‘जोडी तुझी माझी’ कार्यक्रमात ३०० जोडप्यांनी घेतला सुखी व समाधानी संसाराचा मूलमंत्र

0
111

घटस्फोट घेणारे पती-पत्नीही आले पुन्हा एकत्र हे या कार्यक्रमाचे फलित

नगर – ज्येष्ठ संगीत समिक्षक सुहास मुळे यांच्या पुढाकारातून अहिल्यानगर मधील पती पत्नींसाठी ‘जोडी तुझी माझी’ या अनोख्या व महाराष्ट्रातील पहिल्याच संगीतमय समुपदेशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या शोला लग्नाला अगदी एक महिना झालेल्यांपासून ५० वर्ष झालेले असे सर्वच वयोगटातील
३०० हून अधिक जोडप्यांनी अभुतपुर्व प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात पुण्याचे मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ.गणेश
शिंदे यांनी उपस्थितांना अंतर्मुख करत सहज, सोप्या भाषेतून मनोरंजनाद्वारे जोडप्यांना सुखी व समाधानी संसारासाठी मार्गदर्शन केले. रोजच्या धकाधकीच्या व ताणतणावाच्या दिवसात सुखी संसाराचे
हरवलेले छोटे छोटे क्षण कसे पुन्हा मिळवायचे याचा
मुलमंत्र डॉ.शिंदे यांनी आपल्या तीन तासाच्या कार्यक्रम
ातून पती पत्नींना दिला.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या काही
जोडप्यांमध्ये कौटुंबिक वाद होते. त्यातील काहींनी
घटस्फोटाचा निर्णयही घेतला होता. पण डॉ.गणेश शिंदे
यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शना मुळे अनेक जोडप्यांनी
घटस्पोटाचा निर्णय बदलला असल्याचे यावेळी घोषित
केले. हे या कार्यक्रमाचे मोठे फलित ठरले. डॉ.शिंदे
यांनी उपस्थितीत जोडप्यांना भावनिक करत रडायला
लावले तर प्रेमाच्या दिवसांचे स्मरण करत रोमँटिकही
केले. कार्यक्रमात अधूनमधून वातावरणाशी अनुरूप
होणारे मराठी हिंदी गाणे यावेळी स्थानिक कलाकार
सादर करत असल्याने उपस्थित जोडप्यांनी नाचण्याचा
आनंद यावेळी लुटला.
यावेळी डॉ.गणेश शिंदे यांनी पती पत्नींना अनेक
उदाहरणे देत मार्गदर्शन केले. असेच अर्धनारी नटेश्वराच्या
चित्राचे महत्व सांगून म्हणाले, पती पत्नीच्या नात्यातील
ओलावा, प्रेम, सुसंवाद कुठेतरी हरवला आहे. जे हरवले
आहे ते पुन्हा मिळवून देण्यासाठीच मी हा कार्यक्रम
करत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला सर्वाधिक
महत्व आहे. स्त्री ही लक्ष्मी, संरक्षण करणारी व विद्या
देणार्‍या देवीचे स्वरूप आहे. म्हणून तिची काळजी
करत तिला प्रेम, आदर व सुरक्षा देणे आवश्यक आहे.
घरातील स्त्री जर सुखी असेल तरच ते घरही सुखी होते.
चांगले पती पत्नी झालात तरच चांगले पालकही तुम्ही
व्हाल. संसाररुपी झाडास प्रेमरूपी खत व विश्वासाचे
पाणी घातल्यास त्याचा वटवृक्ष होऊन त्याला फळे ही
मधुर व रसाळच येतील.
प्रास्ताविकात संयोजक सुहास मुळे
म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनातून सुख, आनंद व
समाधान कमी होत चालले आहे. यात बदल होणे
आवश्यक असल्याने या अनोख्या समुपदेशनाच्या
कार्यक्रमाचे आयोजन केले
आहे. लग्न नावाच्या मातीत
हिंदू संस्कृतीचा वटवृक्ष
आपले मूळ धरून आहे. परंतु
लग्नात केवळ अंतरपाट दूर
झाल्यानंतर अंतर्मनाच मिलन
होईलच याची खात्री नाहीये.
म्हणूनच अनेक घरांमध्ये
पती-पत्नीच्या नात्यांमध्ये
होणारे सूक्ष्म भुकंप कुठल्याही
वेधशाळेत नोंदले जात नाहीत.
नंतर ते गळ्यातलं मंगळसूत्र
एक तर पायाची बेडी तरी होतं
किंवा दुसर्‍याचा गळफास तरी…
यासाठी उणे दुणे न काढत बसता
समजुतीच्या बासरीवर संसाराची
धून वाजली जाण गरजेचे आहे. तसं न होता आजकाल
घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळेच आज
आई-वडिलांनाच समुपदेशनाची गरज आहे. संस्कार व
शिस्ती अभावी कुटुंब व्यवस्था पूर्ण ढासळली आहे. या
पार्श्वभूमीवर ‘जोडी तुझी माझी’ या म्युझिकल कौन्सिलिंग
कार्यक्रमाचे आयोजन केवळ मनोरंजनासाठीच न करता
पती पत्नीने अंतमुर्ख होत चिंतन करण्यासाठी केले
आहे.
उद्घाटन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन
वसंत लोढा, किसनराव लोटके, माऊंट लिटेरा झी
स्कूलचे संचालक सुनील लोटके व प्राचार्य शैलजा लोटके
आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी नेत्ररोग तज्ञ
डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, मर्चंट बँकेचे
संचालक किशोर मुनोत आदींसह नागरिक उपस्थित
होते. यावेळी स्थानिक कलाकार रामनाथ गव्हाणे, दीपक
घायतडक, राजेंद्र शहाणे, किरण खोडे, कु.आराधना
गायकवाड, सागर शेळके व सुनील हळगावकर यांनी
गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.