नगर – आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या शिकवणीनुसार जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून दिवसय्रात्र रुग्णसेवेचे व्रत जोपासत आहेत. माजी मंत्री स्व. अनिल राठोड आणि आनंदऋषीजी हॉस्पिटल
हे एक अतुट नात होत. मी सुद्धा विद्यार्थी दशेत असल्यापासून या हॉस्पिटलच्या कार्याची महती ऐकत आलो आहे, आज प्रत्यक्ष शिबीराच्या उद्घाटननिमित्त हे रुग्णसेवेचे कार्य जवळून पाहण्याचा योग आला आहे. आधुनिक मशिनरी व आत्मियतेने रुग्णांची काळजी हे हॉस्पिटल घेत असल्याने पुणे-मुंबईला जाण्याची संकल्पना कालबाह्य झाली आहे. सर्वसुविधा
एकाच छताखाली मिळत असल्याने येथे आलेला रुग्ण पुर्णपणे बरा होऊनच जात आहे. मोफत व अल्पदरातील
सेवामुळे रुग्णांवर उपचार होत असल्याने त्यांचा आर्थिक भार कमी होत आहे. त्याचप्रमाणे शासकिय योजना,
मेडिलेम सुविधामुळे रुग्णांची मोठी सोय होत आहे. तज्ञ डॉटर आणि आधुनिक मशिनरी आणि दानशूरांचे
सहकार्य यामुळे हे हॉस्पिटल ‘रुग्णांसाठी वरदान’ ठरत असल्याचे प्रतिपादन शिवसेना युवा सेनेचे सहसचिव
विक्रम राठोड यांनी केले. जैन सोशल फेडरेशनद्वारा संचलित आचार्य श्री
आनंदऋषीजी म.सा. यांच्या ३३ व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे मेंदूविकार व मेंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विक्रम राठोड व श्रीमती शशिकला अनिल राठोड यांच्या
हस्ते झाले. यावेळी सौ.तेजस्वीनी राठोड, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, बाबूशेठ लोढा, माणकचंद लोढा, सुभाष मुनोत, अनिल मेहेर, डॉ.अशिष भंडारी, तज्ञ डॉ.गौतम काळे, डॉ.अद्वैत गिते, डॉ. विशाल भस्मे आदी उपस्थित होते. याप्रसंगी श्रीमती शशिकला राठोड म्हणाल्या, आपल्या साधू-संतांनी जनसेवेचा दिलेला संदेश रुग्णसेवा
हीच ईश्वर सेवा मानून आनंदऋषीजी हॉस्पिटलचे कार्य निरंतरपणे सुरु आहे. या आरोग्य सेवेत जैन सोशल
फेडरेशनचे कार्यकर्ते, डॉटर, स्टाफ देत असलेले योगदान हे कौतुकास्पद असेच आहे. स्वागत डॉ.आशिष
भंडारी यांनी केले. शिबीरात ८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.





