हिंदी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत अहिल्यानगरच्या ‘अम्मो’ने मारली बाजी

१९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अहिल्यानगरचे नाटक अंतिम फेरीत द्वितीय

नगर – ६३ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत होप फाऊंडेशन, अहिल्यानगर या संस्थेच्या ’अम्मो’ या नाटकासाठी द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी
बुधवारी केली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेत सादर झालेल्या, अरविंद
लिमये यांच्या ’महापात्रा’ या मराठी नाटकाचे हिंदी भाषांतर श्रीनिवास नार्वेकर यांनी केले असून या नाटकाचे दिग्दर्शन शैलेश देशमुख यांनी केले होते. या नाटकासाठी सांघिक द्वितीय क्रमांक तसेच शैलेश देशमुख यांना दिग्दर्शन द्वितीय, वैशाली
गोस्वामी यांना ’अम्मो’ या मध्यवर्ती भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक तसेच शर्वरी अवचट यांना ’दाई’ या पात्रासाठी अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाले आहे. या नाटकात वैशाली गोस्वामी, श्लोक देशमुख,
पल्लवी दिवटे, देवीप्रसाद सोहनी, महीर कुलकर्णी,
शर्वरी अवचट, अजय लाटे, पूजा जगदाळे, मनुजा
देशमुख, अविष्कार ठाकूर, पुरुषोत्तम उपाध्ये, सागर अलचेट्टी यांच्यासह मंगेश जोशी,
हर्षदा वाघमारे, किरण गायकवाड यांनी भूमिका साकारल्या. गणेश लिमकर यांनी
प्रकाश योजना, नाना मोरे यांनी नेपथ्य, सोहम सैंदाणे यांनी रंगभूषा व वेषभूषा, शैलेश
देशमुख यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली असून मोनीश ढाळे, प्रसाद भणगे व
शीतल देशमुख यांनी निर्मिती सूत्र सांभाळले.
२६ जानेवारी ते ९ मार्च या कालावधीत पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरु
सांस्कृतिक भवन, नागपूर येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृह आणि मुंबई येथील
साहित्य संघ मंदिर, गिरगाव, या तीन ठिकाणी संपन्न झालेल्या या स्पर्धेत एकूण ५८
नाट्य संघांनी सहभाग नोंदवत सादरीकरण केले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मदन
मिमरोट, मिलिंद दांडेकर आणि श्रीमती मेधा गोखले यांनी काम पाहिले. सांस्कृतिक
कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,
सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी
विजेत्या नाट्य संघाचे आणि इतर पारितोषिक प्राप्त
कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही
या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी
करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. निकाल जाहीर
होताच नाट्य संघासह अहिल्यानगर मधील अनेक
नाट्यकर्मींनी माऊली सभागृह येथे एकत्र येत
फटायांच्या अतिशबाजीसह जल्लोष करत आनंद
साजरा केला. विजेत्या संघांचे सतीश लोटके, क्षितिज झावरे, संजय दळवी, अनंत
जोशी, प्रसाद भणगे, नितीन जावळे, सदानंद भणगे, प्रसाद बेडेकर, अविनाश कराळे,
चंद्रकांत सैंदाणे, श्रेणिक शिंगवी, संदीप दंडवते आदींनी अभिनंदन केले.
हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत याअगोदर सन १९९१ साली डॉ. सोमनाथ मुटकुळे यांचे
’दीक्षा’ हे नाटक प्रथम तर १९९२ साली डॉ. मुटकुळेंचेच ’कैफियत’ हे नाटक द्वितीय
आले होते. त्यानंतर १२ वर्षांनी म्हणजे २००४ साली सप्तरंग थिएटर्सचे ’तर्पण’ हे
नाटक तृतीय तर २००५ साली सप्तरंग थिएटर्सचेच ’मृत्युछाया’ हे नाटक प्रथम आले
होते. आणि त्यानंतर आज १९ वर्षांनी शैलेश देशमुख यांच्या ’अम्मो’ या नाटकाने
विजयाची पुनरावृत्ती केली.

डॉ. मगर अत्याधुनिक एस्थेटिक विभागास शुभेच्छा

नगर – सावेडीतील रेणावीकर शाळेसमोरील डॉ. मगर डेन्टल लिनिक अ‍ॅन्ड इम्प्लांट सेंटरमध्ये नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक एस्थेटिक विभागाच्या लोकार्पण शुभारंभास शहरातील विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. स्वरुपकुमार मगर, डॉ. सौ. रुपाली मगर व डॉ. सृजन मगर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत
केले. केतन बल्लाळ, मंगेश जाधव, राजेंद्र डौले, अशोक बँकेचे व्यवस्थापक प्रदीप थोरात आदींनी कार्यवाहकाची
जबाबदारी स्विकारून हा कार्यक्रम यशस्वी केला. अत्याधुनिक एस्थेटिक विभाग येथे सुरू करण्यात
आल्याने आता येथील रुग्णांना पुणे-मुंबई वगैरे मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
अत्याधुनिक विभाग डॉ. सृजन मगर हे नव्या पिढीचे डॉटर सांभाळणार असून त्यांनी एफसीएफए (फेलोशिप
इन लिनिकल अ‍ॅण्ड फेशियल एस्थेटिक) ही पदवी चेन्नई येथील सविता डेन्टल कॉलेज येथून घेतली असून
नगर जिल्ह्यातील ते एकमेव कॉस्मेटिक डेन्टल सर्जन झाले आहेत, असे सांगितले.
नगरच्या बदलत्या गरजांनुसार डॉ. मगर डेन्टल लिनिक अ‍ॅण्ड इम्प्लांट सेंटर येथे सुविधा पुरविण्यात येणार असून एस्थेटिक या नवीन विभागामध्ये सिरॅमिक लॅमिनेटेड आणि व्हेनिअर, स्माईल-डिझाईन, स्माईल-करेशन, एस्थेटिक कॉम्पोझिट, ब्लिचिंग (टूथ व्हाईटनिंग) यांसारख्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. आपले व्यक्तिमत्व सुंदर दिसण्यासाठी या अत्याधुनिक विभागामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे दाताची ठेवण, आपले हसणे, जबड्याचा आकार,
चेहर्‍याची ठेवण व्यवस्थित करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती डॉ. सृजन मगर यांनी यावेळी दिली.
८ मार्च रोजी महिला दिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या एस्थेटिक विभागाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी येणार्या महिलांना ३१ मार्चपर्यंत विशेष सवलत देण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. स्वरुपकुमार व डॉ. सौ. रुपाली मगर यांनी केले आहे.

काँग्रेसचे संजय मोरे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

नगर – काँग्रेसचे विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे संजय मोरे पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संग्राम जगताप आणि नगरसेवक संपत बारस्कर यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
२५ वर्ष काँग्रेस काँग्रेसमध्ये काम करताना जनतेच्या प्रश्नांसाठी अनेक वेळा आंदोलन केली, मोर्चे काढले. पक्षानेही विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी पक्षाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो असे यावेळी संजय मोरे म्हणाले. परंतु कार्यकर्ते आणि जनतेच्या भावनांची कदर आणि काळाची गरज ओळखून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतआहे.
एमआयडीसी येथील उद्योजक अजय सोनवणी, सावन शिंदे, राजेश भरेकर, महेश सुरसे, ओमकार खिलारी, संजय झोडगे, सुनील महाजन, आदिनाथ डोंगरे यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

आनंदऋषीजी हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान

नगर – आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या शिकवणीनुसार जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिवसय्रात्र रुग्णसेवेचे व्रत जोपासत आहेत. माजी मंत्री स्व. अनिल राठोड आणि आनंदऋषीजी हॉस्पिटल
हे एक अतुट नात होत. मी सुद्धा विद्यार्थी दशेत असल्यापासून या हॉस्पिटलच्या कार्याची महती ऐकत आलो आहे, आज प्रत्यक्ष शिबीराच्या उद्घाटननिमित्त हे रुग्णसेवेचे कार्य  जवळून पाहण्याचा योग आला आहे. आधुनिक मशिनरी व आत्मियतेने रुग्णांची काळजी हे हॉस्पिटल घेत असल्याने पुणे-मुंबईला जाण्याची संकल्पना कालबाह्य झाली आहे. सर्वसुविधा
एकाच छताखाली मिळत असल्याने येथे आलेला रुग्ण पुर्णपणे बरा होऊनच जात आहे. मोफत व अल्पदरातील
सेवामुळे रुग्णांवर उपचार होत असल्याने त्यांचा आर्थिक भार कमी होत आहे. त्याचप्रमाणे शासकिय योजना,
मेडिलेम सुविधामुळे रुग्णांची मोठी सोय होत आहे. तज्ञ डॉटर आणि आधुनिक मशिनरी आणि दानशूरांचे
सहकार्य यामुळे हे हॉस्पिटल ‘रुग्णांसाठी वरदान’ ठरत असल्याचे प्रतिपादन शिवसेना युवा सेनेचे सहसचिव
विक्रम राठोड यांनी केले. जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आचार्य श्री
आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे मेंदूविकार व मेंदू शस्त्रक्रिया  शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विक्रम राठोड व श्रीमती शशिकला अनिल राठोड यांच्या
हस्ते झाले. यावेळी सौ.तेजस्वीनी राठोड, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, बाबूशेठ लोढा, माणकचंद लोढा, सुभाष मुनोत, अनिल मेहेर, डॉ.अशिष भंडारी, तज्ञ डॉ.गौतम काळे, डॉ.अद्वैत गिते, डॉ. विशाल भस्मे आदी उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती शशिकला राठोड म्हणाल्या, आपल्या साधू-संतांनी जनसेवेचा दिलेला संदेश रुग्णसेवा
हीच ईश्वर सेवा मानून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य निरंतरपणे सुरु आहे. या आरोग्य सेवेत जैन सोशल
फेडरेशनचे कार्यकर्ते, डॉटर, स्टाफ देत असलेले योगदान हे कौतुकास्पद असेच आहे. स्वागत डॉ.आशिष
भंडारी यांनी केले. शिबीरात ८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन ही काळाची गरज

नगर – शाळेतील ३५ मिनिटांच्या तासिकेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय देणे केवळ अशय असते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच व्यक्तिगत मार्गदर्शनाची गरज असते. त्या विद्यार्थ्यांसाठी पास अकॅडमीचा उत्कृष्ट पर्याय अहिल्यानगर मध्ये उपलब्ध आहे, असे प्रतिपादन विवेकानंद हायस्कूलच्या प्राचार्य गीता तांबे यांनी केले आहे. महिला दिनाचे औचित्य साधून पास अकॅडमीमध्ये काम करणार्‍या सर्व होम ट्युटर्सचा सत्कार करून त्यांना पुरस्कृत
करण्यासाठी अकॅडमीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्राचार्या गीता तांबे
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
सध्या शैक्षणिक संस्था मध्ये झालेली गर्दी आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये
सांगितलेल्या अभ्यासक्रमानुसार one to one शिक्षण ही काळाची गरज झाली आहे.
त्यामुळे या अकॅडमी चा पुढील प्रवास अतिशय चांगलाच होणार आहे, अशा शुभेच्छा
त्यांनी यावेळी दिल्या. मागील दोन वर्षापासून अहिल्यानगर मध्ये पहिल्यांदाच प्रा. डॉ.
सौ. आश्लेषा भंडारकर यांनी होम ट्यूटर अकॅडमी ची स्थापना केली आहे. शिक्षणाची
मूलभूत गरज पूर्ण करण्याकरता निर्माण झालेल्या शाळा आणि महाविद्यालय प्रत्येक
विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आवडीनुसार व क्षमतेनुसार शिक्षण देणे हे बर्‍याच वेळा अतिशय
आव्हानात्मक ठरते. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन करताना ते प्रत्येक
विद्यार्थ्याला समजेलच असे नाही ही वास्तविक परिस्थिती आहे. अशावेळी पालक
शिकवणी वर्गाकडे धाव घेतात, शिकवणी वर्गामध्ये देखील शाळेप्रमाणेच गर्दी झाल्याने
विद्यार्थी वैयक्तिक मार्गदर्शनापासून लांबच राहतो. अशा परिस्थितीत हतबल झालेल्या
पालकांना व शिक्षणासाठी उत्सुक विद्यार्थ्यांना आशेचा किरण म्हणून पास अकॅडमीची
स्थापना केली आहे, अशी माहिती अकॅडमीच्या संचालिका डॉटर आश्लेषा भांडारकर
यांनी याप्रसंगी दिली. ट्युटर्स विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन मुलांच्या आकलन शक्ती
प्रमाणे त्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे
विद्यार्थ्यांमध्ये मोकळेपणाचे वातावरण
निर्माण होऊन त्यांच्या शैक्षणिक
विकासाचा आलेख उंचावला आहे.
मागील दोन वर्षात ही बाब निदर्शनास
आली आहे, असेही त्या म्हणाल्या.
तसेच वेळप्रसंगी संचालिका डॉ.आश्लेषा
मॅडम मुलांना व पालकांना समुपदेशनही
करतात. त्यामुळे पालकांनाही त्यातून
दिलासा मिळत आहे अशी माहिती
पालक म्हणून सौ. जुही काळे म्हणाल्या.
पास अकॅडमी चा हा व्याप सांभाळताना
संचालिका आश्लेषा मॅडम यांना त्यांचे पती अविनाश भांडारकर यांचे सहकार्य असते.
पास होम ट्यूशन अकॅडमीचा हळूहळू विस्तार होत आहे. पारंपारिक शिकवणी वर्गा
ऐवजी वयक्तिक होम ट्यूशन कडे पालक वळताना दिसून येत आहेत. अकॅडमीच्या या
यशाचे श्रेय होमट्युटरकडे जाते असेही सौ. भांडारकर म्हणाल्या.
होमट्युटर्सच्या कामाची पावती म्हणूनच महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचा
कौतुक सोहळा अकॅडमीमध्ये आयोजित केला होता.
याप्रसंगी ट्यूटर प्रियंका येवले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, लहान
मुलांपासून ते मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिकवण्याचा अनुभव आम्हाला मिळाला शिक्षक
म्हणून आपले काय स्थान आहे याची जाणीव होऊन आम्ही पण खूप काही शिकलो,
त्याबद्दल अकॅडमीच्या संचालकांचे त्यांनी आभार मानले. शिक्षणाबरोबरच समुपदेशनामुळे
मुलांचे मनोबल वाढण्यास खूपच मदत झाली हा खूप मोठा फायदा या अकॅडमीमुळे
आम्हाला मिळाला, असे पालक म्हणून सौ.जाधव बोलत होत्या.
कार्यक्रमात होमट्युटर् महिमा शिंदे, स्नेहल देवचक्के, पुजा टिमकर, निलिमा
निचित, संजय निचित, व्ही.व्हि.वाघमारे, झोहा बहलोली, वैष्णवी पाल, साक्षी गहलोत
इ. चा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन कुमारी
महिमा शिंदे यांनी केले. साक्षी गहलोत यांनी आभार मानले.

खेळामुळे शिस्त लागून एकाग्रता वाढते

नगर – प्रत्येकाने किमान एक तास मैदानी खेळ खेळावा. खेळामुळे सकारात्मक हार्मोन्स तयार होऊन तुम्ही आनंदी राहता. खेळाच्या माध्यमातून शिस्त लागते, एकाग्रता वाढते. अपयश पचविण्याची ताकद निर्माण होते असे प्रतिपादन बालरोग तज्ञ डॉटर श्याम तारडे यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या बाई इचरजबाई बाई फिरोदिया प्रशालेच्या वार्षिक
खेळ मेळावा संस्थेच्या रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर पार पडला. शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात सहभागी होऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवले. विद्यार्थ्यांचे ध्वजसंचलन, तसेच त्यांनी
सादर केलेली कवायत लक्षवेधी ठरली. डॉ. तारडे म्हणाले की, या पुढील काळात जागतिक पातळीवरती स्थूलता ही गंभीर समस्या निर्माण होण्याची शयता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासानुसार सुमारे २.७ कोटी
स्थूल बालके राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थूलतेमुळे रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, नैराश्य यासारखे अनेक दीर्घ आजार सुरू होतात असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सिसोदिया यांनी केले. पाहुण्यांचा परिचय वैभव वाघ यांनी करून दिला. कार्यक्रमाची माहिती विशाल तांदळे यांनी दिली. सूत्रसंचालन शकुंतला देसरडा व कांचन नेहुल
यांनी केले. सविता शेळके यांनी आभार मानले. पालक हे मुलांचे आदर्श आहेत. पालकांनीही खेळासाठी वेळ द्यावा. दोन वर्षापर्यंतच्या मुलांना मोबाईल नकोच. मुलांनी एक तासापेक्षा जास्त वेळ टीव्ही मोबाईल यासारख्या साधनांचा वापर करू
नये असेही डॉ. तारडे यांनी सांगितले.

ब्राह्मण समाजात मध्यस्थ ही व्यवस्था लोप पावली आहे.

आदिनाथ जोशी यांचे प्रतिपादन; श्री शुल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या सर्व शाखीय वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद

नगर – मुला-मुलींचे विवाह योग्य वयात करणे ही सध्या फार मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. मुला मुलींच्या आपल्या जोडीदारासाठीच्या अवास्तव अपेक्षा, नोकरी करणार्‍या मुलींच्या अपेक्षा, मुलांचे वाढते वय, या बरोबरच सामाजिक
परंपरा आणि समाजातील पोटजातींना दिले जाणारे अकारण महत्व. या सर्व परिस्थितीचा विचार करता ब्राह्मण समाजात
लग्न जमवणे हे अतिशय कठीण होत चालले आहे. त्यातच पूर्वी असलेली मध्यस्थ ही व्यवस्था लोप पावली आहे. या परिस्थितीचा विचार करून आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मध्यस्थाच्या भुमिकेतून संस्थेने या परिचय मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ जोशी यांनी सांगितले. अहिल्यानगर येथील श्री शुल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने चालवल्या जाणार्‍या शुभयोग वधू-वर सूचक केंद्राच्यावतीने ९ मार्च रोजी सावेडी येथील
ज्येष्ठ नागरिक मंचाचे सभागृहामध्ये ब्राह्मण समाजाच्या सर्व शाखीय ब्राह्मण वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ जोशी, उपाध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, सचिव विलास बडवे, सहसचिव मोरेश्वर मुळे, विश्वस्त
नंदकुमार निसळ, दत्तात्रय (मयूर) जोशी, किरण वैकर, व्यवस्थापिका सौ. अबोली वैकर आदींच्या हस्ते विधीवत  मंत्रोच्चारात  श्रीगणेश पूजन करून परिचय मेळाव्यास सुरुवात झाली. या मेळाव्यास प्रथम वधू-वरांबरोबर घटस्फोटित,
तसेच दिव्यांग अशा ४८ मुलांनी आणि १७ मुलींनी सहभाग नोंदविला. उपस्थित वधूय्वरांनी स्वतः आपला परिचय
करून देत आपल्या कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीची माहिती दिली तसेच आपल्या जीवनसाथी बद्दलच्या अपेक्षा
विषद केल्या. मेळाव्यास उपस्थित नसलेल्या मुला-मुलींची सविस्तर माहिती संस्थेचे वतीने श्री मोरेश्वर मुळे यांनी उपस्थितांना
दिली. सर्वांना या प्रसंगी अल्पोपाहार देण्यात आला. वधू-वरांच्या पालकांनी या मेळाव्यासंदर्भी समाधान व्यक्त केले. संस्थेने
अशाप्रकारचे संवादात्मक मेळावे सातत्याने घ्यावेत अशी मागणी बहुतेक पालकांनी संस्था विश्वस्तांकडे केली.
मेळाव्यानंतर अनेक पालकांनी एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण केली.

आयुर्वेदाच्या सहाय्याने पोलिसांचे आरोग्य रक्षण

नगर – १०० वर्ष जुना वारसा असलेले काळूराम मंगळचंद कोठारी यांचा ’वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा’ हा ब्रँड असून, आतापर्यंत लाखो लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी या ब्रँडने योगदान दिले आहे. आता वर्ल्ड ऑफ आयुर्वेद चे सर्व उत्पादने
ऑनलाईनही उपलब्ध आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेला तोंड देत नागरिकांसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या आरटीओ पोलिस
अधिकार्‍यांसाठी ’वर्ल्ड ऑफ आयुर्वेद’ तर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत पोलिसांना ’समर केअर किट’ वाटप करण्यात आले.
या किटमध्ये उन्हाळ्यातील थकवा आणि उष्णतेपासून आराम देणारी आयुर्वेदिक उत्पादने देण्यात आली आहेत. पोलिसांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती कायम राहावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्ल्ड ऑफ
आयुर्वेद, काळूराम मंगळचंद कोठारी परिवार आणि मंगलभक्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
हा उपक्रम वैद्य. कुणाल कोठारी, ऋषभ कोठारी आणि रजत कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकार्‍यांनी हा अनोखा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ’वर्ल्ड ऑफ आयुर्वेद’ ने अशाच प्रकारचे समाजोपयोगी कार्य पुढेही सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कामगारांच्या मागण्यांसाठी सहाय्यक आयुतांच्या दालनात ठिय्या आंदोलन

नगर – छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाने ठेकेदारांकडून कामगारांच्या माथाडी मंडळात प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील कामगारांना उपलब्ध करून देणे, ठेकेदारांकडून शंभर टक्के थकीत रक्कम तहसील कार्यालयाच्या वतीने आरआरसी अंतर्गत वसूल करून कामगारांच्या खात्यावर जमा करणे, कामगारांचे मंडळाकडे जमा असलेले थकीत वेतन तात्काळ अदा करणे या मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिक, कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो, कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यावेळी सह जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, कामगार नेते विलास उबाळे, डॉ. श्रीकांत चेमटे, रेवजी नांगरे, किरण बोरुडे, महावीर मुथा, उषाताई भगत, शैलाताई लांडे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, मनोज चव्हाण, विनोद दिवटे, रोहिदास भालेराव, पोपट लोंढे, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर, दिपक काकडे, देवराम शिंदे, सचिन लोंढे, आतिश शिंदे, संजय गंगावणे, विनोद शिरसाठ, दत्तात्रय कळमकर, विजय कार्ले,
संजय माळवे, योगेश कार्ले, परसराम इजगज, ज्ञानदेव कदम, भगवान शेंडे, मंगेश एरंडे, बापू शिंदे, संतोष वाघमारे, गणपत वाघमारे, बाळासाहेब अनारसे, कौतिक शिंदे, क्रुष्णा शेंडे, सतिश शेंडे, अंबादास शेंडे, मारुती बनकर, मारुती शिंदे, अंबादास कोतकर, बाळु बनसोडे, महादेव ठोंबरे, सोमेश कापुरे, लखन पांढरे, मच्छिंद्र पांढरे, निलेश सोनवणे, संतोष पोळ, संतोष सुसलादे, सुमित पळसे, अंगद महारनवर, गोरख पुलावळे, विशाल केदारे, गणेश बनसोडे आदींसह कामगार सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, कामगार त्यांच्या हक्काचं दाम मागत आहेत. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करीत आहे. कामगारांच्या हितासाठी वेळप्रसंगी शिवसेनाही संघर्ष करायला तयार आहे. प्रशासनाने दिशाभूल करणे थांबवावे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. अन्यथा भविष्यात शिवसेना स्टाईल धडा शिकवावा लागेल.
विलास उबाळे म्हणाले की, डिसेंबर महिन्यापासून आम्ही सातत्याने लेखी पाठपुरावा कामगार मंडळाकडे करत आहोत. तरी देखील मंडळ दखल घेत नव्हते. म्हणून या ठिय्या आंदोलन छेडावे लागले. प्रशासनाने आठ दिवसांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेला शब्द त्यांनी पाळावा. अन्यथा कामगार आघाडी तीव्र आंदोलन छेडले. मागण्यांवर आठ दिवसांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. प्यायला पाणी देता का ? आंदोलन सुरू असताना कामगार संतप्त झाले. उन्हा-तान्हात आम्ही ओझ
वाहतो. घशाला कोरड पडते. तहान लागली की पाणी पिण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. कामाच्या ठिकाणी साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसेल तर माणुसकी संपली आहे काय ? आम्हाला पाणी प्यायला कधी देणार आहात? असे संतप्त प्रश्न कामगारांनी विचारत अधिकार्‍यांना घेरले. लवकरच समक्ष पाहणी करत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.

जीवनात नकारात्मकता व अनिष्ट विचार टाळावे

अनुरीता झगडे यांचे प्रतिपादन; स्त्री भ्रूणहत्या, महिला अत्याचार थांबवा पथनाट्यातून अनिष्ट विचारांची होळी, सामाजिक संदेश

नगर – होळी सण ही आपली संस्कृती आहे. होळीचा सण साजरा करताना प्रत्येकाने समाजातील अनिष्ट रुढी परंपरा
व विचारांची होळी करावी. सकारात्मक विचार करावा. महिलांना योग्य तो सन्मान द्यावा. वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. रस्त्यावर कचरा टाकू नये, आपले शहर आपले गाव आपले शाळा व आपले घर स्वच्छ ठेवावे. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार समाजात रुजवावे, असे प्रतिपादन प्राचार्या प्रा.अनुरिता झगडे यांनी केले. मेहेर इंग्लिश स्कूल तर्फे होळी चा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दिल्लीगेट येथे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पथनाट्य
सादर केले. या पथनाट्याद्वारे अनिष्ट विचारांची होळी करण्यात आली. यातून सामाजिक संदेश देण्यात आले. महिलावरील
अत्याचार, बलात्कार थांबवा, हुंडा देणे घेणे बंद करा, स्त्री भ्रूणहत्या  थांबवा, स्त्री जन्माचे स्वागत करा, देश भ्रष्टाचारमुक्त करा, कचरा  रस्त्यावर टाकू नका, भुत, मंत्र, जादुटोणा या गोष्टी करु नका, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, नवस करणे बंद करा, शिक्षणाचा व्यवसाय बंद करा, अन्न वाया घालवणे, नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार ठेवा,
मोबाईल मुळे बालपणी हरवलेले खेळ, दुसर्‍याला हिणवणे, इतरांची तुलना आपल्या पाल्या सोबत करु नका, स्पर्धा करु नका अशा सर्व अनिष्ट विचारांची होळी पथनाट्यातून शिक्षिका व विद्यार्थ्यांनी केली. या कार्यक्रमासाठी हिंदसेवा मंडळाचे सर्व
पदाधिकारी व स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी यांचे मार्गदर्शन लाभले.