वेळीच ओळखा लक्षणे…

0
52

योग्य वेळी लक्षणे ओळखली गेली तर कॅन्सर बरा केला जाऊ शकतो; पण आपल्याला कॅन्सरची लागण झाली आहे हे लक्षात यायलाच बराच वेळ जातो. त्यामुळेच कॅन्सरच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कॅन्सरची लागण झाला आहे किंवा कॅन्सर पहिल्या स्टेजला आहे हे न समजल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कॅन्सर शरीराच्या कोणत्याही भागाला जडू शकतो आणि वाढत्या वयाबरोबर त्याचा धोका वाढत जातो. खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी, सिगारेट, तंबाखू आणि अल्कोहोल यासारख्या काही सवयी कॅन्सरचा धोका वाढवतात. शरीराच्या कोणत्याही भागात कॅन्सर होऊ शकतो. त्यापैकी यकृताचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, जनरल कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर हे सर्वाधिक आढळतात. बहुतेक लोक या कॅन्सरच्या आजारांनी ग्रस्त आहेत. काही कॅन्सर त्वचेला होतात तर काही स्नायूंमध्ये होतात. कॅन्सर हा कमी आणि जास्त तीव्रतेनुसार विभागला आहे. लो ग्रेड कॅन्सर शरीरात हळूहळू पसरतो तर हाय ग्रेड कॅन्सर वेगाने पसरतो. हाय ग्रेड कॅन्सरमध्ये मृत्यूचा धोका जास्त असतो. वयाच्या 50 वर्षांनंतर कर्करोगाचा धोका वाढतो. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो.