जीवनात नकारात्मकता व अनिष्ट विचार टाळावे

0
24

अनुरीता झगडे यांचे प्रतिपादन; स्त्री भ्रूणहत्या, महिला अत्याचार थांबवा पथनाट्यातून अनिष्ट विचारांची होळी, सामाजिक संदेश

नगर – होळी सण ही आपली संस्कृती आहे. होळीचा सण साजरा करताना प्रत्येकाने समाजातील अनिष्ट रुढी परंपरा
व विचारांची होळी करावी. सकारात्मक विचार करावा. महिलांना योग्य तो सन्मान द्यावा. वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. रस्त्यावर कचरा टाकू नये, आपले शहर आपले गाव आपले शाळा व आपले घर स्वच्छ ठेवावे. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार समाजात रुजवावे, असे प्रतिपादन प्राचार्या प्रा.अनुरिता झगडे यांनी केले. मेहेर इंग्लिश स्कूल तर्फे होळी चा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दिल्लीगेट येथे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पथनाट्य
सादर केले. या पथनाट्याद्वारे अनिष्ट विचारांची होळी करण्यात आली. यातून सामाजिक संदेश देण्यात आले. महिलावरील
अत्याचार, बलात्कार थांबवा, हुंडा देणे घेणे बंद करा, स्त्री भ्रूणहत्या  थांबवा, स्त्री जन्माचे स्वागत करा, देश भ्रष्टाचारमुक्त करा, कचरा  रस्त्यावर टाकू नका, भुत, मंत्र, जादुटोणा या गोष्टी करु नका, महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, नवस करणे बंद करा, शिक्षणाचा व्यवसाय बंद करा, अन्न वाया घालवणे, नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार ठेवा,
मोबाईल मुळे बालपणी हरवलेले खेळ, दुसर्‍याला हिणवणे, इतरांची तुलना आपल्या पाल्या सोबत करु नका, स्पर्धा करु नका अशा सर्व अनिष्ट विचारांची होळी पथनाट्यातून शिक्षिका व विद्यार्थ्यांनी केली. या कार्यक्रमासाठी हिंदसेवा मंडळाचे सर्व
पदाधिकारी व स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी यांचे मार्गदर्शन लाभले.