जैन मंदीर चोरी प्रकरणात अवघ्या ८ तासात आरोपी अटक केल्याबद्दल महावीर चषक परिवारातर्फे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचा सत्कार

0
29

नगर – शहरातील महाजन गल्लीतील श्री महावीर स्वामी दिगंबर जैन मंदिरातील चोरी प्रकरणी कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून अवघ्या आठ तासांमध्ये दोन आरोपींना पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथून मुद्देमालासह अटक करण्यात आली. कोतवाली पोलिसांची ही तत्परता कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महावीर चषक परिवाराचे सदस्य संजय चोपडा यांनी केले. कोतवाली पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, स.पो.नि. कुणाल सपकाळे, पो.उ.नि. गणेश देशमुख, म.पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले, पो. हे.कॉ. विशाल दळवी, संदीप पितळे, सलिम शेख, पो.कॉ. दिपक रोहोकले, तानाजी पवार, अभय कदम, सुरज कदम, सचिन लोळगे, अमोल गाडे, राम हंडाळ, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, महेश पवार, सोमनाथ केकाण, सोमनाथ राऊत, म.पो.कॉ. प्रतिभा नागरे, दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. राहुल गुंडू आदींचा महावीर चषक परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सदस्य संजय चोपडा, राजेंद्र गांधी, अजय गुगळे, चेतन बोगावत, विशाल शेटिया, सच्चिदानंद बोळे, अशोक बलदोटा, रमेश बोरा, सचिन चोपडा आदी उपस्थित होते.