पुस्तकांचा संग्रह हेच आजच्या युगातील विद्यालय आहे. : कार्लाईल
बहुपयोगी काकडी
बहुपयोगी काकडी
लो कॅलरीज् आणि पाण्याचा साठा
यामुळे डाएट करणार्या लोकांसाठी काकडी
उत्तम आहे. शरीराला नको असलेले द्रव्यपदार्थ
शरीराबाहेर टाकण्याचे काम काकडी करते.
तोंडाला दुर्गंधी येत असेल तर काकडीची
चकती तोंडात वरच्या भागात जिभेच्या
साहाय्याने थोड्या वेळासाठी धरून ठेवावी.
सकाळी उठल्यावर डोकं दुखत असेल तर
किंवा फ्रेश वाटत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी
काकडीच्या फोडी खाव्यात.
मधुमेहींसाठीसुद्धा काकडी उपयुक्त
आहे. काकडीत असलेल्या स्टेरॉल्समुळे
कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करायला
मदत होते. काकडीत पोटॅशिअम, मॅग्नेशिअम
आणि फायबर असल्यामुळे रक्तदाब सुरळीत
राहण्यास मदत होते. तसेच स्नायूंचे दुखणे,
पायात वात येणे यासारखे विकार दूर करण्याची
क्षमता यात असते.
हरभरा डाळीच्या पीठाची बर्फी
हरभरा डाळीच्या पीठाची बर्फी
साहित्य : पीठ हरभरा डाळीचे दीड
कप, तेल मोहनासाठी दोन चमचे, दूध पाव
कप अधिक एक चमचा, तेल तळण्यासाठी एक
कप, साखर एक कप, पाणी अर्धा कप, तूप
एक तृतीयांश कप, वेलदोडेपूड अर्धा चमचा,
चारोळी एक चमचा.
कृती : पीठात मोहन घालून दूधात
भिजवावे. त्याची मुटकुळी करावी. कढईत
तापल्या तेलात ती गुलाबी तळून खलबत्यात
कुटावीत रव्याच्या चाळणीने ते पीठ चाळावे.
तो रवा तुपात मंद विस्तावावर गुलाबी
भाजावा. साखरेचा दोनतारी पाक करून भांडे
खाली उतरवून त्यात हा रवा घालून घोटावा.
वेलदोड्याची पूड घालावी. ताटाला तूप
लावून त्यावर मिश्रण पसरावे. वरून चारोळी
पसरून दाबावी. कापून कोमट असतानाचे
काढाव्यात.
दैनिक पंचांग शनिवार, दि. २९ जून २०२४
—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ कृष्णपक्ष, उ.भा.०८|४९
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल.
वृषभ : स्थायी संपत्ती संबंधी कामांना आज टाळा. दिवस सामान्य जाईल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या.
मिथुन : व्यापारात कर्मचार्यांवर जास्त विश्वास ठेऊ नका. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वृद्धि योग. आरोग्य नरम-गरम राहील.
राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. आरोग्य नरम-गरम राहील.
कर्क : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व
जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील.
सिंह : सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील.
कन्या : वाणी प्रभावामुळे लोकांना आपले मत पटवून द्याल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता ठेवाल.
तूळ : लांबच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी कळू शकेल. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. हा वेळ आपल्या एखाद्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता.
वृश्चिक : आर्थिक स्थिति चांगली राहील. सामाजिक कामात सक्रिय भागीदारी. तब्बेत सांभाळा. आपल्या सहकार्यांबरोबर झालेल्या मतभेदांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा. धावपळ जास्त होईल. देवाण-घेवाण टाळा.
धनु : धार्मिक कामात मन रमेल. शैक्षणिक क्षेत्रात येणार्या अडचणी संयमाने सोडवा. आपल्या जुन्या लोकांना किंवा आधार देणार्या मित्रांना जोडणे या वेळी आपल्यासाठी फलदायी ठरेल.
मकर : ज्ञान, आध्यात्माच्या उच्चस्तरीय कामात गूढ अनुसंधान योग. नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. इतर लोकांना आपल्या स्वतःची गरज व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ साधाल.
कुंभ : कर्मकांड अध्यात्म संबंधी कामात मन रमेल. कर्जाची चिंता कमी होईल. प्रेम संबंधात यश प्राप्ति. आपल्या संपर्कात येणार्या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शयता आहे. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.
मीन : संबंधांना महत्व द्या. नवीन कार्ययोजनेचे प्रबळ योग. व्यापार व्यवसाय मध्यम राहील. योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल. काही नवीन संधी मिळतील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
जखमेवर चुना वा हळद लावणे योग्य आहे का?
जखमेवर चुना वा हळद लावणे योग्य आहे का?
जखमेवर चुना वा हळद लावण्याची पद्धत अनेक ठिकाणी दिसून येते. खेड्यात व शहरातही, जखम झाल्यास आजही लोक हळद वा चुना लावतात. हळद वा चुना लावल्यास रक्त यायचे थांबते, हे खरे आहे; पण केवळ एवढ्याच कारणासाठी जखमेवर हळद वा चुना लावणे योग्य आहे का? हळद ही जंतूची (जिवाणूंची) वाढ होण्यास प्रतिबंध करते. चुन्यामुळे जखमेच्या आसपासचा भाग जाळल्यासारखा, निर्जंतुक होतो. हे झाले काही फायदे; पण याचे तोटेही आहेत. हळद शुद्ध नसेल तर (म्हणजे तिखट, हिंग मिसळलेले असेल), जखमेची आग होऊन ती चिघळू शकते. इतर काही कचरा असेल तर जखमेत जंतुसंसर्ग होऊन पू होऊ शकतो. जखमेला चुना लावल्यास जखम भरून आल्यानंतर त्वचेवर विद्रूप असा व्रण येतो. आजकाल जंतुनाशनासाठी व जखम बरी करण्यासाठी अत्यंत परिणामकारक अशी औषधे उपलब्ध आहेत.
रक्तस्त्राव होणारी जखम साबणाच्या पाण्याने वा सौम्य डेटॉलने स्वच्छ धुवावी. त्यावर कापसाने टिंचर बेन्झाईन वा आयोडीन लावावे. त्याने रक्तस्त्राव थांबेल व जखमेत जंतू असतील तर ते मरतील. जखमेत पू वगैरे झाला असेल तर दररोज ती डेटॉलने धुवावी व त्यावर निओस्पोरीनची पावडर वा सोफ्रामायसीन मलम लावावे. शुद्ध हळद जखमेवर लावणे उपयुक्त आहे. चुन्याने मात्र त्वचेवर विद्रुप व्रण येऊ शकतो. मुख्य म्हणजे अत्यंत परिणामकारक औषधे उपलब्ध असल्याने असे उपाय न करता डेटॉल बेन्झाईन वा सोफ्रामायसीनचा वापर करावा; हेच बरे.







