नगर – छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशाने ठेकेदारांकडून कामगारांच्या माथाडी मंडळात प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील कामगारांना उपलब्ध करून देणे, ठेकेदारांकडून शंभर टक्के थकीत रक्कम तहसील कार्यालयाच्या वतीने आरआरसी अंतर्गत वसूल करून कामगारांच्या खात्यावर जमा करणे, कामगारांचे मंडळाकडे जमा असलेले थकीत वेतन तात्काळ अदा करणे या मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसैनिक, कामगारांनी कामगार एकजुटीचा विजय असो, कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. यावेळी सह जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, कामगार नेते विलास उबाळे, डॉ. श्रीकांत चेमटे, रेवजी नांगरे, किरण बोरुडे, महावीर मुथा, उषाताई भगत, शैलाताई लांडे, शंकर आव्हाड, किशोर कोतकर, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, मनोज चव्हाण, विनोद दिवटे, रोहिदास भालेराव, पोपट लोंढे, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर, दिपक काकडे, देवराम शिंदे, सचिन लोंढे, आतिश शिंदे, संजय गंगावणे, विनोद शिरसाठ, दत्तात्रय कळमकर, विजय कार्ले,
संजय माळवे, योगेश कार्ले, परसराम इजगज, ज्ञानदेव कदम, भगवान शेंडे, मंगेश एरंडे, बापू शिंदे, संतोष वाघमारे, गणपत वाघमारे, बाळासाहेब अनारसे, कौतिक शिंदे, क्रुष्णा शेंडे, सतिश शेंडे, अंबादास शेंडे, मारुती बनकर, मारुती शिंदे, अंबादास कोतकर, बाळु बनसोडे, महादेव ठोंबरे, सोमेश कापुरे, लखन पांढरे, मच्छिंद्र पांढरे, निलेश सोनवणे, संतोष पोळ, संतोष सुसलादे, सुमित पळसे, अंगद महारनवर, गोरख पुलावळे, विशाल केदारे, गणेश बनसोडे आदींसह कामगार सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, कामगार त्यांच्या हक्काचं दाम मागत आहेत. मात्र प्रशासन जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करीत आहे. कामगारांच्या हितासाठी वेळप्रसंगी शिवसेनाही संघर्ष करायला तयार आहे. प्रशासनाने दिशाभूल करणे थांबवावे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. अन्यथा भविष्यात शिवसेना स्टाईल धडा शिकवावा लागेल.
विलास उबाळे म्हणाले की, डिसेंबर महिन्यापासून आम्ही सातत्याने लेखी पाठपुरावा कामगार मंडळाकडे करत आहोत. तरी देखील मंडळ दखल घेत नव्हते. म्हणून या ठिय्या आंदोलन छेडावे लागले. प्रशासनाने आठ दिवसांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेला शब्द त्यांनी पाळावा. अन्यथा कामगार आघाडी तीव्र आंदोलन छेडले. मागण्यांवर आठ दिवसांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. प्यायला पाणी देता का ? आंदोलन सुरू असताना कामगार संतप्त झाले. उन्हा-तान्हात आम्ही ओझ
वाहतो. घशाला कोरड पडते. तहान लागली की पाणी पिण्यासाठी दोन किलोमीटर पायपीट करावी लागते. कामाच्या ठिकाणी साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसेल तर माणुसकी संपली आहे काय ? आम्हाला पाणी प्यायला कधी देणार आहात? असे संतप्त प्रश्न कामगारांनी विचारत अधिकार्यांना घेरले. लवकरच समक्ष पाहणी करत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले.