१३ वर्षांची शौर्या बेरड खुल्या गटात दुसरी, जय भीमच्या गजरात मॅरेथॉनमध्ये दिसला युवाशक्तीच्या जोश
नगर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भिंगार येथे १४ एप्रिल रोजी आयोजित मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. संविधान, समता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा जागर करीत युवक-युवतींसह शालेय विद्यार्थी या स्पर्धेत धावले. या स्पर्धेचे आयोजन भीम जयंती उत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी,
भिंगार यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन
करून जय भीम! च्या गजरात झाली. बीएसएनएलचे निवृत्त अधिकारी प्रदीप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंडित नेहरु हायस्कूलचे मुख्याध्यापक सुहास धीवर, प्रदिप भिंगारदिवे, संभाजीराव भिंगारदिवे, श्यामराव वाघस्कर, निवृत्त सहा. फौजदार प्रदीप भिंगारदिवे, किशोर भिंगारदिवे, जनार्दन भिंगारदिवे, मच्छिंद्र भिंगारदिवे, डॉ. सिताताई भिंगारदिवे, मुख्याध्यापक संजय शिंदे आदींसह आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते. सुहास धीवर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी
जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहे. मागील वीस वर्षापासून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करुन व पारंपारिक पध्दतीने मिरवणुक काढली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदीप जाधव यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करुन नवीन पिढीला प्रेरणा व दिशा देण्याचे कार्य सुरु आहे. महामानवाची जयंती फक्त डिजेवर नाचण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी असावी, असे त्यांनी सांगितले. सकाळी भिंगार येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात युवक-युवती व शालेय विद्यार्थी जमले होते.
मुला-मुलींच्या विविध सहा वयोगटात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेसाठी नगर-पाथर्डी रोडवरील वाहतूक काही
काळासाठी वळविण्यात आली होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निळा झेंडा दाखवताच विद्यार्थी अत्यंत उत्साह
व जोशपूर्ण वातावरणात धावले. या स्पर्धेची विशेष आकर्षण ठरली ती १३ वर्षांची शौर्या हर्षद बेरड हिने खुल्या गटात सहभाग घेत दुसरा क्रमांक पटकावला. तिच्या या कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. उत्कृष्ट नियोजन, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या योगदानातून स्पर्धा यशस्वी पार पडली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी उद्योजक सादिक सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी भिंगार येथील जेष्ठ क्रिडाशिक्षक कडूस सर, दिग्विजय क्रिडा मंडळाचे भरत थोरात, भिंगार स्पोर्टस लबचे मेजर विठ्ठल काळे, शंकर औरंगे, रमेश वाघमारे, भिंगार नाईट स्कूलचे क्रिडाशिक्षक शिर्के सर यांनी परिश्रम घेतले. आरोग्यसेवेसाठी छावणी परिषदेच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलचे डॉ. राहुल ढाकणे आणि रुग्णवाहिका चालक शरद धाडगे तत्पर होते. आभार विकास चव्हाण यांनी मानले. मिनी मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल :- ८ वर्षे वयोगट (मुले) – प्रथम विशाल सूनील तनपुरे,
व्दितीय ओमकार योगेश बेरड, तृतीय नैतिक ज्ञानदेव वाघस्कर., ८ वर्षे वयोगट (मुली) – प्रथम रिज़त लियाकत शेख, व्दितीय त्रिशा सोमनाथ दुसूंगे, तृतीय स्वरा हुमे., १० वर्षे वयोगट (मुले) – प्रथम ओंकार निलेश रासकर, व्दितीय शिवरूद्र नागेश भोसले, तृतीय ईश्वर संतोष बोरूडे., १० वर्षे वयोगट (मुली) – प्रथम हर्षदा रामदास घोलप, व्दितीय सई
किरण बरबडे, तृतीय वैष्णवी प्रवीण जोशी., १२ वर्षे वयोगट (मुले) – प्रथम सत्यम विनोद सकट, व्दितीय
निरंजन श्याम काळे, तृतीय वरूण ओमप्रकाश परदेशी., १२ वर्षे वयोगट (मुली) – प्रथम गायत्री प्रवीण शिर्के,
व्दितीय रोशनी विनोद सकट, तृतीय पुर्वा नितीन शिर्के., १४ वर्षे वयोगट (मुले) – प्रथम ओम संतोष पवार,
व्दितीय कुलक प्रफुल्ल भंडारी, तृतीय सिध्देश बाळू दळवी., १४ वर्षे वयोगट (मुली) – प्रथम माही प्रीतम
परदेशी, व्दितीय स्मितल अतुल नागपूरे, तृतीय राधिका नागेश भोसले., १६ वर्षे वयोगट (मुले) – प्रथम सर्वे
श सचिन दळवी, व्दितीय नवनाथ संजय बेद्रे, तृतीय हर्षदीप संतोष पवार., १६ वर्षे वयोगट (मुली) – प्रथम
प्रणिता प्रवीण हिकरे, व्दितीय गौरी अजय कुल्लाळ, तृतीय श्रुतिका संदीप भवर., १८ वर्षे / खुला गट (मुले)
– प्रथम कबीर सुदर्शन बेरड, व्दितीय सुहेल जफर खान, तृतीय प्रथमेश राजू राठोड., १८ वर्षे / खुला
गट (मुली) – प्रथम वैभवी विजय खेडकर, व्दितीय शौर्या हर्षद बेरड, तृतीय माधवी गणेश दिवाण.