माजी आमदार अरुणकाकांच्या आरोग्यासाठी तृतीयपंथी समाजाची महाआरती, देवीला साकड

0
38

नगर – सबजेल चौक येथील श्री तुळजापूर देवी मंदिर येथे तृतीयपंथी समाजाच्या वतीने माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी मंदिरात महाआरती करुन काकांच्या दिर्घायुष्यासाठी पदर पुढे घेऊन प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु, लैला शेख, मुस्कान शेख, अमृता गायकवाड, छकुली, सना, साधना,
बिपाशा, गौरी, अक्षदा, दिया, शिवन्या, मॉन्टी, मोहिनी, पायल, गुत्ती, मीनाक्षी, शकुंतला आदीसह तृतीयपंथी उपस्थित होते. श्री तुळजापूर देवी मंदिरात अरुणकाकांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व तृतीयपंथी समाजाच्या वतीने मनोभावे प्रार्थना करण्यात आली. काजल गुरु म्हणाले की, अरुणकाका हे सर्व नगरकरांचे भूषण आहे. त्यांची प्रकृतीसाठी सर्व समाजातील जाती-धर्माचे लोक प्रार्थना करत आहे. अरुणकाका यांनी आपल्या कार्यातून सर्वांच्या मनात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे. सर्वसामान्यांना आधार देवून त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. व तृतीयपंथी यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांचे स्वास्थ्य चांगले होण्यासाठी देविला साकडे घालण्यात आले आहे. ते लवकर बरे होवून आपल्या सोबत पुन्हा सामाजिक कार्यासाठी रुजू होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.