रहदारीमुळे मुलांना त्वचेचे विकार

0
64

कोलोरॅडो राज्यात हे संशोधन करण्यात आले. त्यात आढळून आले की, महामार्गापासून एक हजार मीटरच्या आत राहणार्‍या मुलांना एटोपिक त्वचारोगाचा धोका कमी असतो. महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर राहणार्‍या मुलांना असा धोका जास्त होता. त्यांना अनेक ऍलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकतात. त्याला ‘एटोपिक मार्च’ असेही म्हणतात. अमेरिकेतील सुमारे दहा दशलक्ष मुलांना हा आजार आहे. 2008-2021 मध्ये 0-18 वर्षे वयोगटातील मुलांच्या त्वचाविकाराचा अभ्यास करण्यात आला. वाहतुकीमुळे वायू प्रदूषण सर्वाधिक पसरत आहे. जगातील 27 टक्के वायू प्रदूषण हे वाहनांमधून निघणार्‍या धुरामुळे होत आहे. यामुळे 2019 मध्ये जगातील सुमारे 9 0 लाख लोकांच्या मृत्यूला प्रदूषण जबाबदार आहे. त्यापैकी 66.7 लाख मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, वायू प्रदूषणानंतर ध्वनी प्रदूषण हे आजारांचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. संयुक्त राष्ट्राच्या अह- वालात शहरी ध्वनी प्रदूषण हे पर्यावरणाला सर्वात मोठा धोका आहे. पॅरिस हेल्थ एजन्सीच्या अहवालानुसार, पॅरिसम ध्ये राहणार्‍या लोकांचे सरासरी वय ध्वनी प्रदूषणामुळे 10.7 महिन्यांनी कमी होत आहे. आपल्या झोपेमध्ये अडथळा आणणार्‍या आवाजांना क्रॉनिक ध्वनी म्हणतात. ते आपल्याला त्रास देतात; परंतु त्याहीपेक्षा ते आपल्याला उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका यासारख्या आजारांचे रुग्ण बनवत आहेत. महामार्गाच्या कडेला राहणार्‍या लोकांना दिवसभर ट्रॅफिकचा आवाज ऐकून त्याची सवय होते. त्यामुळे या आवाजांचा त्यांना फारसा त्रास होत नाही; परंतु त्यांचे शरीर या आवाजांवर प्रतिक्रिया देते आणि शरीरातील इतर आजार अनेक पटींनी वाढतात. अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल’मधील अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की मोठ्या आवाजामुळे आपल्या शरीरा- तून अनेक रसायने बाहेर पडतात. आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम होतो. आपल्या हृदयाचे ठोके, रक्तदाब वाढतात.