‘संविधानाचा जागर’ करुन भिंगारच्या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले युवक-युवती

१३ वर्षांची शौर्या बेरड खुल्या गटात दुसरी, जय भीमच्या गजरात मॅरेथॉनमध्ये दिसला युवाशक्तीच्या जोश

नगर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भिंगार येथे १४ एप्रिल रोजी आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. संविधान, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा जागर करीत युवक-युवतींसह शालेय विद्यार्थी या स्पर्धेत धावले. या स्पर्धेचे आयोजन भीम जयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी,
भिंगार यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन
करून जय भीम! च्या गजरात झाली. बीएसएनएलचे निवृत्त अधिकारी प्रदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंडित नेहरु हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास धीवर, प्रदिप भिंगारदिवे, संभाजीराव भिंगारदिवे, श्यामराव वाघस्कर, निवृत्त सहा. फौजदार प्रदीप भिंगारदिवे, किशोर भिंगारदिवे, जनार्दन भिंगारदिवे, मच्छिंद्र भिंगारदिवे, डॉ. सिताताई भिंगारदिवे, मुख्याध्यापक संजय शिंदे आदींसह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते. सुहास धीवर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी
जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहे. मागील वीस वर्षापासून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करुन व पारंपारिक पध्दतीने मिरवणुक काढली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदीप जाधव यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करुन नवीन पिढीला प्रेरणा व दिशा देण्याचे कार्य सुरु आहे. महामानवाची जयंती फक्त डिजेवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी असावी, असे त्यांनी सांगितले. सकाळी भिंगार येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात युवक-युवती व शालेय विद्यार्थी जमले होते.
मुला-मुलींच्या विविध सहा वयोगटात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेसाठी नगर-पाथर्डी रोडवरील वाहतूक काही
काळासाठी वळविण्यात आली होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निळा झेंडा दाखवताच विद्यार्थी अत्यंत उत्साह
व जोशपूर्ण वातावरणात धावले. या स्पर्धेची विशेष आकर्षण ठरली ती १३ वर्षांची शौर्या हर्षद बेरड हिने खुल्या गटात सहभाग घेत दुसरा क्रमांक पटकावला. तिच्या या कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. उत्कृष्ट नियोजन, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या योगदानातून स्पर्धा यशस्वी पार पडली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी उद्योजक सादिक सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी भिंगार येथील जेष्ठ क्रिडाशिक्षक कडूस सर, दिग्विजय क्रिडा मंडळाचे भरत थोरात, भिंगार स्पोर्टस लबचे मेजर विठ्ठल काळे, शंकर औरंगे, रमेश वाघमारे, भिंगार नाईट स्कूलचे क्रिडाशिक्षक शिर्के सर यांनी परिश्रम घेतले. आरोग्यसेवेसाठी छावणी परिषदेच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलचे डॉ. राहुल ढाकणे आणि रुग्णवाहिका चालक शरद धाडगे तत्पर होते. आभार विकास चव्हाण यांनी मानले. मिनी मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल :- ८ वर्षे वयोगट (मुले) – प्रथम विशाल सूनील तनपुरे,
व्दितीय ओमकार योगेश बेरड, तृतीय नैतिक ज्ञानदेव वाघस्कर., ८ वर्षे वयोगट (मुली) – प्रथम रिज़त लियाकत शेख, व्दितीय त्रिशा सोमनाथ दुसूंगे, तृतीय स्वरा हुमे., १० वर्षे वयोगट (मुले) – प्रथम ओंकार निलेश रासकर, व्दितीय शिवरूद्र नागेश भोसले, तृतीय ईश्वर संतोष बोरूडे., १० वर्षे वयोगट (मुली) – प्रथम हर्षदा रामदास घोलप, व्दितीय सई
किरण बरबडे, तृतीय वैष्णवी प्रवीण जोशी., १२ वर्षे वयोगट (मुले) – प्रथम सत्यम विनोद सकट, व्दितीय
निरंजन श्याम काळे, तृतीय वरूण ओमप्रकाश परदेशी., १२ वर्षे वयोगट (मुली) – प्रथम गायत्री प्रवीण शिर्के,
व्दितीय रोशनी विनोद सकट, तृतीय पुर्वा नितीन शिर्के., १४ वर्षे वयोगट (मुले) – प्रथम ओम संतोष पवार,
व्दितीय कुलक प्रफुल्ल भंडारी, तृतीय सिध्देश बाळू दळवी., १४ वर्षे वयोगट (मुली) – प्रथम माही प्रीतम
परदेशी, व्दितीय स्मितल अतुल नागपूरे, तृतीय राधिका नागेश भोसले., १६ वर्षे वयोगट (मुले) – प्रथम सर्वे
श सचिन दळवी, व्दितीय नवनाथ संजय बेद्रे, तृतीय हर्षदीप संतोष पवार., १६ वर्षे वयोगट (मुली) – प्रथम
प्रणिता प्रवीण हिकरे, व्दितीय गौरी अजय कुल्लाळ, तृतीय श्रुतिका संदीप भवर., १८ वर्षे / खुला गट (मुले)
– प्रथम कबीर सुदर्शन बेरड, व्दितीय सुहेल जफर खान, तृतीय प्रथमेश राजू राठोड., १८ वर्षे / खुला
गट (मुली) – प्रथम वैभवी विजय खेडकर, व्दितीय शौर्या हर्षद बेरड, तृतीय माधवी गणेश दिवाण.

देशातील वंचितासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य समर्पित केले : विशाल कदम

नगर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय कामगार परिषदेच्या सातव्या अधिवेशनात कामाचे तास १२ वरून ८ तास केले. महात्मा फुले यांचे धोरण तत्त्वज्ञान आणि कार्यक्रम हा लोकशाही प्रस्थापनेचा सच्चा मार्ग आहे अशी धारणा आंबेडकर यांची होती. आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे झाला. शिक्षणाची गरज पसरवण्यासाठी आणि कमी उत्पन्न गटाची आर्थिक स्थिती समृद्ध करण्यासाठी त्यांनी दलितांच्या शिक्षण आणि मूलभूत कल्याणासाठी काम केले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशातील कोटी कोटी वंचित घटकांच्या उन्नतीसाठी समर्पित केले असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नगर तालुका उपाध्यक्ष विशाल कदम यांनी केले. नगर तालुयातील नेप्ती येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले यांची जयंती भीम ज्योत मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली. माजी सरपंच संजय जपकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नगर तालुका उपाध्यक्ष विशाल कदम व समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती पेटवून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. डॉ.आंबेडकर जयंती निमित्त महिलांनी घरासमोर सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. नेप्ती ग्रामपंचायत मध्ये सुद्धा डॉ.आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंतीसाजरी करण्यात आली. समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास
फुले यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात
आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस स्टेशनचे अधिकारी आदी उपस्थित होते.
महात्मा फुले यांना डॉ.आंबेडकर आपले गुरु मानत होते. महात्मा फुले व डॉ. आंबेडकर
यांच्यात वैचारिक नातं होत. महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील
भिडे वाड्यातून दिले त्यांची व आपल्या गुरु विषयी कृतज्ञता म्हणून डॉ.आंबेडकर यांनी
संविधान ३९५ कलमाचे लिहिले. भारताचे पहिले कायदामंत्री डॉ. आंबेडकर होते. त्यांच्या
काळात त्यांनी विविध कायदे आणि सामाजिक सुधारण्याचा मसुदा तयार करण्याची
जबाबदारी बजावली. संविधानाच्या मसुदा समितीवर सात जणांची निवड करण्यात आली
होती. त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला. एकाचा मृत्यू झाला. एक विदेशात गेला. एकाची
तब्येत ठीक नव्हती. एक राजकारणात अडकला त्यामुळे मसुदा समिती अध्यक्ष म्हणून
संविधान लिहिण्याची सर्व जबाबदारी डॉ.आंबेडकर यांच्यावर येऊन पडली व त्यांनी समर्थपणे
एकट्याने पार पाडली म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे खरे शिल्पकार आहेत.
त्यामुळे संविधानाला कोणी हात लावू नये असे प्रतिपादन रामदास फुले यांनी केले.
यावेळी माजी सरपंच संजय जपकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे
नगर तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, दादू चौगुले, सोसायटी सदस्य सुरेश कदम, पोलीस पाटील अरुण होले, साहेबराव कदम, चंद्रकांत जाधव, भानुदास फुले, दत्ता कदम, स्वप्निल कदम, गणेश कदम, विशाल कदम, कुणाल कदम, ऋतिक जाधव, धनंजय आल्हाट, नानासाहेब होळकर, गुलाब राऊत, तुषार भुजबळ आदी उपस्थित होते.

धम्माच्या प्रचारासाठी बुध्द रुप दान उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम

नगर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नगर तालुयातील वाळूंज येथील सम्राट बुद्ध विहार आणि आलमगीर येथील जेतवन बुद्ध विहारात बुध्द रुप दान करण्यात आले. तथागत बुद्धिस्ट सोसायटी इंडियाचे अध्यक्ष संजय कांबळे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सम्राट ग्रुपच्या वतीने वाळूंज (ता.
नगर) दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सव्वासाह फुटाचे बुध्द रुपाचा समावेश होता. मशाल प्रज्वलीत करुन या मिरवणुकीचे प्रारंभ झाले. यावेळी
आंबेडकरी चळवळीतील समाजबांधवांसह युवक-युवती सहभागी झाले होते. संजय कांबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांनी १४ ऑटोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन संपूर्ण भारतात धम्मप्रसाराचा संकल्प केला. बाबासाहेबांनी नगर जिल्ह्याला काटेरी जिल्हा म्हटले होते. पण आज याच जिल्ह्यात धम्माचे फुल उमलत आहे, हे बाबासाहेबांच्या कार्याचे फळ आहे.

ते पुढे म्हणाले, अनेक गावांमध्ये बुद्ध विहार असूनही तेथे बुद्ध रुप नाही.  म्हणून अशा ठिकाणी बुद्ध रुप दान मोहिम
राबविण्यात येत आहे. ही केवळ प्रतिष्ठापना नाही, तर धम्माच्या जागृतीचे बीज रोवण्याचा प्रयत्न आहे. तथागत बुद्धिस्ट सोसायटी ही संस्था बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन  कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमामुळे वाळूंज व आलमगीर येथील धम्मस्थळी नवचैतन्य निर्माण झाले आहे. उपासक, उपासिकांनी या मूर्तीचे व उपक्रमाचे स्वागत केले. अशा उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व धम्मधारा घराघरांत पोहोचवण्याचे कार्य हाती घेण्यात येत आहे, आणि हे कार्य समाजप्रबोधनाच्या दिशेने भक्कम पाऊल ठरणार असल्याची भावना आंबेडकरी अनुयायींनी व्यक्त केली.

जैन मंदीर चोरी प्रकरणात अवघ्या ८ तासात आरोपी अटक केल्याबद्दल महावीर चषक परिवारातर्फे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार

नगर – शहरातील महाजन गल्लीतील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरातील चोरी प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून अवघ्या आठ तासांमध्ये दोन आरोपींना पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथून मुद्देमालासह अटक करण्यात आली. कोतवाली पोलिसांची ही तत्परता कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महावीर चषक परिवाराचे सदस्य संजय चोपडा यांनी केले. कोतवाली पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, स.पो.नि. कुणाल सपकाळे, पो.उ.नि. गणेश देशमुख, म.पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले, पो. हे.कॉ. विशाल दळवी, संदीप पितळे, सलिम शेख, पो.कॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, अभय कदम, सुरज कदम, सचिन लोळगे, अमोल गाडे, राम हंडाळ, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, महेश पवार, सोमनाथ केकाण, सोमनाथ राऊत, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडू आदींचा महावीर चषक परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य संजय चोपडा, राजेंद्र गांधी, अजय गुगळे, चेतन बोगावत, विशाल शेटिया, सच्चिदानंद बोळे, अशोक बलदोटा, रमेश बोरा, सचिन चोपडा आदी उपस्थित होते.

सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषद अभियान आयोजित ‘मी सावित्री ज्योतिराव फुले’ एकपात्री नाट्य प्रयोगास अहिल्यानगरमध्ये प्रतिसाद

नगर – सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषद अभियान अहिल्यानगर यांच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती औचित्य साधून माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन जवळ, अहिल्यानगर येथे महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर गाजलेले ’मी सावित्री ज्योतिराव फुले’ एकपात्री नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आला होता. या नाट्य प्रयोगाला अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरीकांनी प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उद्घाटन रेहमत सुलतान फौंडेशन, अहिल्यानगरचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, विनयकराजं फौंडेशनचे अध्यक्ष उद्योजक विपुल वाखरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भिंगार अर्बन बँकचे संचालक महेश झोडगे, सातारा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, मार्कंडेय विद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब क्षेत्रे, सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषद अभियानाचे मुख्य संयोजक सुदाम लगड उपस्थित होते.
यावेळी विपुल वाखरे म्हणाले की, सरकारी शाळा वाचवणे काळाची गरज आहे. या अभियानासाठी मी आपल्या सोबत कायम आहे.

यावेळी बोलताना महेश झोडगे म्हणाले की, आज भांडवलशाही निर्माण झाली आहे. त्या विरुध्द सरकारी शाळा जगवणे व वाचवणे हे आपले परम कर्तव्य आहे. ज्ञानदेव पांडूळे म्हणाले की, आपण सर्वांनी सरकारी शाळा वाचवून बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आपण संघटीत होऊन हा लढा चालू ठेवणे खुप गरजेचे आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात युनूसभाई तांबटकर म्हणाले की, कविताताई मेहेत्रे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय व केलेला संषर्घ, शिक्षणासाठी दिलेले योगदान याचे हुबेहुब चित्रण प्रेक्षकांसमोर उभे केले. त्यामुळे प्रेक्षकांना सावित्रीबाई फुलेंचे कार्य समजले. शिक्षण किती महत्वाचे आहे. आणि शिक्षण सर्वांना मिळावे, यासाठी सुरु असलेल्या सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषद अभियान हे आजच्या काळाजी गरज असून सर्वांनी यासाठी प्रयत्न करावे, असे
त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात रावसाहेब क्षेत्रे यांनी सरकारी शाळा वाचवा अभियानाची कल्पना सांगितले. व पाहुण्याचा परिचय करुन दिला. सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय हक्क परिषद अभियानाच्यावतीने नागरीकांना सावित्रीबाई फुले व ज्योतिबाफुले यांचे कार्यांची माहिती व्हावी. आणि त्यानी शिक्षणासाठी जो संघर्ष करुन त्यांनी कोणत्याही गोष्टींचा विचार न करता महिलांसाठी शाळा सुरु केली. शिक्षणातून समाज घडत असतो. त्यामुळे सर्वांना शिक्षण मिळावे, यासाठी या एकपात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आल्याचेत्यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद द्रविड यांनी केले. श्रीकांत राऊत यांनी आभार मानले.

मातोश्री वृध्दाश्रमास बोल फाऊंडेशनची भावस्पर्शी भेट

नगर – ब्रेड ऑफ लाईफ, बोल फाऊंडेशन या प्रतिष्ठणातर्फे १२ एप्रिल रोजी विळदघाट परिसरातील मातोश्री वृध्दाश्रमास एक भावस्पर्शी भेट आयोजित केली होती. फाऊंडेशनचे चेअरमन जोसेफ पाटोळे यांनी वृध्दाश्रमातील सुमारे तीस वृध्द स्त्री व पुरूषांची भावनिक ओळख करून घेतली. फाऊंडेशनतर्फे उपस्थित स्वयंसेवकांनी ‘तू बुध्दी दे, तू तेज दे नवचेतना विश्वास दे’ या चेतना व उर्जा निर्माण करणार्‍या प्रार्थनेव्दारे उपस्थित वृध्दांचे मनोबल वाढवून त्यांना एका आनंदमय वातावरणात घेऊन गेले. ‘हरवले आभाळ ज्यांचे हो त्यांचा सोबती’ या ओळीव्दारे पुनः एकदा एका नवीन स्फूर्ती जनक जीवन जगण्याचे धैर्यं फाऊंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे यांनी भावपूर्ण गीताव्दारे स्वयंसेविकांच्या साथीने सादर केले तसेच ‘प्रेमस्वरूप आई’ या सादर केलेल्या गीताव्दारे वृध्द स्त्री व पुरूषांचे डोळे पाणावले. या प्रसंगी वृध्द स्त्री व पुरूष यांनी आपल्या वैयक्तिक भावना थोडयात व्यक्त केल्या. प्रतिष्ठाणच्या सभासदांनी फळांचे वाटप केले. मातोश्री वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडीया यांनी बोल फाऊंडेशन दरवर्षी मातोश्री वृध्दाश्रमाला भेट देऊन एक आगळे वेगळे नाते जोडल्याचे मत व्यक्त केले.

जोसेफ पाटोळे यांनी मातोश्री वृध्दाश्रम भेटीबद्दल थोडयात मनोगत व्यक्त केले. या भेटीप्रसंगी कु. अलफोन्सा मरियादास, व्हॉयलेट पिटर, रानी भोसले, सौ. जयशीला मेन्डोन्सा, सुशीला अंतोंन पाटोळे व नितीन पाटोळे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. जोसेफ पाटोळे यांनी दिलीप चोरडिया यांचे आभार मानले.

‘शेतकरी, लाडया बहिणी, युवक व ज्येष्ठ नागरिकां’ची फसवणूक करणार्‍या सरकारच्या जाहीरनाम्याच्या होळी आंदोलनास ‘शिवसेना ठाकरे’चा पाठिंबा

नगर – राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनामा मधून अनेक
आश्वासन मतदारांना दिली होती. मात्र ती पाळण्यामध्ये सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. किंबहुना
सरकारची जनतेची फसवणूक करण्याचीच नियत आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. या फसवणुकी
विरोधात स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेने शेतकरी नेते अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर १४ एप्रिलपासून
सरकारच्या जाहीरनाम्याची होळी करण्याचे आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला अहिल्यानगर शहर शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तसे पाठिंबाचे पत्र घनवट
यांना काळे यांनी पाठवले आहे.
पत्रात काळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महायुतीचे सरकार मताधियाने
निवडून आले. निवडणुकीत महायुतीतील प्रमुख पक्षांनी एक संयुक्त जाहीरनामा काढून जनतेला आश्वासन दिली होती व
सरकार सत्तेत आल्यास सर्व आश्वासने पूर्ण करण्याची हमी दिली होती. त्यात शेतकर्‍यांची कर्ज माफी, मोफत वीज, लाडया बहिणींना २१०० रुपये, बेरोजगार तरुणांना महिन्याला १०,००० रुपये, ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला २१०० रुपये पेन्शन,  सोयाबीनला ६००० रुपये भाव देणार, शेतकर्‍यांनी भरलेला जीएसटी परत देणार, वन्यप्राण्या पासून पिकांचे नुकसान व जिवित हानी होणार नाही यासाठी उपाय योजना वगैरे असे पंचवीस ठळक मुद्दे आहेत.
काळेंनी पुढे म्हटले आहे, कर्जमाफी तर  पहिल्या कॅबिनेट मीटिंग मध्ये जाहीर करणार, शेतकर्‍याचा सातबारा कोरा करणार अशी भाषणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातबारा कोरा
केला नाही तर पवाराची औलाद सांगणार नाही असे ठणकावून सांगितले होते. प्रत्यक्षात आताचे
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी, कर्जमाफीची वाट पाहू नका, कर्ज भरून टाका अशी तंबी
शेतकर्‍यांना दिली आहे. बँकेच्या नोटीस येत आहेत. तसेच काही ठिकाणी जमीन जप्ती व लिलावाची प्रक्रिया सुरू झाली
आहे. ही शेतकर्‍यांची फसवणूक आहे. त्याचा शिवसेनेने निषेध करत महायुती सरकारमध्ये लबाडांची फौज सत्तेत बसली
असल्याचा घाणाघात काळे यांनी केला आहे.
काळे पुढे म्हणाले, सोयाबीन आधारभूत किमतीच्या खाली विकावे लागले. ६००० रुपये कोणालाच मिळाले नाही.
रासायनिक खते, कीटकनाशके, ट्रॅटर, स्पेअर पार्ट यावर शेतकरी भरत असलेला राज्याचा जीएसटी परत करण्याबाबत
गेल्या अर्थसंकल्पात काहीच तरतूद नाही. लाडया बहिणींना अनुदान वाढ तर नाहीच, पण आहे ते १५०० पण मिळत
नाहीत. वृद्धांची पेन्शन वाढ झाली नाही की सुशिक्षित बेरोजगार तरुणांना भत्ता नाही. जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने गेल्या अर्थ संकल्पात कोणतेच पाऊल उचललेले दिसत नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेची निव्वळ फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक किती काळ चालणार? असा संतप्त सवाल करत किरण काळे म्हणाले, हे कुठे तरी थांबायला हवे असे आमचे स्पष्ट मत आहे. त्यामुळेच आम्ही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक यांच्या न्याय हक्कासाठी आपण छेडलेली ही लढाई महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात जाईल असा काळे यांनी व्यक्त केला आहे.

नगररचना विभागाच्या बोगस व निष्क्रिय कारभाराचा माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरण कामास फटका

अहिल्यानगर महानगरपालिकेने दोन दिवसात एनओसी न दिल्यास तीव्र आंदोलन करणार : गणेश भोसले यांचा इशारा

नगर – गेल्या अनेक महिन्यांपासून नूतनीकरणाचे काम मनपाच्या उदानसीतेमुळे रखडले आहे. केवळ नगररचना  भागाच्या
एका एनओसीसाठी माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणास दिरंगाई होत आहे. याचा फटका सर्वसामान्य प्रवासी, नागरिकांना बसत असून दररोज त्यांना बसची वाट बघत उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे, याला महानगरपालिकेचा ढिसाळ व निष्क्रिय कारभार जबाबदार आहे. नगररचना विभागातून दोन दोन महिने फाईल पुढे सरकत नाही; साधी
एनओसी अधिकार्‍यांना देता येत नाही, हा अत्यंत निंदनीय व अक्षम्य प्रकार आहे, असा संताप व्यक्त करत माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी जर मनपाने दोन दिवसात माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामास एनओसी न
दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

यावेळी काढलेल्या पत्रकात गणेश भोसले म्हणाले, अहिल्यानगर शहराचे आमदार अत्यंत तळमळीने व सतत पाठपुरावा करून नगर शहराच्या विकासासाठी कोट्यवधींची विकास निधी मंजूर करून आणत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाला व अधिकार्‍यांना या विकासकामांशी काहीही देणेघेणे नाही. आ. संग्राम जगताप यांनी
सामान्य प्रवासी नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांच्या सोयीसाठी माळीवाडा बसस्थानकाच्या
नूतनीकरणासाठी तब्बल साडेसोळा कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे अथक परिश्रमाने पाठपुरावा करून मंजूर करून आणला आहे.

माळीवाडा बसस्थानकाच्या इमारतीच्या नूतनीकरण निधी मंजूर झाल्याने बसस्थानकाची जुनी इमारत पाडण्यात आली असून, नव्या इमारतीच्या कामास त्वरित सुरवात करण्यात येणार होती. मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे व नगररचना विभागाच्या बोगस आणि निष्क्रिय कारभारामुळे माळीवाडा बसस्थानकाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षांवर आणि आमदारांच्या अथक मेहनतीवर असे पाणी फिरवणे योग्य आहे का? महानगरपालिकेची यंत्रणा जर अशीच चालणार असेल, तर मग विकासाच्या नावाखाली जनतेला आम्ही काय उत्तर द्यायचे? मनापाच्या नगररचना विभागातील बोगस कारभार योग्य आहे का? काम न करणार्‍या अधिकार्‍यांना पाठीशी घालणे कितपत योग्य आहे? असे सवाल गणेश भोसले यांनी मनपा आयुक्तांना विचारले आहेत.
माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामास मनपाने दोन दिवसात एनओसी न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा माजी महापौरांनी गणेश भोसले यांनी दिला आहे.

माजी आमदार अरुण जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी

नगर – सर्वांसाठी आदरणीय स्थान असलेले माजी आमदार अरुणकाका जगताप हे सध्या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना लवकरात लवकर बरे वाटून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सर्वांनी आपापल्यापरीने मंदिरात, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये व गुरुद्वारामध्ये प्रार्थना करावी, असे आवाहन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.  अरुण जगताप यांना स्वास्थ्य मिळण्यासाठी सोमवारी सावरगाव येथे मायंबा गडावर मच्छिंद्रनाथांच्या समाधीची महाआरती करून प्रार्थना करण्यात आली. तसेच अरुण
जगताप यांची नात कु.परमेश्वरी जगताप व नातू आराध्य जगताप यांच्या हस्ते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यता आले.

यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुनिल भोसले, योगेश दाणी, विजय फुलसैंदर, सोनु भोसले, हर्षल अग्रवाल, छोटु पांडुळे, आबा भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय फुलसैंदर म्हणाले, सर्वांचे लाडके असलेले अरुणकाका यांच्यासाठी सर्व  जातीधर्माचे नागरिक एकत्र येत प्रार्थना करत आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या मच्छिंद्रनाथांची महाआरती करून प्रर्थना केली आहे. बाबांच्या आशीर्वादाने नक्कीच अरुणकाकांना बरे वाटेल, ही खात्री आहे. यावेळी सुनिल फुलसौंदर, धनंजय भोसले, वैभव वाघ,
विशाल मदने, हर्षद वाल्हेकर, राहुल रासकर, गणेश दातीर, संतोष जाधव, बाळु खर्से, वैभव लांडगे, अदित काळे, पार्थ बोस, केतन पुंड, अंकित मोरे, विशाल सुपेकर आदी उपस्थित होते.

माजी आमदार अरुणकाकांच्या आरोग्यासाठी तृतीयपंथी समाजाची महाआरती, देवीला साकड

नगर – सबजेल चौक येथील श्री तुळजापूर देवी मंदिर येथे तृतीयपंथी समाजाच्या वतीने माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी मंदिरात महाआरती करुन काकांच्या दिर्घायुष्यासाठी पदर पुढे घेऊन प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु, लैला शेख, मुस्कान शेख, अमृता गायकवाड, छकुली, सना, साधना,
बिपाशा, गौरी, अक्षदा, दिया, शिवन्या, मॉन्टी, मोहिनी, पायल, गुत्ती, मीनाक्षी, शकुंतला आदीसह तृतीयपंथी उपस्थित होते. श्री तुळजापूर देवी मंदिरात अरुणकाकांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व तृतीयपंथी समाजाच्या वतीने मनोभावे प्रार्थना करण्यात आली. काजल गुरु म्हणाले की, अरुणकाका हे सर्व नगरकरांचे भूषण आहे. त्यांची प्रकृतीसाठी सर्व समाजातील जाती-धर्माचे लोक प्रार्थना करत आहे. अरुणकाका यांनी आपल्या कार्यातून सर्वांच्या मनात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्यांना आधार देवून त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. व तृतीयपंथी यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांचे स्वास्थ्य चांगले होण्यासाठी देविला साकडे घालण्यात आले आहे. ते लवकर बरे होवून आपल्या सोबत पुन्हा सामाजिक कार्यासाठी रुजू होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.