शरीराच्या योग्य पोषणासाठी
आपण निरोगी राहावं म्हणून आपण
अनेक उपाय करत असतो. त्यासाठी आहारात
बदल, गोळ्या औषधी घेतल्या जातात. मात्र
जर तुम्ही नियमित फळांचे सेवन केलं तर
हे काहीही करण्याची तुम्हाला गरज भासणार
नाही. कारण फळांमध्ये ते सर्व पोषक घटक
असतात जे तुमच्या निरोगी शरीरासाठी
आवश्यक असतात. पपई, संत्री, किवी, पेरू
या फळांमुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण
होते.
शरीराच्या योग्य पोषणासाठी
खवा बर्फी
खवा बर्फी
साहित्य : खवा सव्वा कप, पिठी
साखर पाव कप, वेलदोड्याची पूड एक चमचा,
चारोळी किंवा बदाम किंवा काजू एक चमचा
तुकडे.
कृती : खव्यातील गुठळ्या
काढण्यासाठी तो श्रीखंडाच्या चाळणीवर
गाळावा. कढई किंवा पातेल्यात मंद
विस्तवावर गुलाबी परतावा. खाली उतरवून
दोन-तीन मिनिटांनी त्यात पिठीसाखर व
वेलदोडेपूड घालून चांगले ढवळावे. ताटात
पसरून किंचित दाबाव्या, वड्या कापाव्यात.
या बर्फीला साखर कमी लागून चव चांगली
लागते. अशीच कोको, बदाम किंवा पिस्ता
यांची बर्फी करावी, कोकोच्या बर्फीसाठी
पावशेर खव्याला दोन टेबलस्पून डिंकिंग
चॉकलेट, बदाम किंवा पिस्त्यासाठी दोन
टेबलस्पून बदाम किंवा पिस्ताकूट आणि त्या
त्या पदार्थाचा इसेन्स व रंग घालावा.
मुरुम नाहिसे होण्यासाठी
मुरुम नाहिसे होण्यासाठी
* आंघोळीच्या पाण्यात कोरडी मिल्क
पावडर टाका. त्वचा नरम, गुलायम होईल.
* चेहर्यावर झालेल्या मुरूमांना
वैतागलेल्या तरुण-तरुणींनी बीट-सफरचंदय्पेरू व पपईचा रस दररोज प्यावा. खीरा
काकडी- गाजर- कोथिंबीर यांचा रस
त्याचप्रमाणे आवळा चूर्ण सेवन करावे. द्राक्ष,
नासपतीचा रस, पालक-टोमॅटोचा रस
घेतल्याने पित्त कमी होऊन मुरूम नाहीसे
होतात.
दैनिक पंचांग शुक्रवार, दि. २८ जून २०२४
कालाष्टमी, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, ज्येष्ठ कृष्णपक्ष, पू.भा.१०|११
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.
राशिभविष्य-
मेष : आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. आपले धाडस वाढेल. आर्थिक नुकसानाची शयता आहे. कामांची गती मंदावेल.
वृषभ : कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे. आरोग्याची व खाण्या-पिण्याची काळजी घ्या.
मिथुन : कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल.
कर्क : शत्रूंना मात द्याल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.
सिंह : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवा.
प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.
कन्या : आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. ाहत्या जागेसंबंधी अडचण राहू शकते.
तूळ : आरोग्य उत्तम राहील. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल.अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. प्रवासाचे योग संभवतात.
वृश्चिक : वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे. आर्थिक उन्नति होईल. परिस्थिति शांतपणे हाताळा. देवाण-घेवाण टाळा. मित्रांचा सहयोग मिळेल.
धनु : मनावर नियंत्रण ठेवा. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात.
मकर : कार्यक्षेत्रात वेगाने कार्य करा पण घाई करू नका. बेपर्वाईने कार्य करू नका. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील.
कुंभ : वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारय्व्यवसायात स्थिती सुखद राहील. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा. आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो.
मीन : शत्रू पराभूत होतील. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता
आहे. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
अॅलर्जी म्हणजे काय?
अॅलर्जी म्हणजे काय?
कोणाला कशाचे वावडे असते, तर कोणाला कशाचे. अॅलर्जी हा याचाच एक समानार्थी शब्द म्हणावा लागेल. अनेक स्त्रिया कुंकू लावतात; पण एखादीलाच त्यामुळे कपाळावर पुरळ येते, खाज येते. काँग्रेस गवताला अनेकजण हात लावतात; पण एखाद्यालाच त्वचेवर काळे चट्टे, खाज अशी लक्षणे दिसून येतात. यावरून एक लक्षात येईल की, अॅलर्जी ही व्यक्तीविशिष्ट आहे. धुळीत काम केल्यावर काहीजणांना खूप शिंका येतात, काहींना दम्याचा त्रास होतो; बर्याच लोकांवर मात्र काहीच दुष्परिणाम होत नाही. अॅलर्जी करणारे पदार्थ शरीरात गेल्यानंतर शरीरातील पेशी त्यांच्याविरुद्ध प्रतिद्रव्ये तयार करतात. लस दिल्यानंतर याच प्रक्रियेतून रोग प्रतिबंधक प्रतिद्रव्ये वा अँटीबॉडीज् तयार होतात.
अॅलर्जीत चुकीच्या प्रतिसादामुळे विपरीत परिणाम घडवून आणणार्या अँटीबॉडीज् तयार होतात. या अँटीबॉडीज्च्या परिणामामुळे हिस्टामीन, संथगतीने क्रिया करणारा ‘अ’ पदार्थ अशा घटकांची निर्मिती होते. या घटकांच्या परिणामामुळे छोट्या श्वासनलिकांचे स्नायू आकुंचन पावतात. रक्तवाहिन्या रुंदावून रक्तदाब कमी होतो. याखेरीज पूरळ येणे, खाज येणे अशी स्थानिक लक्षणेही दिसतात. रुग्णाला चक्कर येते. श्वास घ्यायला त्रास होतो. गंभीर प्रकारच्या अॅलर्जीमध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. हे टाळण्यासाठी कोणत्या पदार्थाची अॅलर्जी आहे ते शोधून त्याचे डिसेन्सेटायझेशन करता येते.
उष्णतेचे विकार दूर करते काकडी
उष्णतेचे विकार दूर करते काकडी
काकडी थंडावा देते, उष्णतेचे विकार
नाहीसे करते, या व्यतिरिक्त आपल्याला
काकडीतील इतर गुण माहीत नसतात. पण,
अनेक आजारांसाठी काकडी औषधी आहे.
काकडीत ‘ब’ जीवनसत्वाप्रमाणे अधिक
आहे. ‘ब’ जीवनसत्व बलदायी मानले जाते.
म्हणूनच चहा किंवा कॉफीऐवजी तरतरी
येण्यासाठी एक स्लाईस काकडीची खावी.
काकडीत ९५ टक्के पाणी असते.
त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी
टिकून ठेवते. दिवसभराला आवश्यक असणारी
जीवनसत्व काकडीतून मिळतात. शयतो
काकडी सालीसकट खावी. कारण सालीमध्ये
‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं.
काकडीच्या सालीचा दुसरा उपयोग म्हणजे
काकडीची साल जळजळ होत असलेल्या
भागावर किंवा उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवर
लावल्यास खूप आराम मिळतो.






