मुंगुसाची बतावणी

0
24

मुंगुसाची बतावणी

आपल्या घरात मुंगूस घुसले आहे, असे पाहताच घराच्या मालकाने शिताफीने मुंगुसाला पकडले. तो त्याचा जीव घेणार, तोच त्याची विनवणी करीत मुंगूस म्हणाले, ” बाबा रे, मला विनाकारण ठार मारु नकोस. खरे तर मी तुझ्यावर उपकारच करतो. तुझ्या घरातले उंदीर तुझे धान्य खातात. त्या उंदरांना मी मारुन खातो. असे असता उपकार विसरून तू मलाच ठार मारू पाहतोस?

वा रे तुझा न्याय?”

त्यावर घराचा मालक म्हणाला, “अरे लबाडा, माझ्यावर कसले उपकार करतोस रे.  स्वतचे पोट भरण्यासाठी तू उंदीर मारून खातोस, त्यासाठी माझ्या घराची जमीन इथे? तिथे खोदून ठेवतोस. याचा मला किती त्रास होतो आहे,
याचा तू कधी विचार केला आहेस काय? आणि वर मलाच न्याय शिकवतोस. थांब आता, तुला ठार केल्याशिवाय मी तसा सोडणार नाही. ” असे म्हणत घरमालकाने मुंगुसाला जमिनीवर आपटून ठार केले.

तात्पर्य :  स्वतःच्या फायद्यासाठी केलेले कृत्य हा दुसर्‍यावर उपकारच आहे, असे समजणे हे लबाडीचे वर्तन होय.