शेतकर्‍याची आळशी मुले

0
55

एका गावात एक शेतकरी राहत होता. दिवसभर शेतात राबून तो आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित असे. त्याला चार मुले होती. आता ती मोठी झाली होती. पण त्यांना काम करण्याचा, शेतात राबण्याचा फारच कंटाळा. आयते खाऊन टिवल्या-बावल्या करण्यातच त्यांचा वेळ जात असे. आता तो शेतकरी फारच म्हातारा झाला होता. कधी मरण येईल, याचा भरवसा नव्हता. आपल्यानंतर आपल्या मुलांचे कसे होणार, याची त्याला चिंता लागली होती. म्हणून एके दिवशी त्याने आपल्या चारही मुलांना जवळ बोलावून सांगितले, ‘‘मुलांनो, माझा आता काही भरोसा नही. मी सर्व जमीन, त्यातील बागा तुमच्या स्वाधीन करतो आहे. याच जमिनीत कुठे तरी मी पैसा पुरून ठेवला आहे. आता नेमका कुठे, ते मला आठवत नाही. तुम्ही सर्व जमीन खोदून काढा. कुठे तरी तो तुम्हाला सापडेल.’’ हे ऐकून मुलांना फारच आनंद झाला. आयते घबाड हाती पडेल, असे त्यांना वाटले. उद्याच्या उद्या शेतं खांदायला सुरुवात करू, असे म्हणून ते झोपी गेले. सकाळी बघतात, तो म्हातारा मरण पावलेला. मग त्याचे सर्व क्रियाकर्म केल्यावर सर्व आले. जमिनीची चांगली मशागत केली, तर पीक चांगले येऊन पैसाही हाती येतो, हे त्यांना कळून चुकले. वडिलांच्या सांगण्याचा हाच अर्थ, हे त्यांना मनोमन पटले.

तात्पर्य – धन-पैसा कशाही स्वरूपात मिळतो. प्रत्यक्ष पैसाच मिळाला पाहिजे, असे नव्हे.