पारनेर तालुयातील वासुंदे येथील साठे मैदानावर शाश्वत ब्रिगेड टीम आयोजित क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा येलुलकर यांच्या हस्ते झाला.
जयंत येलुलकर यांचे प्रतिपादन
नगर – ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता असते. त्यासाठी हवे ते परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असते. या
खेळाडूंना योग्य ते प्रशिक्षण दिले आणि त्यांच्यातील गुणवत्तेला संधी देत प्रोत्साहन दिल्यास हे खेळाडू देशात चमकतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य व वअहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी
सरचिटणीस जयंत येलुलकर यांनी केले.
पारनेर तालुयातील वासुंदे येथील साठे मैदानावर शाश्वत ब्रिगेड टीम आयोजित क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा येलुलकर यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवृत्त आदर्श शिक्षक सूर्यभान झावरे, बी.एस.एन.एल. चे
अधिकारी भास्करराव चेमटे, रामदास झावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. येलुलकर पुढे म्हणाले की खेळाडूंच्या अंगी
असलेल्या गुणवत्तेला हेरून त्याला आकार देण्यासाठी
संघटनांनी प्रयत्नशील रहायला हवे. खेळाडूंचे
खेळाचे आयुष्य मर्यादित असल्यामुळे गुणवत्ता असूनही
ते मुख्य प्रवाहात न आल्यास त्यांचे भवितव्य झाकोळून
जाते. म्हणून खेळाडूंवर कोणताही अन्याय होऊ न
देता त्यांना हवी ते मदत करणे आवश्यक असते. या
पार्श्वभूमीवर मुंबईत आय.टी क्षेत्रात मोठ्या पदावर
असलेले गावातील उच्च शिक्षित युवक किरण झावरे
यांनी आपल्या गावाची नाळ तुटू न देता आपल्या ग्रामीण
भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे
ही कौतुकास्पद बाब आहे.
स्पर्धेचे संयोजक किरण
झावरे म्हणाले की ग्रामीण भागांत
मोठी गुणवत्ता आहे. त्यांना संधी
मिळायला हवी. भारताचा जलदगती
गोलंदाज झहीर खान आपल्या
अहिल्यानगर जिल्ह्यातील असून
खेळाडूंनी यातून प्रेरणा घ्यावी.
श्री. येलुलकर जिल्हा
क्रिकेट संघटनेचे सचिव असतांना
त्यांच्या कार्यकाळात अनेक
खेळाडूंना राज्यपातळीवर संधी
मिळाल्या. ग्रामीण भागातील
खेळाडूंमध्ये कोणताही न्यूनगंड
राहू न देता त्यांना संधी देण्यासाठी
त्यांनी महाराष्ट्रात प्रथमच
जिल्ह्यातील प्रत्येक तालुयांत तालुका क्रिकेट संघटना
स्थापन करीत क्रांती केली. यामुळे ग्रामीण भागात शास्त्र
शुद्ध क्रिकेट सुरू होऊन मोठी चळवळ उभी राहिली.
अशा प्रकारचा प्रयोग राज्यातच नव्हे तर देशात प्रथमच
सुरू झाला असावा.
यावेळी श्री. झावरे, श्री. चेमटे यांचीही भाषणे
झाली. भाऊसाहेब खिलारी यांनी आभार मानले. स्पर्धेत
एकूण ६० संघांनी भाग घेतला.