खवा बर्फी

खवा बर्फी

साहित्य : खवा सव्वा कप, पिठी
साखर पाव कप, वेलदोड्याची पूड एक चमचा,
चारोळी किंवा बदाम किंवा काजू एक चमचा
तुकडे.
कृती : खव्यातील गुठळ्या
काढण्यासाठी तो श्रीखंडाच्या चाळणीवर
गाळावा. कढई किंवा पातेल्यात मंद
विस्तवावर गुलाबी परतावा. खाली उतरवून
दोन-तीन मिनिटांनी त्यात पिठीसाखर व
वेलदोडेपूड घालून चांगले ढवळावे. ताटात
पसरून किंचित दाबाव्या, वड्या कापाव्यात.
या बर्फीला साखर कमी लागून चव चांगली
लागते. अशीच कोको, बदाम किंवा पिस्ता
यांची बर्फी करावी, कोकोच्या बर्फीसाठी
पावशेर खव्याला दोन टेबलस्पून डिंकिंग
चॉकलेट, बदाम किंवा पिस्त्यासाठी दोन
टेबलस्पून बदाम किंवा पिस्ताकूट आणि त्या
त्या पदार्थाचा इसेन्स व रंग घालावा.

डोळ्यांची आग थांबण्यासाठी

डोळ्यांची आग थांबण्यासाठी
* डोळ्यांची आग थांबण्यासाठी
काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवाव्यात.
* टोमॅटोची आंबट-गोड चटणी
तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक अ‍ॅसिड
मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते.
* फ्लॉवर वाळवायचा असेल, तर
त्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात
वाळवावीत.

मानेवरील डाग

सौंदर्य
काकडीची पेस्ट बनवून घ्यावी. त्यात
थोडे दही मिसळून मानेवर लावल्याने डाग
दूर होतात.

वास्तू

* घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक
किंवा पिरॅमिड लावावे.
* चहाचा चोथा तव्यावर टाकला तर
तवा स्वच्छ निघतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

कार्डिओलॉजिस्ट : तुमचे तीन ब्लॉक आहेत.
पेशंट : नाही, चार आहेत कोथरुडला, चिंचवडला, तिसरा
तळेगावला आणि चौथा लोणावळ्याला!
कार्डिओलॉजिस्ट : त्यातला एक उद्या विका,
परवा बायपास आहे तुमची…

दैनिक पंचांग गुरुवार, दि. २७ जून २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
ज्येष्ठ कृष्णपक्ष, शततारा ११|३७
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. मान सन्मान वाढेल. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल.

वृषभ : आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद विवाद टाळा. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मानसन्मानात वाढ होईल.

मिथुन : पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. अनपेक्षित खर्च होण्याची शयता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल.

कर्क : व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. अधिक जोखमीचे कार्ये टाळा.

सिंह : कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल.

कन्या  : आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील.

तूळ : धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शयता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल. आरोग्य उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. जोखिम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये. नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील.

धनु : विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

मकर : पैशासंबंधी येणार्‍या अडचणी दूर होतील. निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. एखाद्या गोष्टीवर डोळे मिटून विश्वास करू नये. आरोग्य मध्यम राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. आपली कामे धाडसाने करा.

कुंभ : रोख रकमेची मोठी देवघेव टाळा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींची काळजी घ्या. जोखिम असलेले कार्ये टाळा. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. आपले काम धाडसाने करा.

मीन : प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या धाडसात वाढ होण्याची शयता आहे. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. शत्रू पराभूत होतील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

काही लोकांचे पाय खूप जाड का असतात?

काही लोकांचे पाय खूप जाड का असतात?

पायावर सूज आल्याने पाय जाड दिसतात. पायाला लागले वा पाय मुरगळला तर सूज येते व वेदना होतात. उच्च रक्तदाब वा मूत्रपिंडाच्या विकारातही पायावर सूज येते. ती दोन्ही पायांवर असते. औषधे दिल्यास अशी सूज कमी होते. काही व्यक्तींमध्ये मात्र एकच पाय खूप म्हणजे खूपच जाड, जणू हत्तीच्या पायासारखा जाड झालेला असतो. हा एक रोग असून त्याचे नाव हत्तीरोग असे आहे. वूचेरेरीया बॅन्क्राफ्ती नावाचा जंत लिंफ वाहून नेणार्‍या नलिकेमध्ये अडकून बसतो. त्यामुळे लिंफ साठतो व पाय सुजतात. यूलेस नावाचा डास चावल्याने या जंतांच्या अळ्या रोगी माणसापासून निरोगी माणसाच्या रक्तात जातात. या अळ्या वाढून त्यांचे प्रौढ जंतात रूपांतर होते. या काळात थंडी वाजून ताप येणे, जांघेत गाठी येणे; अशी लक्षणे अधून मधून दिसतात. याच वेळी रोगनिदान झाले, तर उपचार परिणामकारक ठरतात.

रोगनिदानात जंताच्या अळ्यांसाठी रक्ताची तपासणी करतात. ताप व लिंफ ग्रंथी सुजलेल्या असताना डायएथील कार्बामाझीन हे औषध देतात. त्याने अळ्या मरतात व रोग बरा होतो. एकदा जंत मोठा होऊन लिंफ वाहिनीत अडकला व पायावर सूज आली की, या औषधाचा उपयोग तितकासा होत नाही. शस्त्रक्रिया करून पायावरची सूज कमी करता येते, पण ही एक किचकट शस्त्रक्रिया असते. हा रोग व्यंग निर्माण करतो व तो एक जुनाट रोग बनतो. त्यामुळे रोग न होऊ देणेच योग्य ठरते. यूलेस या घाण पाण्यात पैदास होणार्‍या डासांचा नायनाट व डासांच्या चावण्यापासून स्वतःचे रक्षण करणे, या दोन उपायांनी हत्ती रोगाचा प्रतिबंध करता येईल.

सुविचार

जो ग्रंथ कितीही वेळा वाचला तरी पुनःपुन्हा जवळ ठेवून घ्यावासा वाटतो तोच उत्तम ग्रंथ होय.

थंडीत मुलायम ओठांसाठी

थंडीत मुलायम ओठांसाठी

अनेक जण फुटलेल्या ओठांना पेट्रोलियम
जेली लावतात, परंतु हा पर्याय खरोखरीच
योग्य आहे का?
हा विचार करण्याची गोष्ट आहे. त्यापेक्षा
व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’
उत्पादनांचा वापर करावा. याच्या वापराने
त्वचेतील ओलावा कायम राहण्याबरोबरच
सूर्याच्या दाहकतेपासून त्वचेचा बचाव
होण्याबरोबरच चेहर्‍यावरील डार्क स्पॉट कमी
होण्यास देखील मदत होते.

गाजराच्या वड्या

गाजराच्या वड्या

साहित्य : गाजर किसून दीड
कप, दूध दोन कप, साखर दीड कप, तूप
एक टेबलस्पून, लिंबूरस अर्ध्या लिंबाचा,
जायफळपूड अर्धा चमचा.
कृती : गाजराचा किस मंद विस्तवावर,
झाकण ठेवून तुपात शिजवावा, तीन-चार
वाफा आल्यावर, पाच-पाच मिनिटाच्या
अंतराने दूध व साखर घालून मिश्रण चिकट
झाल्यावर खाली घ्यावे. त्यात पिठीसाखर व
लिंबूरस घालून घोटावे.
चांगला गोळा व्हायला पाहिजे. मग
जायफळपूड घालावी. ट्रे किंवा ताटाला तूप
लावून त्यावर मिश्रण थापून कोमट असतानाच
वड्या पाडाव्यात. अशाच दूध्या, लाल भोपळा
किंवा कोहळ्याच्या किसाच्या वड्या करू
शकता.