वेळीच ओळखा लक्षणे…

योग्य वेळी लक्षणे ओळखली गेली तर कॅन्सर बरा केला जाऊ शकतो; पण आपल्याला कॅन्सरची लागण झाली आहे हे लक्षात यायलाच बराच वेळ जातो. त्यामुळेच कॅन्सरच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कॅन्सरची लागण झाला आहे किंवा कॅन्सर पहिल्या स्टेजला आहे हे न समजल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कॅन्सर शरीराच्या कोणत्याही भागाला जडू शकतो आणि वाढत्या वयाबरोबर त्याचा धोका वाढत जातो. खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी, सिगारेट, तंबाखू आणि अल्कोहोल यासारख्या काही सवयी कॅन्सरचा धोका वाढवतात. शरीराच्या कोणत्याही भागात कॅन्सर होऊ शकतो. त्यापैकी यकृताचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, जनरल कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर हे सर्वाधिक आढळतात. बहुतेक लोक या कॅन्सरच्या आजारांनी ग्रस्त आहेत. काही कॅन्सर त्वचेला होतात तर काही स्नायूंमध्ये होतात. कॅन्सर हा कमी आणि जास्त तीव्रतेनुसार विभागला आहे. लो ग्रेड कॅन्सर शरीरात हळूहळू पसरतो तर हाय ग्रेड कॅन्सर वेगाने पसरतो. हाय ग्रेड कॅन्सरमध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो. वयाच्या 50 वर्षांनंतर कर्करोगाचा धोका वाढतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो.

रहदारीमुळे मुलांना त्वचेचे विकार

कोलोरॅडो राज्यात हे संशोधन करण्यात आले. त्यात आढळून आले की, महामार्गापासून एक हजार मीटरच्या आत राहणार्‍या मुलांना एटोपिक त्वचारोगाचा धोका कमी असतो. महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर राहणार्‍या मुलांना असा धोका जास्त होता. त्यांना अनेक ऍलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकतात. त्याला ‘एटोपिक मार्च’ असेही म्हणतात. अमेरिकेतील सुमारे दहा दशलक्ष मुलांना हा आजार आहे. 2008-2021 मध्ये 0-18 वर्षे वयोगटातील मुलांच्या त्वचाविकाराचा अभ्यास करण्यात आला. वाहतुकीमुळे वायू प्रदूषण सर्वाधिक पसरत आहे. जगातील 27 टक्के वायू प्रदूषण हे वाहनांमधून निघणार्‍या धुरामुळे होत आहे. यामुळे 2019 मध्ये जगातील सुमारे 9 0 लाख लोकांच्या मृत्यूला प्रदूषण जबाबदार आहे. त्यापैकी 66.7 लाख मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, वायू प्रदूषणानंतर ध्वनी प्रदूषण हे आजारांचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. संयुक्त राष्ट्राच्या अह- वालात शहरी ध्वनी प्रदूषण हे पर्यावरणाला सर्वात मोठा धोका आहे. पॅरिस हेल्थ एजन्सीच्या अहवालानुसार, पॅरिसम ध्ये राहणार्‍या लोकांचे सरासरी वय ध्वनी प्रदूषणामुळे 10.7 महिन्यांनी कमी होत आहे. आपल्या झोपेमध्ये अडथळा आणणार्‍या आवाजांना क्रॉनिक ध्वनी म्हणतात. ते आपल्याला त्रास देतात; परंतु त्याहीपेक्षा ते आपल्याला उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका यासारख्या आजारांचे रुग्ण बनवत आहेत. महामार्गाच्या कडेला राहणार्‍या लोकांना दिवसभर ट्रॅफिकचा आवाज ऐकून त्याची सवय होते. त्यामुळे या आवाजांचा त्यांना फारसा त्रास होत नाही; परंतु त्यांचे शरीर या आवाजांवर प्रतिक्रिया देते आणि शरीरातील इतर आजार अनेक पटींनी वाढतात. अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल’मधील अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की मोठ्या आवाजामुळे आपल्या शरीरा- तून अनेक रसायने बाहेर पडतात. आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. आपल्या हृदयाचे ठोके, रक्तदाब वाढतात.

स्त्रियांना झोपेच्या समस्या जास्त

कॅलिफोर्नियास्थित ‘एसआरआय रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या ‘ह्युमन स्लीप रिसर्च प्रोग्राम’च्या संचालक फिओना बेकर यांच्या मते, महिलांमध्ये झोपेची समस्या पौगंडावस्थेपासून सुरू होते आणि प्रौढत्वापर्यंत चालू राहते. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदल हे त्याचे मुख्य कारण आहे. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदलांमुळे चिंता आणि सौम्य उदासीनता महिलांमध्ये उद्भवते. याशिवाय पेटके, पोटाशी संबंधित समस्याही आहेत. या सर्वांचा झोपेवर परिणाम होतो. त्याच वेळी, गर्भधारणेदरम्यान शारीरिक समस्यादेखील वाढतात. त्यामुळे झोपेची नियमि तता कमी होते. यानंतर, रजोनिवृत्ती दरम्यानदेखील सुमारे सात वर्षे हार्मोनल बदल होतात. याचा झोपेवरही परिणाम होतो. झोपेच्या समस्या असलेल्या महिलांसाठी ‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी’ प्रभावी आहे. यामध्ये मानसशास्त्रीय आणि वर्तणुकीचे तंत्र वापरले जाते. नकारात्मक विचार कमी करणे, योगासने आणि प्राणायाम करणे, झोपेच्या वेळेत बदल करणे हे उपाय केल्याने झोप न येण्याच्या समस्येवर मात करता येते. याशिवाय हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीदेखील प्रभावी आहे. यामध्ये रजोनिवृत्तीच्या काळात कमी होणारे हार्मोन्स सप्लिमेंट्सच्या माध्यमातून पूर्ण होतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही थेरपी घेता येते. यामुळे झोप न येण्या समस्येचे निर्मूलन होऊ शकते.

रक्तपेशी रोखणार कॅन्सर!

संशोधकांनी ‘मॅक्रोफेजेस’ नावाच्या पांढर्‍या रक्त पेशींचा एक प्रकार शोधून काढला आहे. त्यामुळे कर्करोग मुळापासून बरा होऊ शकतो. या पांढर्‍या पेशी कॅन्सरला शरीरातील एखाद्या भागावर हल्ला करण्यापासूनदेखील प्रतिबंधित करतात. स्तनाचा कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर किंवा त्वचेच्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण असते. कॅन्सरशी लढणार्‍या रुग्णांसाठी मात्र शस्त्रक्रिया हाच पहिला पर्याय असतो. तरीही शस्त्रक्रिया कर्करोगाच्या सर्व पेशी काढून टाकू शकत नाही आणि त्यामुळे उरलेल्या पेशी वाढू शकतात आणि संपूर्ण शरीरात पसरू शकतात. ‘मॅक्रोफेजेस’ नावाच्या पांढर्‍या रक्त पेशी केवळ कर्करोगाच्या पेशी काढून टाकत नाहीत, तर रोगप्रतिकारक शक्तीला भविष्यात कर्करोगाच्या पेशींना ओळखण्यास आणि मारण्यासदेखील शिकवतात. याशिवाय ट्यूम रच्या वस्तुमानामध्ये प्रवेश करू शकतील असे रेणू तयार करणे आव्ह- आव्हानात्मक आहे, असे अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील प्राध्यापक डेनिस डिशर यांनी सांगितले.

कॅन्सरवर मात करण्यासाठी नवीन रेणू तयार करण्याऐवजी आम्ही रुग्णांना कॅन्सरच्या पेशी मारणार्‍या ‘मॅक्रोफेजेस’ पेशी वापरण्याचा सल्ला देतो, असे डिशर म्हणाले. ‘मॅक्रोफेजेस’ ही एक प्रकारची पांढरी रक्तपेशी आहे, जी शरीरातून कॅन्सरचे जीवाणू, विषाणू काढून टाकण्यास मदत करते आणि कॅन्सर संक्रमित पेशींचे आक्रमण नष्ट करते. ‘मॅक्रोफेजेस’ पेशी आपल्या शरीराला भविष्यात आक्रमण करणार्‍या पेशी लक्षात ठेवायला आणि त्यांच्यावर हल्ला करून नष्ट करायला शिकवतात. प्रतिकारशक्ती कर्करोगाची लस तयार करण्यासाठी आवश्यक आहे. तथापि, ‘मॅक्रोफेजेस’पेशी जे पाहू शकत नाही त्यावर हल्ला करू शकत नाही. ‘मॅक्रोफेजेस’ कर्करोगाच्या पेशींना शरीराचा भाग म्हणूनच ओळखतात; शरीरावर आक्रमण करणार्‍या पेशी म्हणून नाही, असे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे पोस्ट डॉक्टरल सहकारी लॅरी डुलिंग यांनी सांगितले. या पांढर्‍या रक्त पेशींना कर्करोगाच्या पेशी पाहण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्याची परवानगी देण्यासाठी आम्हाला सेल-टू-सेल संप्रेषण नियंत्रित करणार्‍या आण्विक मार्गाची तपासणी करावी लागली, असे ते म्हणाले. ‘कल्चर प्लेट्स’मधील ‘माऊस मेलेनोमा’ पेशींच्या ट्यूमोरॉइड्स समूहावर ‘इंजिनीयर्ड मॅक्रोफेजेस’ चाचणी घेण्यात आली. ‘मॅक्रोफेजेस’ पेशींच्या सहकार्याने कर्करोगाच्या पेशींभोवती क्लस्टर करण्यात आले आणि हळूहळू ट्यूमर नष्ट करण्यात आले. चाचणीदरम्यान, या पांढर्‍या पेशी 80 टक्के उंदरांमधील ट्यूमर काढून टाकण्यास सक्षम होत्या. त्यानंतर आठवड्यांनंतर कर्करोगविरोधी लढणारी इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी वाढली, असे संशोधकांनी सांगितले. ही ‘मॅक्रोफेज थेरपी’ विद्यमान ‘अँटीबॉडी थेरपी’च्या संयोजनात उत्कृष्ट कार्य करते, असे संशोधकांनी सांगितले. भविष्यात कॅन्सर ट्यूमर दूर करण्यासाठी उपचार म्हणून रुग्ण या पेशींवर अवलंबून राहू शकतात. ‘मॅक्रोफेज थेरपी’ ही कर्करोगाच्या लसीची गुरूकिल्ली असू शकते.

साखर कमी होणे अधिक धोकादायक

रक्तातील साखर वाढणे म्हणजे मधुमेहाचा धोका. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याच्या स्थितीला ‘हायपरग्लाइसेमिया’ म्हणतात. मधुमेहासाठी घेतलेली औषधे कधी कधी ‘हायपोग्लायसेमिया’चे कारण बनतात. असे वारंवार होत असल्यास सतर्क राहणे आवश्यक आहे. ‘हायपोग्लाइसेमिया’ म्हणजे कमी रक्तातील साखरेची लक्षणे लोकांम ध्ये वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. रक्तातील साखर कमी होते, तेव्हा काही लोकांना विलक्षण थंडी किंवा घाम येऊ शकतो. साखर कमी झाल्यामुळे हृदयावरही परिणाम होतो, त्याचा वेग वाढतो. ‘हायपोग्लायसेमिया’मुळे व्यक्ती गोंधळून जाते, एकाग्र होऊ शकत नाही. याशिवाय, अस्वस्थता, चिडचिड किंवा मूर्च्छा हीदेखील सामान्य लक्षणे आहेत.

आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र

रसनेंद्रियांचा विकास चांगला होण्यासाठी बाळ चार महिन्याचे झाल्यावर त्याला बाहेरील पेय पदार्थ देण्यास सुरुवात करावी. सर्वांत प्रथम बाहेरील अन्न सुरू करण्याआधी अन्नप्राशन संस्कार करून घ्यावा. त्यानंतर वरणाचे पाणी, पालकाच्या भाजीचे पाणी बाळाला देण्यास सुरूवात करावी. बाळ सहा महिन्याचे झाल्यावर फळाचे ज्यूस, भाज्यांचे सूप, नाचणी सत्त्व बाळाला द्यावे. या सर्व पदार्थांमधील चवीतील फरक बाळ चांगल्या प्रकारे ओळखू लागते. यातील काही पदार्थ बाळ आवडीने खाते तर काही पदार्थ खाताना बाळ रडण्यास लागते. चवीमधील फरक ओळखता येणे म्हणजेच रसनेंद्रियांचा विकास करून मेंदूला उत्तेजित करणे होय. याचे खास उदाहरण द्यावयाचे म्हणजे औषध पिताना त्याची चव बाळाला आवडत नाही म्हणून बाळ लगेचच रडण्यास सुरुवात करते.

स्पर्शेद्रियांचा विकास चांगला होण्यासाठी बाळाला जास्तीत जास्त आईच्या जवळ ठेवावे. बाळाला आईने शास्त्रोक्त मसाज करणे, अभ्यंग स्नान घालणे यामधून आपण बाळाच्या स्पर्शेद्रिये विकास करू शकतो. याच बरोबर घ्राणेंद्रियांचा विकास व्हावा म्हणून स्नेहन (मसाज) करताना औषधीसिद्ध दुर्वांकुर बेबी ऑईल वापरावे; यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढून बाळाचे आरोग्य चांगले राहते. आईने स्नेहन करताना एखादे बडबडगीत, बालगीत किंवा एखादा मंत्र वारंवार म्हणावा. यामधून आपण बाळाच्या श्रवणेंद्रियाला उत्तेजना देऊ शकतो. स्नेहन करताना बाळाशी गप्पा मारणे, मस्ती घालणे, गुदगुल्या करणे हे प्रयोग आनंदाने करावेत. आईने वात्सल्यपूर्वक प्रेमाने केलेले स्नेहन बाळाला नक्कीच आनंददायी ठरते.

3. 1 वर्ष ते 3 वर्ष : या वयातील मुलांच्या पंचेद्रियांचा विकास होऊन मेंदूला चालना मिळण्यासाठी वेगवेगळ्या आकारांची, रंगांची खेळणी बाळाला द्यावी. दिड ते दोन वर्षांची मुलगी, बाहुली, प्राणी, पक्षी अशा खेळण्यांबरोबर जास्त खेळते, तर म ुलगा मोटारगाडी, चेंडू, विमान या खेळण्यांबरोबर जास्त खेळतो. या वयातील बाळांना कार्टूनची चित्रे असणारी पुस्तके बघण्यास द्यावीत. या वयातील मुलांना वाचता येत नाही परंतु पुस्तकातील चित्र बघून ते संदर्भ लावू शकतात व आपण बाळाचा मानसिक व बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे करू शकतो. याबद्दलचे सखोल माहिती आपण बाळाची खेळणी या प्रकरणात आपण पाहिली आहे. बाळाचे आरोग्य सुदृढ व्हावे व त्याची शारीरिक व मानसिक वाढ चांगली व्हावी म्हणून दुर्वांकूर बालप्राशन अर्धा अर्धा चमचा सकाळ-संध्याकाळ द्यावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400

आंतरिक बल (भाग – 1)-मन एक रेडीयो स्टेशन है

किसी प्रियजन की मृत्यु, घाटा और असफलता से भी अवसाद हो जाता है। पारिवारिक झगड़े, सम्बन्ध विच्छेद, प्यार न मिलने से भी उदासी आ जाती है। पढ़ाई का दवाब, काम का दवाब, आर्थिक दवाव, जिम्मेवारी का दवाब होने से भी निराशा आ जाती है। जब हम दूसरों पर आर्थिक रुप से निर्भर हो जाते हैं तो यह भी निराश होने का मुख्य कारण है। एक योगी जब बार-बार पॉंच विकारों से हार खाता है या जीवन में महत्व नहीं मिलता है तो वह अवसाद में चला जाता है। बुरे संस्कार व बुरी आदतों से बार-बार हार खाने के कारण भी निराश हो जाते हैं। इसके हल के लिए स्थूल कारणों का निवारण करें। बीमार हैं तो दवाई लें। बेरोजगार हैं तो रोजगार दिलाने में मदद / प्रोत्साहन दें। पढ़ाई की समस्या है तो सलाह लें, मेहनत करें। दूसरों से तुलना बंद करें। हर बात में टोका-टाकी न करें। आर्थिक परेशानी दूर करने के तरीके सुझाये। परिवार में कुछ देर इकट्ठे बैठकर बातें करें अपनापन दिखाये। बुजुर्गों के साथ जरूर बैठे। अवसाद का मूल कारण है मानसिक कमजोरी। जो भी कारण है उनसे सम्बन्धित ज्ञान हासिल करो। जब भी कोई बुरा विचार आये उसका उलटा अच्छा जो होना चाहिये था वह शब्द मन में दोहराते रहें/सोचें। जैसे कोई तिरस्कार करे तो सोचो मैं ऐसा लायक बनूंगा कि सभी प्रोत्साहन देंगे, कोई प्रताड़ना करे तो सोचो मैं अपने पर आश्रित लोगों के साथ ऐसा नहीं करूंगा उन्हें लाड़-प्यार से रखूंगा। अवसाद से बाहर निकलने के लिये कोई अव्यक्त-वाणी या अन्य कोई। पुस्तक पढ़े और तब तक पढ़े जब तक हल न मिल जाये। धन का पर्याप्त प्रबंध करें। कोई-न-कोई स्थूल काम करते रहो। सांस रोककर बाबा को याद करो। प्यारे बाबा से इस निष्काम सेवा के साथ, एक विरोधाभास जुड़ा है। सच्ची निष्काम सेवा वही है जिसे हम किसी इनाम या सम्मान की इच्छा किए बिना करें। दूसरों की सहायता करने की स्वाभाविक इच्छा के वशीभूत होकर यह सेवा स्वच्छंद की जाती है। इसमें इंसान किसी दूसरे की सहायता करते समय, अपने आराम और सुरक्षा के साथ-साथ अपनी इच्छाओं और आवश्यकताओं को भी भूल जाता है। ऐसे भी इंसान होते हैं, जो दूसरों को बचाने के लिए अपनी जान तक न्योछावर कर देते हैं। सच्चे निस्स्वार्थी लोग अपने प्रयत्नों के बदले में किसी चीज़ की आशा नहीं करते। निष्काम सेवा में निहित विरोधाभास यह है कि कोई पुरस्कार न चाहते। हुए भी, यह सेवा करने से सबसे ऊँचा पुरस्कार प्राप्त होता है और वह है, ईश्वर की प्रसन्नता। यह लाभ बहुत छोटा प्रतीत हो सकता है, परन्तु उन लोगों के लिए । जिन्हें अपने आध्यात्मिक विकास में दिलचस्पी है, यह जीवन में प्राप्त किया जाने वाला सबसे बड़ा पुरस्कार है। इसका फल इंसान तब भोगता है, जब वह अकेला एकांत में बैठता है और प्रकाश, प्रेम और शांति की गुप्त द्वार को आराम से खुलता हुआ पाता है। ये खजाने नि:स्वार्थी आत्माओं को ऐसे आंतरिक आनन्द और संतुष्टि से भर देते हैं, जो किसी भी संसारी कार्य से प्राप्त नहीं हो सकते। संत दर्शनसिंह जी फ़रमाया करते थे कि निष्काम सेवा का लाभ उतना ही अधिक है, जितना कि उतने समय भजन-सुमिरन करने का। अहिंसा, सच्चाई, दिल की पवित्रता और नम्रता का जीवन सफल भजन-सुमिरन के लिए ज़रूरी मन की स्थिरता प्रदान करते हैं। परन्तु निष्काम सेवा से प्रभु की वह दया मेहर मिलती है, जो आंतरिक द्वार खोलने में हमारी सहायता करती है।

(प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विश्‍व विद्यालय)

जीवन चक्र-कर्म चक्र

आता येथे प्रश्न उद्भवतो की विशिष्ट किंवा दुर्मिळ प्रकरणांमध्ये जेव्हा संत सद्गुरू एखाद्या जीवाच्या कर्मांचे ओझे स्वतःवर घेतात, तेव्हा ते शिष्यांना कर्माच्या प्रचंड परिणामापासुन कसे वाचवतात. वर सांगितलेल्या प्रमाणे शरीराशी संबंधित कर्मांकरीता देहालाच सामोरे जावे लागते. प्रभु ने तुच्छ मनुष्य देह धारण की, ताकि वह कमजोर बनकर दुःखों का जीवन चक्र अनुभव कर सके। अर्थात प्रभुने तुच्छ मनुष्य देह धारण केला, कारण तो कमजोर बनून दुखाचा मी घरगुती त्रासामुळे फार वाईट तर्‍हेने घेरला गेलो होतो व इतका कोंडम ारा जाणवू लागला होता की आत्महत्येशिवाय दुसरा कोणताच उपाय सुचत नव्हता. पण मी असा सुद्धा विचार करत होतो की आत्महत्या केल्यानंतर गुरू सांभाळ करीत नाहीत. कदाचित नरकात जावे लागेल, हे सर्वात मोठे पाप आहे. त्या दिवसात मी योजना भवनमध्ये काम करत होतो आणि दयाल पुरूष महाराज संत दर्शनसिंहजी डी.जी.एस. ऍण्ड डी. च्या इमारतीत काम करीत होते. जे योजना भवन पासून फारच जवळ आहे. अचानक एकाने मला सांगितले की, श्री दर्शनसिंह दुग्गल डी.जी. एस. ऍण्ड डी. मध्ये डेप्युटी सेक्रेटरी आहेत. तुम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा असेल तर ते भेटू शकतात. मी विचार करू लागलो की माझ्या समस्या अडचणी दयाल पुरूष दर्शनसिंहजींना का सांगू नयेत? कदाचित काही शंका निवारण तरी त्यामुळे होईल. मी फारच घाबरून गेलो होतो. मी स्वतःला एकटा आणि फारच गांजलेला असा समजत होतो. मी दुसर्‍या दिवशी महाराजांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो. मी त्यांच्या पी.ओ. ला भेटलो, त्याने सांगितले की, साहेब, महाराजांचे जवळ काही माणसे बोलत आहेत. जेव्हा ती माणसे बाहेर जातील तेव्हा तुम्ही आत जा. परंतु त्या बेशुद्धावस्थेत माझ्या अंतःकरणात कोणते तरी महापुरूष दर्शन देत होते. ते मला धीर (धैर्य) देत होते आणि नामस्मरण करण्याची प्रेरणा देत आणि सांगत की गुरूचे ध्यान करा. हा तेजपुंज चेहरा अन्य कुणाचा नाही तर प्रत्यक्ष परम संत दर्शनसिंहजी महाराजांचा होता. त्यांचे दर्शन होत असताना मी अर्धवट शुद्धित असलेल्या स्थितीत होतो व 26 जुलै 1988 रोजी मी पुर्णपणे शुद्धिवर आलो. सर्व डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आणि माझ्या कुटुंबातील सर्वांना अतिशय आनंद झाला. शेवटी गुरूंनी मला सहाय्य केले आणि या जगातील सर्व उपचार त्यांच्या कृपेपुढे फिके पडले मला जीवदान मिळाले होते. परंतु अद्याप नामदान (नामदिक्षा) मि ळण्याचे बाकी होते. त्या काळातच मी पुन्हा आजारी पडलो व 1॥ वर्षे आजारी होतो. त्यानंतर मी पुन्हा ठिकठाक झालो त्यानंतर शेवटी मला सद्गुरू राजिंदर सिंहजी महाराज यांच्याकडून नामदानाची दौलत मि ळाली. महाराजांच्या चरणी येण्यापुर्वीची आणखी एक घटना आहे. मी उत्तर रेल्व मुख्यालय बडोदा हाऊस येथे निरीक्षक या पदावर नियुक्त होतो. जुन 1986 चे शेवटचे दिवस होते.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)

शेतकर्‍याची आळशी मुले

एका गावात एक शेतकरी राहत होता. दिवसभर शेतात राबून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे. त्याला चार मुले होती. आता ती मोठी झाली होती. पण त्यांना काम करण्याचा, शेतात राबण्याचा फारच कंटाळा. आयते खाऊन टिवल्या-बावल्या करण्यातच त्यांचा वेळ जात असे. आता तो शेतकरी फारच म्हातारा झाला होता. कधी मरण येईल, याचा भरवसा नव्हता. आपल्यानंतर आपल्या मुलांचे कसे होणार, याची त्याला चिंता लागली होती. म्हणून एके दिवशी त्याने आपल्या चारही मुलांना जवळ बोलावून सांगितले, ‘‘मुलांनो, माझा आता काही भरोसा नही. मी सर्व जमीन, त्यातील बागा तुमच्या स्वाधीन करतो आहे. याच जमिनीत कुठे तरी मी पैसा पुरून ठेवला आहे. आता नेमका कुठे, ते मला आठवत नाही. तुम्ही सर्व जमीन खोदून काढा. कुठे तरी तो तुम्हाला सापडेल.’’ हे ऐकून मुलांना फारच आनंद झाला. आयते घबाड हाती पडेल, असे त्यांना वाटले. उद्याच्या उद्या शेतं खांदायला सुरुवात करू, असे म्हणून ते झोपी गेले. सकाळी बघतात, तो म्हातारा मरण पावलेला. मग त्याचे सर्व क्रियाकर्म केल्यावर सर्व आले. जमिनीची चांगली मशागत केली, तर पीक चांगले येऊन पैसाही हाती येतो, हे त्यांना कळून चुकले. वडिलांच्या सांगण्याचा हाच अर्थ, हे त्यांना मनोमन पटले.

तात्पर्य – धन-पैसा कशाही स्वरूपात मिळतो. प्रत्यक्ष पैसाच मिळाला पाहिजे, असे नव्हे.

मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज- पती-पत्नीचा रक्तगट एक असेल तर मुले व्हायला काही प्रॉब्लेम येतो का?

आपल्याकडे पत्रिका बघून एक नाडी असेल तर लग्नाला मनाई करतात. आणि त्यात किती तथ्य आहे आणि ही बाब वैज्ञानिक दृष्टीने किती बरोबर आहे याबद्दल मी काही सांगू शकत नाही. त्या बाबतीत तथ्यपूर्ण माहिती वाचायला आवडेल. मात्र ही समजूत आहे. मात्र यावर पण तोडगे अनेक ज्योतिषी सांगतात. एक नाडी आहे तरी अमुक केल्याने चालते वगैरे वगैरे. आपल्याकडे एक गोत्र असेल तर सहसा लग्न नाही करत. पण कारण एक गोत्र असेल तर एकाच पुरुषापासून व्युत्पत्ती झालेले आहे असे मानले जाते आणि मग ते बहीण भाऊ असे काहीसे नाते समजतात. पण वैज्ञानिक दृष्टीने साधारण 7 पिढ्या गेल्या की गुणसूत्रे बदलून जातात. त्यामुळे मूळ पुरुष एक असला तरी वेगवेगळ्या मूळ स्त्रिया त्यात सामील झाल्याने आणि स्त्रिया आपल्या अपत्यांना आपले mitochondrial DN ा देत असल्याने तो दोष ही नाहीसा होतो. अर्थात आपल्याकडे सगोत्री विवाह करतात, मुलीला मामाच्या मांडीवर देऊन. म्हणाजे आपल्या आईच्या गोत्रात जाऊन. अर्थात अर्धी आणि सुतभर अधिक ती मुलगी आईच्या गोत्रचीच असते ही बाब गौण समजून दुर्लक्ष करतात.

मात्र एक रक्त गट असेल तर काहीही फरक पडत नाही. मुले होण्यास काहीच अडचण नाही. अपत्याचा रक्त गट बहुतेक तोच राहील. रक्त गट आणि मुले होणे यांचा काहीच संबंध नाही. अर्थात, B, O आणि B हे रक्तगट. हे काहीही असू शकतात. पण Rh फॅक्टर हा एक मुद्दा महत्वाचा ठरतो. जर वडील Rh positive आणि आई Rh negative असेल आणि जर होणारे अपत्य Rh positive झाले तर पोटात असताना बाळाच्या रक्तातील Rh फॅक्टरच्या विरोधात आईच्या शरीरात रपींळलेवळशी निर्माण होतात. आणि मग दोघांच्याही आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो. जुन्या काळी जेव्हा हे माहीत नव्हते तेव्हा मुलींना खूप धोका असायचा. पण आजकाल रक्त तपासणी करून त्यासाठी औषध योजना करून हा धोका टाळता येतो. मात्र त्यासाठी आईचे रक्त तपासणे गरजेचे आहे. जर ती स्वतः Rh positive असेल तर बाळ Rh negative चालते. फक्त आई negative असेल तर काळजी घ्यावी लागते. मग वडलांचे रक्त तपासण्यात येते. जर आई B + असेल, तर वडील B,B, की O + की काहीच फरक पडत नाही. पण आई B – असेल तर वडलांचा Rh factor तपासावा लागेल.