
वडील (मुलाला) – तू मघापासून कोंबडा का झाला आहेस?
मुलगा – बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात नाकी जे काम शाळेत करशील
तेच घरातही अर्धा तास करत जा म्हणून!

वडील (मुलाला) – तू मघापासून कोंबडा का झाला आहेस?
मुलगा – बाबा, तुम्हीच तर म्हणाला होतात नाकी जे काम शाळेत करशील
तेच घरातही अर्धा तास करत जा म्हणून!

इतिहासात पहिला मुघल बादशहा, बाबर याच्या जीवनातील एका घटनेचा उल्लेख मिळतो, एकदा त्याचा मुलगा हुमायुं आजारी पडला, त्याची वाचण्याची कोणतीही आशा नव्हती. बादशहाने करूणेने परमेश्वराची मुक प्रार्थना केली की, आपल्या पुत्राचा आजार स्वतःला लागु दे. हे काहीसे विचित्र वाटेल, परंतु त्याच क्षणी प्रार्थनेचा प्रभाव सुरू झाला. शहजादा हळु हळु बरा होवु लागला, तर सम्राटाचा त्याच आजाराने मृत्यु झाला. दुसर्यांचे दुःख झेलण्याचे अनेक घटनांमधील हे एक उदाहरण आहे. गुरू एक राजा आहे, जो दया व करुणेचा सागर आहे. त्यांच्या अनंत साम्राज्यात कर्माचा कोणताच हिशोब नसतो. प्रभुशी एकमेक असल्याने ते प्रत्येकाला त्यांच्या अंतरी प्रवाहित जीवन धारेशी जोडतात. जे संकटसमयी लंगर व आधाराचे काम करतात. आपली होडी जीवनाच्या वादळी लाटांमध्ये फसुन डामाडोल होवू शकते, परंतु तरंगत्या बोईशी बांधल्यामुळे वादळी वारे व मोठ्या लाटांना बळी पडूनही टिकून राहते.
(कृपाल आश्रम, अहमदनगर)

एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता. तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला अनेक रोगांनी विळखा घातला. तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टरांकडे जाण्यासाठी वेळच मिळत नसे. शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले. एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूममध्ये जावून झोपून गेला. जेव्हा त्याच्या नोकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले.
अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्हायला लागल्या. त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली. ती आकृती म्हणाली, ‘‘मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे.’’ तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, ‘‘तू माझ्या शरीराला का सोडत आहे? माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.’’ आत्मा म्हणाली, ‘‘माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही. माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसीत झाले आहे. तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही. एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली.’’
तात्पर्य – शरीर व चांगले स्वास्थ्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे.

जगण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते. अन्नाखेरीज माणूस जास्तीत जास्त 7 आठवडे जिवंत राहू शकतो. आपल्या अन्नात कर्बोदके, प्रथिने, स्निग्धपदार्थ, क्षार, जीवनसत्त्वे आणि पाणी हे सहा घटक असतात. आपण खातो त्या स्वरूपात शरीर अन्नाचा उपयोग करू शकत नाही. शरीराच्या पोषणासाठी या पदार्थांचे बारीक, रक्तात शोषले जातील अशा घटकात रूपांतर व्हावे लागते. पचनामुळे हीच प्रक्रिया होते. निरनिराळ्या विकारांमुळे ही प्रक्रिया घडून येते. या घटकांमधील हा बदल म्हणजेच अन्नाचे पचन होणे. आपण अन्नाचा घास तोंडात ठेवल्यानंतर दाताने त्याचे बारीक तुकडे करतो. हे होत असतानाच त्यात लाळ मिसळली जाते. लाळेतील विकरामुळे कर्बोदकांचे काही प्रमाणात पचन होते. एक घास खूप वेळा चावून चावून खावा असे म्हणतात, ते यासाठीच. नंतर हे अन्न अन्ननलिकेतून जठरात येऊन पोचते.
जठरात अन्न दीड ते दोन तास राहते. तसेच स्नायूंच्या आकुंचन प्रसरणाने अन्न घुसळले जाते. येथे हायड्रोक्लोरिक आम्ल व गॅस्ट्रीन आदी जठरात स्रवणार्या द्रव्यांमुळे पचनाची क्रिया होते. नंतर अन्न लहान आतड्यात येते. येथे अन्नात पित्तरस आणि स्वादुरस मिसळला जातो, तसेच आतड्यातून आणखी एक रस (आंत्ररस) पाझरतो. या रसांमुळे अन्नातील सगळे अन्नघटक नीट पचवले जातात व मग हळूहळू आतड्याच्या आवरणातून रक्तात शोषले जातात. अन्नाचे पचन व शोषण लहान आतड्यात होते. बरीचशी औषधेही लहान आतड्यातच शोषली जातात. त्यामुळे लहान आतड्याचा रोग झाल्यास, अन्नपचन न झाल्याने कुपोषण होण्याची शक्यता असते. लहान आतड्यातून अन्न मोठ्या आतड्यात येते. यात बहुतांश चोथा व पाणीच असते. मोठ्या आतड्यात पाण्याचे शोषण होते व चोथा जमा होवून संडासवाटे बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे पचनाच्या क्रियेतून कर्बोदकांचे ग्लुकोजमध्ये, प्रथिनांचे अमीनो आम्लामध्ये, तर स्निग्ध पदार्थांचे मेदाम्लात रूपांतर होते व त्यांचा वापर शरीराची वाढ व विकास यासाठी केला जातो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून, पचन चांगले असेल तर आरोग्य चांगले राहते. यासाठी भूक लागल्यावरच जेवावे. दुपारी जेवल्यानंतर झोपू नये. जेवताना दोन घास कमीच खावे. रात्री जास्त जेवू नये. दुपारी 12 ते 1 व रात्री 7 ते 8 या जेवणाच्या योग्य वेळा होत. रात्री जागरण टाळावे आणि बद्धकोष्ठ होऊ देऊ नये. सूर्योदयापूर्वी मलविसर्जन व्हावे. असे केल्याने आपण नक्कीच निरोगी राहू शकू.

आपण आनंदी राहण्याचा, सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रत्येक वेळी यश मिळतंच असं नाही. अर्थात काही मागार्र्ंनी आपण मानसिक आरोग्य संतुलित राखण्यात यश मिळवू शकतो. मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्यक्त होणं. मनातल्या भावभावना व्यक्त करा. आसपासच्या माणसांशी मनमोकळेपणाने बोला. यामुळे तुमचा ताण, अस्वस्थता कमी होईल. दररोज एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोला. अनोळखी व्यक्तीशी बोलताना आपल्यावर अपेक्षांचं ओझं नसतं. कोणताही ताण नसतो. यामुळे ताण कमी व्हायला मदत होते. वाचनाची सवय ला- वून घ्या. स्वत:चं कौतुक करा. मदत करणार्यांचे आभार माना. आळशीपणा सोडा, आवडीच्या गोष्टी करा. मानसिकदृष्ट्या कार्यरत रहा.

आयुर्वेदात कोमट पाणी पिण्याचे अनेक लाभ सांगितले आहेत. थंडीत कोमट पाणी पिणं तर अधिक लाभदायी ठरतं. कोमट पाण्यामुळे अतिरिक्त चरबी जळण्यास मदत होते. यामुळे पोटाची चरबी झटपट कमी होते. सकाळी उठल्यावर ग्लासभर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातली घाणं बाहेर पडते. पोट साफ होतं. किडनीविकारांचा धोका टळतो. कोमट पाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होत असल्याने सर्दी-खोकला लवकर बरा होतो. कोमट पाण्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. यामुळे स्नायूंमधील वेदना आणि काठिण्य दूर होतं. तसंच सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायल्यास ऍसिडीटी होत नाही. हे पाणी रात्रभर पोटात तयार झालेल्या ऍसिड्सना शमवण्याचं काम करते. तुम्ही गरम पाण्यात लिंबू पिळून आणि मध घालूनही पिऊ शकता. त्याने चवही येते आणि गरम पाणी पिण्याचा हेतूही साध्य होतो.

रक्तदाब मोजताना वरच्या मापनात सातत्याने तीव्र स्वरूपाचे चढउतार होणं हे उच्च रक्तदाबाइतकंच घातक असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. यामुळे स्ट्रोक, हृदयविकार तसंच अकाली मृत्यूचा धोका वाढत असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. ‘अमेरिकन हार्ट असोसिएशन’च्या अहवालानुसार रक्तदाबाचं वरचं मापन सर्वसाधारणपणे 120 असायला हवं. हे मापन 140 च्या पुढे जाणं उच्च रक्तदाबाचं द्योतक समजलं जातं. तपासणीत वरच्या मापनात सातत्याने 30 ते 40 ने चढउतार होत असणार्या रूग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. रक्तदाबावरून व्यक्तीच्या हृदयाच्या आरोग्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे डॉक्टर सतत रक्तदाब तपासण्याचा सल्ला देतात. रक्तदाबातला चढउतार घातक ठरू शकतो.

‘क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिजिस’ म्हणजे ‘दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुस विकार.’ जगात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा हा अत्यंत घातक असा विकार मानला जातो. धूम्रपान करणार्यांना या विकाराचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे वेळीच धोका ओळखून उपचाराला सुरूवात करायला हवी. श्वास घ्यायला त्रास होणं, दम लागणं, सतत खोकला येणं ही सीओपीडीची प्राथमिक लक्षणं आहेत. रोगनिदान : सीओपीडीचं योग्य निदान होण्यासाठी रुग्णांनी डॉक्टरांना स्वत:बाबतची आणि जीवनशैलीविषयीची सगळी माहिती द्यायला हवी. फुफ्फुसाची क्षमता तपासण्यासाठी ‘स्पायरोमेट्री’ ही तपासणी केली जाते. यावेळी रुग्णाला दीर्घ श्वास घेण्यास सांगितलं जातं. स्पायरोम ीटरला जोडलेल्या एका नळीत श्वास सोडायचा असतो. रुग्णाला छातीची क्ष- किरण चाचणी किंवा सीटी स्कॅन करण्यास सांगितलं जातं. रक्तातल्या ऑक्सिजनची तपासणी करण्यासाठीही चाचणी केली जाते. औषधोपचार : रोगाच्या तीव्रतेनुसार ‘ब्रॉंकोडायलेटर्स’, ‘ऑक्सिजन थेरपी’ तसंच शस्त्रक्रियेसारख्या उपचारांची निवड केली जाते. ब्रॉंकोडायलेटर्स इनहेलर किंवा स्प्रेच्या माध्यमातून दिले जातात. श्वसनमार्गाचा दाह कमी करण्यासाठी ‘ग्लोकोकॉर्टिकोस्टेरोइड्स’चा वापर केला जातो.

दाताचं दुखणं सुरू झालं की दंतवैद्याकडे जाणं अपरिहार्य होऊन बसतं. पण दंतोपचार करून घ्यायचं म्हटलं की अनेकांच्या छातीत धडकी भरते. असा डेंटल फोबिया असणारी व्यक्ती दंतवैद्याकडे जाणं टाळण्यासाठी काहीही करू शकते. या व्यक्तींना इतर लोकांच्या तुलनेत दातांशी संबधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. वेळेआधी दात पडणं, मुख दुर्गंधी अशा विकारांनी डेंटल फोबियाचे रुग्ण नेहमीच त्रस्त असतात. यामागील कारणांचा विचार केल्यास एखाद्याच्या दंतचिकित्सेच्या अनुभवाचा पगडा बसून निर्माण झालेली भीती हेही कारण असू शकतं. डेंटल एंझायटीमध्ये लोक दंतवैद्याकडे जातात, पण चेअरवर बसताच त्यांना कमालीचं अस्वस्थ वाटायला लागतं. वेटिंगरूममध्येच अस्वस्थता अनुभवू लागतात. डेंटिस्टची वेळ घेतल्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. दंत चिकित्सेदरम्यान छातीत दुखणंं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं दिसून येतात. समुपदेशनाद्वारे या रुग्णांवर उपचार करणं शक्य आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामधील संवाद वाढवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. रुग्णाने दंतवैद्याकडून उपचार प्रक्रियेची माहिती घ्यावी. त्यासोबतच मनातल्या भीती किंवा शंकांचं निराकरण करून घ्यावं. डेंटल फोबिया किंवा एंझायटीच्या रुग्णांनी उपचार सुरू असताना संगीत ऐकण्याकडे किंवा इतर आवडत्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केल्यास फायदा होतो.
दारू किंवा अल्कोहोलवरचं अवलंबित्त्व भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकतं. वैद्यकीय भाषेत याला ‘अल्कोहोलिझम’ किंवा ‘अल्कोहोल युझ डिसऑर्डर’ असं म्हटलं जातं. अल्कोहोलिझमची कारणं, दुष्परिणाम आणि त्यावरच्या उपचारांबाबत माहिती करून घेऊ या…

अल्कोहोलिझम म्हणजे काय? हा विकार जडलेल्या व्यक्तीला सतत अल्कोहोलची गरज भासते. दारू सोडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. व्यक्तीच्या कामावर, वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्यावर याचा विपरीत परिणाम होऊ लागतो. इतर शारीरिक व्याधीही जडू लागतात.
कारणं – दारूचं व्यसन जडण्याची अनेक कारणं असतात. अनुवांशिक, सामाजिक, मानसिक कारणांसोबत आसपासचं वातावरणही याला कारणीभूत ठरू शकतं. अल्कोहोलिझमच्या आधुनिक व्याख्येत याचा संबंध मेंदूशी जोडण्यात आला आहे. मेंदूच्या रचनेत किंवा कार्यात झालेला बदलही याला कारणीभूत ठरू शकतो. काळानुरूप दारूचं व्यसन वाढत जातं. यामुळे मेंदूच्या कार्यात बदल होऊ शकतात.
लक्षणं – अल्कोहोलिझम सौम्य, मध्यम किंवा तीव्र स्वरूपाचं असू शकतं. अल्कोहोल सेवनावर नियंत्रण ठेवता न येणं, प्रयत्न करूनही दारूचं प्रमाण कमी न होणं, दारू सोडण्याचे किंवा कमी करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरणं, दारूचे सामाजिक आणि शारीरिक दुष्परिणाम माहीत असूनही पित राहणं, दारू पिण्यात बराच वेळ घालवणं, कामाच्या आणि कौटुंबिक जबाबदार्या पूर्ण करण्यात अडचणी येणं, सामाजिक जी- वनातला सहभाग कमी होणं, दारूच्या नशेत वाहन चालवणंं, दारू सोडण्याचा प्रयत्न केल्यावर मळमळ, उलट्या, चक्कर, घाम अशी लक्षणं जाणवतात.
शारीरिक व्याधी – यकृतात चरबी साठणं, यकृताचा दाह, यकृताच्या टिश्यूंचं न भरून येण्यासारखं नुकसान, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक, पचनसंस्थेशी संबंधित विकार, स्वादुपिंडाचा दाह, रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होणं, गर्भपात, गर्भातल्या बाळाची योग्य वाढ न होणं, गर्भामध्ये शारीरिक व्याधी निर्माण होणं, तोंड, घसा, यकृत, मोठं आतडं, स्तन यांच्या कॅन्सरची शक्यता अनेक पटींनी वाढणं हे दारूच्या अतिसेवनामुळे होऊ शकतात.
उपाय – समुपदेशन आणि कौटुंबिक पाठिंबा यामुळे रुग्ण दारूच्या व्यसनातून लवकर मुक्त होऊ शकतो. वैद्यकीय म दतीने दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, अल्कोहोलची गरज कमी करणारी औषधं घेणं, शरीराची अस्वस्थता कमी करणारी औषधं घेणं, दारूच्या आहारी जाण्यास कारणीभूत ठरणार्या इतर मानसिक आजारांवर उपचार घेणं, ताणतणाव कमी करणं, चांगले छंद जोपासणं यामुळे दारूचं व्यसन सुटू शकतं