नगर शहर परिसरातून दुचाया चोरणारा सराईत आरोपी पकडला

0
45

नगर – शहरातून दुचाकी चोरी करणारा
सराईत आरोपी तोफखाना पोलिसांच्या
पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून
२ लाख ४५ हजार रुपयांच्या चार दुचाकी
हस्तगत करण्यात आल्या आहेत. किशोर
जयसिंग पठारे (वय ४०, मु.पो. पिंपळगांव
माळवी) असे त्याचे नाव आहे.
कैलास चंद्रकांत मांजरे (रा. मांजरी
ता. राहुरी) हे लग्नासाठी अहिल्यानगर येथे
आले असता त्यांची होंडा दुचाकी चोरीला
गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना
एक इसम ताठे मळा ते पंपींग स्टेशन
रोड परिसरात दुचाकी विक्रीसाठी येणार
असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आनंद
कोकरे यांना मिळाली. गुन्हे शोध पथकाने त्याला
ताब्यात घेतले. त्याने सदर दुचाकी सिटी लॉन्स
येथील पार्किंगमधून चोरी केली असल्याचे कबूल
केले. तसेच, शहरात विविध ठिकाणाहून चोरी
केलेल्या व लपवून ठेवलेल्या तीन दुचाकी त्याने
पोलिसांच्या ताब्यात दिल्या. पुढील तपास महिला
अंमलदार संध्या म्हस्के करत आहेत.
पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या
पथकातील अंमलदार दत्तात्रय जपे, सुनिल
शिरसाठ, अहमद इनामदार, सुधीर खाडे, सुरज
वाबळे, वसिम पठाण, मनिष त्रिभुवन, बाळासाहेब
भापसे, सतिष भवर यांच्या पथकाने ही कारवाई
केली आहे.