आयुर्वेदाच्या सहाय्याने पोलिसांचे आरोग्य रक्षण

0
22

नगर – १०० वर्ष जुना वारसा असलेले काळूराम मंगळचंद कोठारी यांचा ’वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा’ हा ब्रँड असून, आतापर्यंत लाखो लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी या ब्रँडने योगदान दिले आहे. आता वर्ल्ड ऑफ आयुर्वेद चे सर्व उत्पादने
ऑनलाईनही उपलब्ध आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेला तोंड देत नागरिकांसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या आरटीओ पोलिस
अधिकार्‍यांसाठी ’वर्ल्ड ऑफ आयुर्वेद’ तर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत पोलिसांना ’समर केअर किट’ वाटप करण्यात आले.
या किटमध्ये उन्हाळ्यातील थकवा आणि उष्णतेपासून आराम देणारी आयुर्वेदिक उत्पादने देण्यात आली आहेत. पोलिसांचे आरोग्य आणि तंदुरुस्ती कायम राहावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वर्ल्ड ऑफ
आयुर्वेद, काळूराम मंगळचंद कोठारी परिवार आणि मंगलभक्त सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
हा उपक्रम वैद्य. कुणाल कोठारी, ऋषभ कोठारी आणि रजत कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमादरम्यान पोलिस अधिकार्‍यांनी हा अनोखा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. ’वर्ल्ड ऑफ आयुर्वेद’ ने अशाच प्रकारचे समाजोपयोगी कार्य पुढेही सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.