, (विद्येची
देवता) मूर्ती, फोटो ठेवावे. पुस्तकांच्या
शेल्फ-मांडणीची रचना पूर्वेला किंवा शयतो
उत्तरेला करावी.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

 हसा आणि शतायुषी व्हा!

गुरुजी : तुझी हजेरी कमी आहे,
तू परीक्षेला नाही बसू शकत!
गण्या : फिकीर नॉट गुरुजी, आपल्याला
जराबी घमेंड नाय, आपून
उभ्यानेच पेपर लिहू बघा !
गुरुजींनी शाळा सोडली…

दैनिक पंचांग गुरुवार, दि. १३ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ शुलपक्ष, पूर्वा २९|०९
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : मैदानी खेळात सहभागी व्हाल. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. अचानक जुने मित्र भेटतील. कुटुंबातील सदस्यांबरोबर किंवा मित्रांबरोबर आनंदाचे क्षण अनुभवाल. आज आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.

वृषभ : स्पर्धात्मक परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा.

मिथुन : जोडीदाराला समजावून घ्याल. तुमचे व्यक्तिमत्त्व आज बहरेल. सहनशीलतेने कार्यरत राहाल. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

कर्क : मानसिक ताण शय. कठोर बोलणे वा सहकार्‍यांशी गैरवर्तणूक महागात पडेल. आरोग्य नरम-गरम राहील. प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील.

सिंह : प्रिय व्यक्तीविषयी शंका घेऊ नका. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. शत्रू पराभूत होतील. संभाषणात सावधगिरी बाळगा.

कन्या : आर्थिक गुंतवणुकीतून योग्य तो मोबदला मिळेल. नात्यामध्ये कटुता टाळा. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक कराल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील.

तूळ : वाहने व उपकरणे जपून वापरावीत. जोडीदाराबरोबर रोमँटिक क्षण अनुभवाल. वैवाहिक आयुष्य बहरेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक : कार्यालयाच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवा. सहकार्‍यांशी आपुलकीने वागा. अति खाणे टाळा. आरोग्य उत्तम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा.

धनु : शारीरिक व्यायाम अथवा योगाचे महत्त्व लक्षात घ्या. घरातील ज्येष्ठांशी प्रेमाने बोला. अति प्रमाणात प्रवास करावा लागेल. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. सकारात्म क ऊर्जेने कार्यरत राहाल. आर्थिक स्थितीमध्ये बदल घडतील. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.

कुंभ : अनावश्यक गोष्टींचा विचार करू नका. मानसिक बळ वाढेल. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. उत्तरार्धात आर्थिक आवक वाढेल.

मीन : कर्जाऊ रक्कम देणे टाळावे. व्यवसायात भागीदारी तूर्तास नको. वैवाहिक आयुष्यात थोडे निवांत क्षण अनुभवाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम वेळ आहे. वाहनसुख मिळेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

उपास करणे चांगले की वाईट?

उपास करणे चांगले की वाईट?

उपास करणे म्हणजे धार्मिक असणे, असा समज आढळून येतो. उपास करणे चांगले की वाईट, या प्रश्नाचा विचार आपण आरोग्याच्या दृष्टीने करणार आहोत. निसर्गोपचारात उपवासाचे महत्त्व खूपच आहे. अजीर्ण झाल्यावर काही खावेसे वाटत नाही, करपट ढेकरा येतात; त्यामुळे आपोआपच उपास घडतो. तुम्ही अनुभवले असेल की, अशा उपासानंतर तुम्हाला बरे वाटते. यावरून निष्कर्ष काढता येईल की, पचनसंस्थेवर जास्त ताण पडला असेल तर उपास करून तिला विश्रांती देणे चांगले. आमच्या एक मावशी खूप उपास करतात. मंगळवार देवीचा, गुरुवार बालाजीचा, तसेच एकादशी, चतुर्थी एक ना दोन. पुन्हा सगळे उपास कडकडीत. “मी बई तोंडात पाणीसुद्धा टाकत नाही…” इति मावशी. त्यामुळे काही वेळा आठवड्यात तीन-तीन दिवस त्या अन्नपाण्यावाचून असतात.

याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झालाय. शरीर अगदीच तोळामासा झाले आहे. उपासाने त्यांना किती पुण्य मिळालंय, हे देवच जाणे; पण स्वर्गात जायचे झाले तर वजनाची अडचण येऊ नये याची तजवीज त्यांनी आधीच करून ठेवलीय! आठवड्यात एकदा उपास करणे चांगले, कारण त्यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो; परंतु उपासाचा अतिरेक नको. विशेषतः मधुमेह, क्षयरोग, रक्तदाब, हृदयरोग, इतर दीर्घ मुदतीचे रोग असलेल्या व्यक्तींनी (ज्या रोगांमध्ये दररोज औषधे घ्यावी लागतात) डॉटरांना विचारून मगच उपास करावेत. मधुमेहात तर उपासाचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे चांगले. जिवंत राहिल्यास खूप पुण्य मिळवता येईल. म्हणतात ना, “सिर सलामत तो पगडी पचास!”

सुविचार

मनुष्य फुलांचा रंग कदाचित विसरून जाईल; पण त्याचा सुगंध दीर्घ काळपर्यंत मेंदूत दरवळत राहील.

सौंदर्यवर्धनासाठी मटार

सौंदर्यवर्धनासाठी मटार
भाजलेल्या ठिकाणी मटारची पेस्ट करून
लावली तर लगेच आराम मिळतो आणि होणारी
जळजळही कमी होते. काहीजण मटारची पेस्ट
करून तिचा वापर स्क्रबसारखाही करतात.
यामुळे त्वचा उजळते.
पण अनेकजण मटारचे दाणे फ्रिजरमध्ये
साठवून ठेवतात आणि मटारचा मोसम निघून
गेला तरी ते जेवणात वापरतात, पण असं
करणं चुकीचं आहे. कारण यामुळे मटारमधील
पोषणमूल्ये कमी होतात.

पेरूचे पंचामृत

पेरूचे पंचामृत

साहित्य – एक किलो मोठे पेरू, अर्धी
वाटी भाजलेल्या तिळाचा कूट, एक वाटी ओले
खोबरे, बारा-पंधरा हिरव्या मिरच्या, पंधरा
वीस कढीलिंबाची पाने, दोन मोठे चमचे चिंचेचा
कोळ, अर्धी वाटी गूळ, चवीला मीठ, हवे
असल्यास तिखट, एक चमचा गोड मसाला,
अर्धी वाटी काजूचे तुकडे, फोडणीसाठी अर्धी
वाटी तेल, मोहरी, हिंग, हळद, चिमूटभर मेथी
पूड.
कृति – पेरूच्या बिया काढून फोडी
कराव्यात. बियांचा भाग थोडे पाणी घालून
शिजवून घ्यावा. कुस्करून किंवा हलकेच
मिसरमधून काढून गाळून घ्यावा आणि बिया
फेकून द्याव्या. खोबरे, गूळ, कढीलिंबाची
पाने एकत्र करून थोडे पाणी घालावे आणि
बारीक वाटून घ्यावे. तेलाची फोडणी करावी.
फोडणीत मेथी पूड आणि दहा-बारा मिरच्या
बारीक चिरून घालाव्या. काजूचे तुकडे घालून
परतून घ्यावे. मग चवीला मीठ, चिंचेचा कोळ,
पेरूचा गर, वाटलेले खोबरे घालून एक-दोन
मिनिटे उकळू द्यावे. मग पेरूच्या फोडी घालून
एक-दोन मिनिटात पंचामृत खाली उतरवावे.

वास्तू

अभ्यासाच्या खोलीबाबत
अभ्यासाच्या खोलीची रचना अशी करा
की, अभ्यास करणार्‍याचे तोंड पूर्व किंवा
ईशान्येकडे होईल. तसेच, पूर्व किंवा ईशान्येस
एक खिडकी असावी. या खोलीत मोठ्या,
अवजड गोष्टी (ज्यासमोर उभे राहिल्यावर
दडपल्यासारखे वाटते अशा वस्तू) अनावश्यक
ठेवू नयेत. या खोलीचे स्वरूप अडगळीची
खोली म्हणून करू नये. अभ्यासाच्या खोलीत
उत्तम प्रकाशव्यवस्था असावी. (नैसर्गिक
असल्यास उत्तम.)

कपड्यांवर बॉलपेनच्या शाईचे डाग पडले तर

जर कपड्यांवर बॉलपेनच्या शाईचे
डाग पडले असतील, तर ते घालवण्यासाठी
त्या जागी नेलपॉलिश रिमूव्हर लावा. दहा
मिनिटांनंतर धुवा. डाग गायब होतील.