उष्णतेचे विकार दूर करते काकडी
काकडी थंडावा देते, उष्णतेचे विकार
नाहीसे करते, या व्यतिरिक्त आपल्याला
काकडीतील इतर गुण माहीत नसतात. पण,
अनेक आजारांसाठी काकडी औषधी आहे.
काकडीत ‘ब’ जीवनसत्वाप्रमाणे अधिक
आहे. ‘ब’ जीवनसत्व बलदायी मानले जाते.
म्हणूनच चहा किंवा कॉफीऐवजी तरतरी
येण्यासाठी एक स्लाईस काकडीची खावी.
काकडीत ९५ टक्के पाणी असते.
त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी
टिकून ठेवते. दिवसभराला आवश्यक असणारी
जीवनसत्व काकडीतून मिळतात. शयतो
काकडी सालीसकट खावी. कारण सालीमध्ये
‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं.
काकडीच्या सालीचा दुसरा उपयोग म्हणजे
काकडीची साल जळजळ होत असलेल्या
भागावर किंवा उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवर
लावल्यास खूप आराम मिळतो.