नगर – सर्वांसाठी आदरणीय स्थान असलेले माजी आमदार अरुणकाका जगताप हे सध्या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना लवकरात लवकर बरे वाटून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सर्वांनी आपापल्यापरीने मंदिरात, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये व गुरुद्वारामध्ये प्रार्थना करावी, असे आवाहन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केले. अरुण जगताप यांना स्वास्थ्य मिळण्यासाठी सोमवारी सावरगाव येथे मायंबा गडावर मच्छिंद्रनाथांच्या समाधीची महाआरती करून प्रार्थना करण्यात आली. तसेच अरुण
जगताप यांची नात कु.परमेश्वरी जगताप व नातू आराध्य जगताप यांच्या हस्ते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यता आले.
यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, सुनिल भोसले, योगेश दाणी, विजय फुलसैंदर, सोनु भोसले, हर्षल अग्रवाल, छोटु पांडुळे, आबा भोसले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विजय फुलसैंदर म्हणाले, सर्वांचे लाडके असलेले अरुणकाका यांच्यासाठी सर्व जातीधर्माचे नागरिक एकत्र येत प्रार्थना करत आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या मच्छिंद्रनाथांची महाआरती करून प्रर्थना केली आहे. बाबांच्या आशीर्वादाने नक्कीच अरुणकाकांना बरे वाटेल, ही खात्री आहे. यावेळी सुनिल फुलसौंदर, धनंजय भोसले, वैभव वाघ,
विशाल मदने, हर्षद वाल्हेकर, राहुल रासकर, गणेश दातीर, संतोष जाधव, बाळु खर्से, वैभव लांडगे, अदित काळे, पार्थ बोस, केतन पुंड, अंकित मोरे, विशाल सुपेकर आदी उपस्थित होते.