नगर – सावेडीतील रेणावीकर शाळेसमोरील डॉ. मगर डेन्टल लिनिक अॅन्ड इम्प्लांट सेंटरमध्ये नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक एस्थेटिक विभागाच्या लोकार्पण शुभारंभास शहरातील विविध मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. स्वरुपकुमार मगर, डॉ. सौ. रुपाली मगर व डॉ. सृजन मगर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत
केले. केतन बल्लाळ, मंगेश जाधव, राजेंद्र डौले, अशोक बँकेचे व्यवस्थापक प्रदीप थोरात आदींनी कार्यवाहकाची
जबाबदारी स्विकारून हा कार्यक्रम यशस्वी केला. अत्याधुनिक एस्थेटिक विभाग येथे सुरू करण्यात
आल्याने आता येथील रुग्णांना पुणे-मुंबई वगैरे मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
अत्याधुनिक विभाग डॉ. सृजन मगर हे नव्या पिढीचे डॉटर सांभाळणार असून त्यांनी एफसीएफए (फेलोशिप
इन लिनिकल अॅण्ड फेशियल एस्थेटिक) ही पदवी चेन्नई येथील सविता डेन्टल कॉलेज येथून घेतली असून
नगर जिल्ह्यातील ते एकमेव कॉस्मेटिक डेन्टल सर्जन झाले आहेत, असे सांगितले.
नगरच्या बदलत्या गरजांनुसार डॉ. मगर डेन्टल लिनिक अॅण्ड इम्प्लांट सेंटर येथे सुविधा पुरविण्यात येणार असून एस्थेटिक या नवीन विभागामध्ये सिरॅमिक लॅमिनेटेड आणि व्हेनिअर, स्माईल-डिझाईन, स्माईल-करेशन, एस्थेटिक कॉम्पोझिट, ब्लिचिंग (टूथ व्हाईटनिंग) यांसारख्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. आपले व्यक्तिमत्व सुंदर दिसण्यासाठी या अत्याधुनिक विभागामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाद्वारे दाताची ठेवण, आपले हसणे, जबड्याचा आकार,
चेहर्याची ठेवण व्यवस्थित करण्यास मदत होणार आहे, अशी माहिती डॉ. सृजन मगर यांनी यावेळी दिली.
८ मार्च रोजी महिला दिनाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या एस्थेटिक विभागाच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी येणार्या महिलांना ३१ मार्चपर्यंत विशेष सवलत देण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. स्वरुपकुमार व डॉ. सौ. रुपाली मगर यांनी केले आहे.