रक्तपेशी रोखणार कॅन्सर!

0
59

संशोधकांनी ‘मॅक्रोफेजेस’ नावाच्या पांढर्‍या रक्त पेशींचा एक प्रकार शोधून काढला आहे. त्यामुळे कर्करोग मुळापासून बरा होऊ शकतो. या पांढर्‍या पेशी कॅन्सरला शरीरातील एखाद्या भागावर हल्ला करण्यापासूनदेखील प्रतिबंधित करतात. स्तनाचा कॅन्सर, मेंदूचा कॅन्सर किंवा त्वचेच्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण असते. कॅन्सरशी लढणार्‍या रुग्णांसाठी मात्र शस्त्रक्रिया हाच पहिला पर्याय असतो. तरीही शस्त्रक्रिया कर्करोगाच्या सर्व पेशी काढून टाकू शकत नाही आणि त्यामुळे उरलेल्या पेशी वाढू शकतात आणि संपूर्ण शरीरात पसरू शकतात. ‘मॅक्रोफेजेस’ नावाच्या पांढर्‍या रक्त पेशी केवळ कर्करोगाच्या पेशी काढून टाकत नाहीत, तर रोगप्रतिकारक शक्तीला भविष्यात कर्करोगाच्या पेशींना ओळखण्यास आणि मारण्यासदेखील शिकवतात. याशिवाय ट्यूम रच्या वस्तुमानामध्ये प्रवेश करू शकतील असे रेणू तयार करणे आव्ह- आव्हानात्मक आहे, असे अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील प्राध्यापक डेनिस डिशर यांनी सांगितले.

कॅन्सरवर मात करण्यासाठी नवीन रेणू तयार करण्याऐवजी आम्ही रुग्णांना कॅन्सरच्या पेशी मारणार्‍या ‘मॅक्रोफेजेस’ पेशी वापरण्याचा सल्ला देतो, असे डिशर म्हणाले. ‘मॅक्रोफेजेस’ ही एक प्रकारची पांढरी रक्तपेशी आहे, जी शरीरातून कॅन्सरचे जीवाणू, विषाणू काढून टाकण्यास मदत करते आणि कॅन्सर संक्रमित पेशींचे आक्रमण नष्ट करते. ‘मॅक्रोफेजेस’ पेशी आपल्या शरीराला भविष्यात आक्रमण करणार्‍या पेशी लक्षात ठेवायला आणि त्यांच्यावर हल्ला करून नष्ट करायला शिकवतात. प्रतिकारशक्ती कर्करोगाची लस तयार करण्यासाठी आवश्यक आहे. तथापि, ‘मॅक्रोफेजेस’पेशी जे पाहू शकत नाही त्यावर हल्ला करू शकत नाही. ‘मॅक्रोफेजेस’ कर्करोगाच्या पेशींना शरीराचा भाग म्हणूनच ओळखतात; शरीरावर आक्रमण करणार्‍या पेशी म्हणून नाही, असे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे पोस्ट डॉक्टरल सहकारी लॅरी डुलिंग यांनी सांगितले. या पांढर्‍या रक्त पेशींना कर्करोगाच्या पेशी पाहण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्याची परवानगी देण्यासाठी आम्हाला सेल-टू-सेल संप्रेषण नियंत्रित करणार्‍या आण्विक मार्गाची तपासणी करावी लागली, असे ते म्हणाले. ‘कल्चर प्लेट्स’मधील ‘माऊस मेलेनोमा’ पेशींच्या ट्यूमोरॉइड्स समूहावर ‘इंजिनीयर्ड मॅक्रोफेजेस’ चाचणी घेण्यात आली. ‘मॅक्रोफेजेस’ पेशींच्या सहकार्याने कर्करोगाच्या पेशींभोवती क्लस्टर करण्यात आले आणि हळूहळू ट्यूमर नष्ट करण्यात आले. चाचणीदरम्यान, या पांढर्‍या पेशी 80 टक्के उंदरांमधील ट्यूमर काढून टाकण्यास सक्षम होत्या. त्यानंतर आठवड्यांनंतर कर्करोगविरोधी लढणारी इम्युनोग्लोबुलिन अँटीबॉडी वाढली, असे संशोधकांनी सांगितले. ही ‘मॅक्रोफेज थेरपी’ विद्यमान ‘अँटीबॉडी थेरपी’च्या संयोजनात उत्कृष्ट कार्य करते, असे संशोधकांनी सांगितले. भविष्यात कॅन्सर ट्यूमर दूर करण्यासाठी उपचार म्हणून रुग्ण या पेशींवर अवलंबून राहू शकतात. ‘मॅक्रोफेज थेरपी’ ही कर्करोगाच्या लसीची गुरूकिल्ली असू शकते.