
आपल्या घराच्या दरवाजावर शुभचिन्हे म्हणजे स्वस्तिक, ॐ, गणपती, कुबेर यांची चित्रे लावावी. त्यामुळे बाहेरील अमानवी शक्तींपासून वास्तूसहीत सर्व कुटुंबियांचे रक्षण होते. देवघरात तुटक्या-फुटक्या वस्तू ठेवू नयेत. देवघराच्या वरती-खाली काहीही सामान ठेवू नये.

आपल्या घराच्या दरवाजावर शुभचिन्हे म्हणजे स्वस्तिक, ॐ, गणपती, कुबेर यांची चित्रे लावावी. त्यामुळे बाहेरील अमानवी शक्तींपासून वास्तूसहीत सर्व कुटुंबियांचे रक्षण होते. देवघरात तुटक्या-फुटक्या वस्तू ठेवू नयेत. देवघराच्या वरती-खाली काहीही सामान ठेवू नये.

साहित्य – 3 वाट्या दिल्ली राईस, दीड वाटी मुगाची डाळ, 1 बटाट्याचे मध्यम काप, हिंग, हळद, 1 वाटी मटार दाणे, 2 कांदे, 2 इंच आलं, तूप, 15-20 लसूण पाकळ्या, मिरच्या, दही, थोडे काजू, बदाम, बेदाणे, जिरे, मीठ, गरम मसाला आणि सुक्या मिरच्या.
कृती – खिचडी करण्याच्या आधी 1 तास अगोदर डाळ व तांदूळ एकत्र करून धुवून ठेवावे. कांदे उभे पातळ चिरावे. पातेल्यात तूप तापवून काजू, बदाम, बेदाणे तळून घ्यावे. त्याच तुपात कांदा तळून घ्यावा. कांदा लालसर कुरकुरीत तळावा. आलं-लसणाची पेस्ट करावी. पातेल्यात तूप तापवून हिंग, जिरे, हळद, सुक्या मिरच्या आणि आलं-लसूण पेस्ट घालून हे सर्व जिन्नस परतावे. त्यात डाळ, तांदूळ, बटाटे, मटार दाणे टाकावेत. ते चांगले परतून तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे. चवीनुसार त्यात मीठ, गरम मसाला घालून मंद आचेवर खिचडी शिजू द्यावी. खिचडी वाढताना ती गरमागरमच वाढावी.

ज्यांना शुगरचा त्रास असतो त्यांनी कच्च्या पपईचे सेवन करून रक्तात शर्कराच्या मात्रेला कमी करू शकता. यामुळे शरीरात इंसुलिनची मात्रा वाढते. पपई पोटाशी निगडित समस्या दूर करते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढते. मात्र गर्भवती महिलेस पपई खायला देऊ नये.

आई – बंड्या आज काय शिकवले शाळेत.
बंड्या – लिहायला शिकवले.
आई – अरे वा छान! काय लिहिले?
बंड्या – काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले…

एका बाईला नेहमी जुळी मुले व्हायची म्हणून ती ज्योतिषाकडे जाते.
बाई मला प्रत्येक वेळी जुळीच मुलं का होतात?
ज्योतिषी त्याचं असं आहे बाई. हल्ली जाळपोळ, लुटालूट, चोर्यामार्या, दरोडेखोरी वाढली आहे.
त्यामुळे जन्माला येताना सुद्धा मुले एकटी यायला घाबरतात. कोणाला तरी बरोबर घेऊन येतात.

संत्र्याच्या वाळलेल्या सालींची पूड करून ती कपभर कोमट पाण्यात मिसळून पेस्ट करावी. हे मिश्रण मुंग्यांच्या वसतिस्थानाच्या ठिकाणी ओतल्यास त्यांचा पूर्णपणे नायनाट होतो.

पाणी, पैसा आणि वैभवाचे प्रतीक असलेल्या कारंजामुळे घरात आनंद, पैसा, समृद्धी इत्यादी प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार पाणी प्रभुत्व तत्त्व आहे.

साहीत्य – 1/4 कप रवा, 1 कप साखर, 3/4 कप ओला नारळ किंवा डेसिकेटेड कोकनट, 2 टे स्पून तूप, 1 टे स्पून फ्रेश क्रीम, 1/2 कप दूध, 1/2 टी स्पून वेलची पावडर, थोडे ड्रायफ्रूट.
कृती – कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा चांगला गुलाबी रंगावर मंद विस्तवावर खमंग भाजून घ्या. मग त्यामध्ये ओला नारळ घालून 5 मिनिटे भाजून घ्या. रवा छान खमंग भाजून झाला की त्यामध्ये साखर घालून दोन मिनिटे गरम करून फ्रेश क्रीम व थोडे दूध घालून मिक्स करून घ्या. मग राहिलेले दूध घालून मिक्स करून साखर विरघळेपर्यंत गरम करून घ्या. साखर विरघळली की त्यामध्ये वेलची पावडर व ड्रायफ्रूट घालून मिक्स करून घ्या. विस्तव बंद करून मिश्रण कोमट झाले की त्याचे लाडू वळून घ्या.