तपोवन रोड बालघर प्रकल्प येथे राणी लंके यांची वही तुला करण्यात आली.
नगर – अनाथ, गरजू मुलांना आधार देणारे
बालघर प्रकल्पामध्ये सुरू असलेले सामाजिक
कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक कामाची
आवड असणारे गणेश पवार वर्षभर विविध उपक्रम
राबवत समाजाप्रती असलेली बांधिलकी जोपासत
आपले कर्तव्य पार पाडत असतात. सण, उत्सव
वाढदिवस साजरे करत असताना सकारात्मक
दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासली गेली
पाहिजेत. बालघर प्रकल्पामध्ये राबविण्यात येत
असलेले सामाजिक उपक्रमातून मुलांना संस्कार,
ऊर्जा व प्रेरणा देणारे ठरत आहे. बाल वयातच
योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगला विद्यार्थी घडला
जातो, असे प्रतिपादन राणी लंके यांनी केले
तपोवन रोड बालघर प्रकल्प येथे राणी लंके
यांची वही तुला करण्यात आली. यावेळी सिने
अभिनेत्री ऐश्वर्या कांबळे, मोनिका जाधव, शीतल
होन, पिंटू जगदाळे, बाळासाहेब भगत, सरपंच
विकास पवार, गणेश मिसाळ, शुभम जाधव,
गोवर्धन रोहकले, अक्षय लोखंडे आदींसह नागरिक
उपस्थित होते
खासदार निलेश लंके आजारी असल्यामुळे
गणेश पवार यांच्या वही तुला कार्यक्रमाला येऊ
शकले नाही, मात्र त्यांच्यापेक्षा माझे वजन जास्त
असल्यामुळे वही तुला कार्यक्रमात जास्त वह्या
लागल्या त्यामुळे बालघर प्रकल्पातील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक कामासाठी फायदा झाला असल्याचे मत
राणी लंके यांनी व्यक्त केले
वही तुला कार्यक्रमातून बालघर प्रकल्पातील
अनाथ, गरजू मुलांच्या चेहर्यावर हसू पाहिल्यावर
मनाला आनंद झाला. गणेश पवार हा युवक
ध्येयवेडा असून सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तरी
देखील समाजामध्ये वावरत असताना समाजाचे
आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून वर्षभर
सामाजिक उपक्रम राबवत असतात असे मत सिने
अभिनेत्री ऐश्वर्या कांबळे यांनी व्यक्त केले
खासदार निलेश लंके समाजामधील
दीनदुबळे, गरजू, अनाथ मुलांसाठी व नागरिकांसाठी
करीत असलेल्या सामाजिक कार्याचा आदर्श
घेऊन गेल्या ४ वर्षापासून कार्य सुरू आहे.
विविध सामाजिक संस्थेमधील विद्यार्थ्यांना जीवन,
आवश्यक वस्तू, शालेय गणवेश, साहित्य, आरोग्य
तपासणी, वैद्यकीय किट देण्याचे काम केले जाते.
याचबरोबर वृद्धाश्रम मधील ज्येष्ठांची देखील सेवा
केली जाते सामाजिक उपक्रमातून मनाला आनंद
होत असल्याचे मत गणेश पवार यांनी व्यक्त केले.