नगर – ब्रेड ऑफ लाईफ, बोल फाऊंडेशन या प्रतिष्ठणातर्फे १२ एप्रिल रोजी विळदघाट परिसरातील मातोश्री वृध्दाश्रमास एक भावस्पर्शी भेट आयोजित केली होती. फाऊंडेशनचे चेअरमन जोसेफ पाटोळे यांनी वृध्दाश्रमातील सुमारे तीस वृध्द स्त्री व पुरूषांची भावनिक ओळख करून घेतली. फाऊंडेशनतर्फे उपस्थित स्वयंसेवकांनी ‘तू बुध्दी दे, तू तेज दे नवचेतना विश्वास दे’ या चेतना व उर्जा निर्माण करणार्या प्रार्थनेव्दारे उपस्थित वृध्दांचे मनोबल वाढवून त्यांना एका आनंदमय वातावरणात घेऊन गेले. ‘हरवले आभाळ ज्यांचे हो त्यांचा सोबती’ या ओळीव्दारे पुनः एकदा एका नवीन स्फूर्ती जनक जीवन जगण्याचे धैर्यं फाऊंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे यांनी भावपूर्ण गीताव्दारे स्वयंसेविकांच्या साथीने सादर केले तसेच ‘प्रेमस्वरूप आई’ या सादर केलेल्या गीताव्दारे वृध्द स्त्री व पुरूषांचे डोळे पाणावले. या प्रसंगी वृध्द स्त्री व पुरूष यांनी आपल्या वैयक्तिक भावना थोडयात व्यक्त केल्या. प्रतिष्ठाणच्या सभासदांनी फळांचे वाटप केले. मातोश्री वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडीया यांनी बोल फाऊंडेशन दरवर्षी मातोश्री वृध्दाश्रमाला भेट देऊन एक आगळे वेगळे नाते जोडल्याचे मत व्यक्त केले.
जोसेफ पाटोळे यांनी मातोश्री वृध्दाश्रम भेटीबद्दल थोडयात मनोगत व्यक्त केले. या भेटीप्रसंगी कु. अलफोन्सा मरियादास, व्हॉयलेट पिटर, रानी भोसले, सौ. जयशीला मेन्डोन्सा, सुशीला अंतोंन पाटोळे व नितीन पाटोळे यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. जोसेफ पाटोळे यांनी दिलीप चोरडिया यांचे आभार मानले.