डिंक पुडींग

0
34

डिंक पुडींग

साहित्य : १ किलो लोणी, खसखस,
खारीक पूड, बदाम पूड, खडीसाखर,
खोबर्‍याचा कीस, सुंठपूड, तयार डिंक पूड.
कृती : डिंकपूडीचे दोन भाग करावे.
निम्मी साजूक तुपात भाजून घ्यावी व निम्मी
तशीच ठेवावी. खोबर्‍याचा कीस, खसखस
भाजून घ्यावे. लोणी कढवत ठेवावे. त्यात
भाजलेली डिंक पूड, खारीक पूड, बदामपूड,
खडीसाखर, भाजलेला खोबर्‍याचा कीस आणि
सुंठ पूड घालावी. हे मिश्रण राहिलेल्या निम्म्या
डिंकपूडीवर ओतावे त्याबरोबर डिंक फुलून
येईल. लगेच तो बरणीत भरावा.