आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र

0
61

रसनेंद्रियांचा विकास चांगला होण्यासाठी बाळ चार महिन्याचे झाल्यावर त्याला बाहेरील पेय पदार्थ देण्यास सुरुवात करावी. सर्वांत प्रथम बाहेरील अन्न सुरू करण्याआधी अन्नप्राशन संस्कार करून घ्यावा. त्यानंतर वरणाचे पाणी, पालकाच्या भाजीचे पाणी बाळाला देण्यास सुरूवात करावी. बाळ सहा महिन्याचे झाल्यावर फळाचे ज्यूस, भाज्यांचे सूप, नाचणी सत्त्व बाळाला द्यावे. या सर्व पदार्थांमधील चवीतील फरक बाळ चांगल्या प्रकारे ओळखू लागते. यातील काही पदार्थ बाळ आवडीने खाते तर काही पदार्थ खाताना बाळ रडण्यास लागते. चवीमधील फरक ओळखता येणे म्हणजेच रसनेंद्रियांचा विकास करून मेंदूला उत्तेजित करणे होय. याचे खास उदाहरण द्यावयाचे म्हणजे औषध पिताना त्याची चव बाळाला आवडत नाही म्हणून बाळ लगेचच रडण्यास सुरुवात करते.

स्पर्शेद्रियांचा विकास चांगला होण्यासाठी बाळाला जास्तीत जास्त आईच्या जवळ ठेवावे. बाळाला आईने शास्त्रोक्त मसाज करणे, अभ्यंग स्नान घालणे यामधून आपण बाळाच्या स्पर्शेद्रिये विकास करू शकतो. याच बरोबर घ्राणेंद्रियांचा विकास व्हावा म्हणून स्नेहन (मसाज) करताना औषधीसिद्ध दुर्वांकुर बेबी ऑईल वापरावे; यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढून बाळाचे आरोग्य चांगले राहते. आईने स्नेहन करताना एखादे बडबडगीत, बालगीत किंवा एखादा मंत्र वारंवार म्हणावा. यामधून आपण बाळाच्या श्रवणेंद्रियाला उत्तेजना देऊ शकतो. स्नेहन करताना बाळाशी गप्पा मारणे, मस्ती घालणे, गुदगुल्या करणे हे प्रयोग आनंदाने करावेत. आईने वात्सल्यपूर्वक प्रेमाने केलेले स्नेहन बाळाला नक्कीच आनंददायी ठरते.

3. 1 वर्ष ते 3 वर्ष : या वयातील मुलांच्या पंचेद्रियांचा विकास होऊन मेंदूला चालना मिळण्यासाठी वेगवेगळ्या आकारांची, रंगांची खेळणी बाळाला द्यावी. दिड ते दोन वर्षांची मुलगी, बाहुली, प्राणी, पक्षी अशा खेळण्यांबरोबर जास्त खेळते, तर म ुलगा मोटारगाडी, चेंडू, विमान या खेळण्यांबरोबर जास्त खेळतो. या वयातील बाळांना कार्टूनची चित्रे असणारी पुस्तके बघण्यास द्यावीत. या वयातील मुलांना वाचता येत नाही परंतु पुस्तकातील चित्र बघून ते संदर्भ लावू शकतात व आपण बाळाचा मानसिक व बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे करू शकतो. याबद्दलचे सखोल माहिती आपण बाळाची खेळणी या प्रकरणात आपण पाहिली आहे. बाळाचे आरोग्य सुदृढ व्हावे व त्याची शारीरिक व मानसिक वाढ चांगली व्हावी म्हणून दुर्वांकूर बालप्राशन अर्धा अर्धा चमचा सकाळ-संध्याकाळ द्यावा.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400