नगर – काँग्रेसचे विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे संजय मोरे पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संग्राम जगताप आणि नगरसेवक संपत बारस्कर यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे राष्ट्रवादी
काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
२५ वर्ष काँग्रेस काँग्रेसमध्ये काम करताना जनतेच्या प्रश्नांसाठी अनेक वेळा आंदोलन केली, मोर्चे काढले. पक्षानेही विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी पक्षाबद्दल आणि नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो असे यावेळी संजय मोरे म्हणाले. परंतु कार्यकर्ते आणि जनतेच्या भावनांची कदर आणि काळाची गरज ओळखून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतआहे.
एमआयडीसी येथील उद्योजक अजय सोनवणी, सावन शिंदे, राजेश भरेकर, महेश सुरसे, ओमकार खिलारी, संजय झोडगे, सुनील महाजन, आदिनाथ डोंगरे यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.