कॅटस्कॅन म्हणजे काय?

0
77

कॅटस्कॅन म्हणजे काय?

“एस-रे झाला, सर्व तपासण्या झाल्या… मग शेवटी डॉटरांनी स्कॅन करायला सांगितला… तेव्हा मग रोगाचे निदान झाले.” अशा प्रकारची वाये केव्हातरी आपल्याला ऐकायला मिळतात. यावरून स्कॅन म्हणजे रोगनिदानाची एक पद्धत आहे आणि इतर पद्धतीपेक्षा ती सरस आहे, असा समज अनेकांच्या डोयात नक्कीच पक्का झाला असेल. कॅट स्कॅन म्हणजेच कॉम्प्युटराइझ्ड टोमोग्राफीक स्कॅन, क्ष-किरणांचा वापर करून या पद्धतीत शरीराच्या वेगवेगळ्या भागांची संगणकाच्या सहाय्याने आलेखने घेतली जातात. क्ष-किरण छायाचित्र व स्कॅन यात खूप फरक असतो. स्कॅनमध्ये शरीराच्या कोणत्याही भागाचे पृष्ठभागापासून कितीही अंतरावरचे (जसे त्वचेपासून दोन इंच आत वगैरे…) छायाचित्र घेता येते. अवयवांच्या उभ्या किंवा आडव्या छेदांची छायाचित्रे मिळू शकतात. मुख्य म्हणजे या पद्धतीत शरीराच्या आत काही रासायनिक पदार्थ वा नळी इ. टाकावे लागत नसल्याने कोणताच धोका होत नाही. अर्थात क्ष-किरणांच्या वापरामुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात. मेंदूमधील कर्करोगाच्या गाठी, रक्तवाहिन्यांवरील गाठी, रक्तस्त्रावामुळे तयार झालेल्या गाठी आदींचे निदान स्कॅनमुळे सहजगत्या होऊ शकते. ५ मि.मी. पेक्षा मोठ्या गाठीच या पद्धतीने दिसू शकतात. शरीराच्या इतर भागातील कर्करोग किंवा अंतर्गत शारीरिक वैगुण्यांचे निदान स्कॅनमुळे होऊ शकते. कॅट स्कॅन हे रोगनिदानासाठी डॉटरांच्या हाती सापडलेले प्रभावी साधन होय. पण ही तपासणी खर्चिक आहे. एका स्कॅनसाठी १५०० ते २००० रु. खर्च येतो. साहजिकच या रोगनिदान पद्धतीचा सुयोग्य व नेमकाच वापर होण्याची गरज आहे. उठसूट स्कॅन करण्याने फारसे काही साध्य होणार नाही. विशेषतः साध्या क्ष-किरणाने निदान होणार्‍या गोष्टींसाठी स्कॅन काढणे म्हणजे उंदीर मारायला तोफ आणण्यासारखेच आहे!